(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा सु. देवरुखकर
संगीत हा विषय आवड म्हणून जरी उत्तम असला, तरी त्याची विश्वभरामध्ये पसरलेली विविध रूपे, प्रकार, शाखा-उपशाखा आणि या सर्वांमध्ये झालेले कार्य तसेच कालचक्राप्रमाणे होत आलेली परिवर्तने, या साऱ्यांचा मागोवा घेऊन तो मराठी रसिकांसमोर नेमक्या रंजकपणे आणि वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊन मांडणे हे शिवधनुष्यच आहे. प्राचीन काळापासून भारतात आणि इतरत्रही संगीतशास्त्राचा संचार आणि संसार अव्याहतपणे सुरू आहे, मात्र हिंदुस्थानात पूर्वीच्या मौखिक परंपरेला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मोजकेच दप्तर हाती लागते. “बदलते तीच कला” या नात्याने काही शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास आधुनिक कालखंडातील संगीतवैभवाचा मागोवा घेता येतो; पण कालौघात लुप्त झालेल्या आणि त्या त्या वेळी महत्त्वपूर्ण टप्पे ठरलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यायचाही हा प्रयत्न आहे. केवळ भारतापुरताच विचार करायचा तर वेदांच्या ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळी मनोहर वळणे घेत, कधी भौतिक तर कधी आध्यात्मिक अंगे स्वीकारत दर्जा, विस्तार आणि वैविध्य अशा सर्व बाजूंनी वृद्धिंगत होत गेला.

भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.

पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.

संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.

किशोरी आमोणकर (Kishori Amonkar)

किशोरी आमोणकर

आमोणकर, किशोरी : (१० एप्रिल १९३१ – ३ एप्रिल २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या एक श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायिका ...
कुंदनलाल सैगल (Kundanlal Saigal)

कुंदनलाल सैगल

सैगल, कुंदनलाल : (४ / ११ एप्रिल १९०४–१८ जानेवारी १९४७). अखिल भारतीय कीर्तीचे थोर गायक आणि चित्रपट अभिनेते. त्यांचा जन्म जम्मू ...
कुमार गंधर्व (Kumar Gandharva)

कुमार गंधर्व 

कुमार गंधर्व : (८ एप्रिल १९२४ – १२ जानेवारी १९९२). एक सर्जनशील थोर संगीतकार व समर्थ गायक. त्यांचे मूळ नाव ...
कूचिपूडी (Kuchipudi)

कूचिपूडी

आंध्र प्रदेशातील एक अभिजात नृत्यनाट्यप्रकार. कृष्णा जिल्ह्यातील कूचीपुडी गावातील नर्तकांनी ही नृत्यपद्धती रुढ केली म्हणून तिला कूचिपूडी नाव पडले. सर्वांत ...
कृष्णराव गुंडोपंत गिंडे (के. जी.) (Krishnarao Gundopant Ginde)

कृष्णराव गुंडोपंत गिंडे

गिंडे, कृष्णराव गुंडोपंत (के. जी.) : (२६ डिसेंबर १९२५ – १३ जुलै १९९४). भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रातील भातखंडे परंपरेतील एक ...
कॅनन (Canon)

कॅनन 

पश्चिमी संगीतातील काउंटरपॉइंटचा (एकाचवेळी एकापेक्षा अधिक सुसंगत रचनांची प्रस्तुती) एक प्रकार. ह्या प्रकारात अनुकरणाचे तत्त्व अत्यंत काटेकोरपणे पाळलेले असते. ह्या ...
केलुचरण महापात्रा (Kelucharan Mohapatra)

केलुचरण महापात्रा

महापात्रा, केलुचरण :  (८ जानेवारी १९२६ – ७ एप्रिल २००४). ओडिसी नृत्याचे प्रवर्तक. त्यांचा जन्म रघुराजपूर या छोट्या गावात (जगन्नाथपुरी, ...
केसरबाई केरकर (Kesarbai Kerkar)

केसरबाई केरकर

केरकर, केसरबाई : (१३ जुलै १८९२ – १६ सप्टेंबर १९७७). हिंदुस्थानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम मान्यवर गायिका. त्यांचा जन्म गोव्यातील ...
क्लॅव्हिकॉर्ड (Clavichord)

क्लॅव्हिकॉर्ड 

एक पश्चिमी तंतुवाद्य. सुमारे पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत आणि पुन्हा विसाव्या शतकात वापरात आलेले हे वाद्य आहे. याची उत्क्रांती मानोकॉर्डपासून ...
खमाज थाटातील राग (Khamaj Thaat)

खमाज थाटातील राग

विष्णू नारायण भातखंडे यांच्या संगीतशास्त्रीय विचारानुसार खमाज या थाटात मुख्यत्वेकरून पुढील सोळा राग येतात : (१) झिंझोटी, (२) खमाज, (३) ...
खादीम हुसेन खाँ (Khadim Hussain Khan)

खादीम हुसेन खाँ

खाँ, खादीम हुसेन : (१९०७ – ११ जानेवारी १९९३). हिंदुस्थानी संगीतातील अत्रौली घराण्यातील एक अध्वर्यू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व, संगीतज्ञ व ...
खाप्रूमामा पर्वतकर (Khaprumama Parvatkar)

खाप्रूमामा पर्वतकर

पर्वतकर, खाप्रूमामा : (? १८८०–३ सप्टेंबर १९५३). प्रख्यात तबलावादक. खाप्रूमामा (खाप्रूजी) उर्फ लक्ष्मणराव पर्वतकर यांचा जन्म गोव्यामधील पर्वती या गावी ...
ख्याल (Khyal)

ख्याल 

उत्तर हिंदुस्थानी अभिजात संगीतातील एक लोकप्रिय आणि विकसित स्वरूपाचा गायनप्रकार. ‘ख्याल’ याचा मूळ अर्थ ‘कल्पना’. ख्याल हा धृपदापासून विकसित झालेला ...
गंगूबाई हनगल (Gangubai Hangal)

गंगूबाई हनगल

हनगल / हनगळ, गंगूबाई : (५ मार्च १९१३–२१ जुलै २००९). किराणा घराण्याच्या ज्येष्ठ आणि प्रख्यात गायिका. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ...
गजानन वाटवे (Gajanan Vatave)

गजानन वाटवे

वाटवे, गजानन जीवन : (८ जून १९१७—२ एप्रिल २००९). मराठी भावगीत गायक व संगीतकार. त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांच्या ...
गजाननराव जोशी (Gajananrao Joshi)

गजाननराव जोशी

जोशी, गजाननराव : (३० जानेवारी १९११ – २८ जून १९८७). प्रख्यात व्हायोलीनवादक व ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक. त्यांचा जन्म गिरगाव, ...
गांधर्व महाविद्यालय, पुणे (Gandharva Mahavidyalaya, Pune)

गांधर्व महाविद्यालय, पुणे

संगीतशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारी एक ख्यातनाम संस्था. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या निधनानंतर गुरुवर्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या आज्ञेनुसार ...
गानवर्धन, पुणे (Ganvardhan, Pune)

गानवर्धन, पुणे

गायन, वादन, नृत्य यांचा समाजात प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन कृष्णा गोपाल ऊर्फ कृ. गो. धर्माधिकारी यांनी ८ नोव्हेंबर ...
गायन समाज देवल क्लब (Gayan Samaj Deval Club)

गायन समाज देवल क्लब

अभिजात हिंदुस्थानी संगीत, नृत्य व नाट्य यांचे प्रशिक्षण देणारी व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील विख्यात संगीतसंस्था. सुरुवातीस ...
गिरिजादेवी (Girijadevi)

गिरिजादेवी

गिरिजादेवी : (८ मे १९२९ – २४ ऑक्टोबर २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील ख्यातनाम ठुमरी गायिका. त्या बनारस आणि ...