डेटन, सर अँगस एस. (Deaton, Sir Angus S.) : (१९ ऑक्टोबर १९४५). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचा मानकरी. त्यांनी उपभोग, दारिद्र्य आणि कल्याण यांसंदर्भात सर्वस्वी वेगळ्याप्रकारे…
भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : संरक्षणमंत्री कृष्ण मेनन, आयबी. (Intelligence Bureau) प्रमुख बी. एन. मलिक आणि लेफ्टनंट जनरल बी. एम. कौल यांच्या ‘फॉरवर्ड पॉलिसी’नुसार लडाख विभागात भारतीय लष्कराच्या छोट्याछोट्या…
अभ्यंकर, श्रीराम शंकर : (२२ जुलै १९३० – २ नोव्हेंबर २०१२). भारतीय-अमेरिकन गणिती. बीजगणित व बैजिक भूमिती या क्षेत्रांत मूलगामी संशोधनासाठी प्रसिद्ध.अभ्यंकर यांचा जन्म भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे…
गावात नैसर्गिक व तत्सम संकटांनी प्रवेश करू नये या धार्मिक भावनेपोटी गाववस्तीच्या शिवेवर मंत्रतंत्राच्या साहाय्याने रेषा काढून गाव बंद करणे म्हणजे गावबांधणी . ही प्रथा मुख्यतः कोलाम या आदिवासी जमातीत…
पश्चिम विदर्भातील एक लोकनाट्य. विशेषत: नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये या लोकनाट्याचे प्रचलन आढळते. या लोकनाट्यातील नायिकेचे नाव गंगासागर हे असून तिच्यासभोवती सारे कथानक फिरत असते; त्यामुळे या लोकनाट्याला नायिकेच्या…
लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या दृष्टीने सांस्कृतिक महत्व असणारे प्रतिक. शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान…
नारायणगावकर,विठाबाई भाऊमांग : (जुलै १९३५ - १५ जाने २००२) महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत . तमाशा सम्राज्ञी .महाराष्ट्रातील तमाशा परंपरेतील एक धाडसी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व .जन्म पठ्ठेबापूरावांच्या तमाशातून प्रेरणा घेतलेल्या शाहीर…
महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकवाद्य. संगीतज्ञ कुर्ट सॅक्सच्या वर्गीकरणानुसार कंपित पटलवाद्य आणि भरत मुनींच्या वर्गीकरणानुसार आघातवाद्य या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. तमाशा, पोवाडा, लावणी, खडीगंमत, शक्ती तुरा या सारख्या महाराष्ट्रातील अनेक…
भारतीय लोकसंस्कृतीतील स्त्रीजीवनातील महत्त्वाची रूढी. ही रूढी प्रतीकात्मकतेने साजरी होते. भारतातील विविध प्रांतात व विविध समाजजीवनात व स्तरात ही पद्धत थोड्याफार फरकाने अस्तित्वात आहे. स्त्रियांचा सर्जनशीलता, मातृत्वाचा व तिच्या ठायी…
खंडोबाचे जागरण हा खंडोबा या कुलदैवताचा संकीर्तन प्रकार असून कुळधर्म-कुळाचार म्हणून खंडोबाचे जागरण घातले जाते. हे जागरण विधिनाट्य म्हणूनही ओळखले जाते. आंबेचा गोंधळ, भैरवनाथाचे भराड तसेच खंडोबाचे जागरण.खंडोबा हे कुलदैवत…
आदिवासी जमातींतील युवक-युवतींना सामाजिक -सांस्कृतिक आणि पर्यावरणीय ज्ञान आणि संस्कार मिळावेत यासाठी ग्रामपातळीवर उभी करण्यात आलेली संस्कारकेंद्रे. सामाजिक मानवशास्त्रात या संस्कारकेंद्रांचा युवागृह म्हणून उल्लेख केला जातो. जगभरातील विविध आदिम जमातींत अशी युवागृहे आढळतात. प्रौढ जीवनातील वैवाहिक कर्तव्याबरोबर इतर अनुषंगिक कर्त्यव्ये पार पाडण्याचे ज्ञान आणि अनुभव घोटुलमधून मिळत असल्याने यास युवागृहे हे नामाभिधान तर्कसंगत वाटते. जमातीपरत्वे घोटुलला वेगवेगळी नावे आहेत. उदाहरणार्थः- ‘घोटुल’ (बस्तरमधील माडिया, मूरिया, गोंड जमाती). ‘कुमारगृह’(आसाम मधील गारो जमात ), ‘रंगबंग’(हिमालय प्रदेशातील भेटिया जमात), ‘गितिओरा’(छोटानागपूर क्षेत्रात राहणाऱ्या मुंडा, हो जमाती), ‘मौरूंगा’ (पूर्वोत्तर भारतातील ब्रह्मपुत्रा नदीच्या परिसरातील आदिवासी ). ‘जोख’, ‘एरया’, ‘धुमकुरिया’ (उडीसा मधील उरांव जमाती) ‘बनवयो’ (नागा जमाती); याशिवाय गोटुल, जोंकरपा, बासा अशी याची जमातपरत्वे भिन्न-भिन्न नावे आहेत. आदिवासींच्या उपजीविकीमध्ये अगत्याचे स्थान असलेल्या जीवनानुनयी बाबींचे शिक्षण या गृहांमधून मिळते. मध गोळा करणे, शिकार करणे, शेतीची विविध कामे करणे अशा व्यावसायिक शिक्षणाबरोबर मर्यादित पर्यावरणात जीवनयापनासाठी जमातीची शिस्त, सामाजिक न्याय, परंपरागत चालणाऱ्या प्रथा, परंपरा, नृत्य गायनादी कलांचे शिक्षण, आणि महत्वाचे म्हणजे लैंगिक शिक्षणसुद्धा याच युवागृहात प्राप्त होते.
आसाममधील आओ जमातीत, बिहार मधील ओरांव जमातीत घोटुल वयोमानानुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. ओरांव जमातीत घोटुल तीन गटात पाहायला मिळतात. एक -‘पुनाजोखार’- किशोर अवस्थेत असणाऱ्या युवकांना इथे तीन वर्षे राहावे लागते. तसेच आपल्या पेक्षा मोठ्या गटातील सदस्यांची या गटातील सदस्यांना सेवा करावी लागते. यानंतर त्यांना ‘मझतुरियाजोखार’ या दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळतो. येथेही तीन वर्षे सेवा करावी लागते. तिसरा वर्ग ‘कोहाजोखार’. येथे विवाह होईपर्यंत थांबण्याची मुभा असते. ‘कोसघोटुली’(अबुझमाड ) या घोटुलाचे स्वरूप इतर घोटुलांपेक्षा वेगळे असते. या घोटुलमध्ये अविवाहित मुली नाचतात, गातात, पण झोपण्यासाठी मात्र आपल्या घरी जातात. इतर घोटुलमध्ये मुले-मुली रात्री घोटुलमध्येच विश्राम करतात. काही आदिमजमातींत मुलींचे आणि मुलांचे वेगवेगळे, तर काही जमातींत एकत्र अशी युवागृहे आढळतात. नागा जमातीत अशा प्रकारचे घोटुल दिसतात. ‘इखुइंची’ आणि ‘इलुइची’. जे क्रमशः मुले आणि मुलींच्या घोटुलशी संबंधित आहेत.
युवागृहे सर्वसाधारणपणे गावापासून दूर असतात, पण काही आदिवासी जमातीत ही युवागृहे गावाच्या मध्यभागी असतात. खेड्याच्या मध्यभागी बांबूचे कुंपण घातलेली ही झोपडी. तीन ते चारफूट उंच मातीच्या ओट्यावर, कुडाच्या भिंती असलेली आणि गवताने साकारलेली असते. घोटुलच्या लाकडी खांबावर व भिंतीवर चित्रे काढलेली असतात. तरुण कलाकारांचीच ही कलाकृती असते. या झोपडीला एकच दरवाजा असतो. घोटुलची शिस्त व स्वच्छता वाखाणण्यासारखी असते. कामे वाटून दिलेली असतात. त्यात कामचुकारपणा सहसा होत नाही. रोज सायंकाळी दिवसाची सर्व कामे आटोपताच हळूहळू अविवाहित युवक-युवतींचे पाय घोटुलकडे वळू लागतात. घोटुलमध्ये सुमारे ९ ते २० वर्षे वयाची मुले-मुली येतात. घोटुलमधील स्वच्छंदी जीवन हसणे, खेळणे, एकमेकांशी मोकळेपणाने वागणे, थट्टा करणे, गाणे म्हणणे, नाच करणे इत्यादींच्या द्वारे आनंदात व्यतित होते, आणि भावीजीवनातील साथीदाराची निवड करण्याचा मार्ग सुकर होतो. स्वच्छंदी जीवन असले तरी कोणत्याही प्रकारची सक्ती मात्र होत नाही. घोटुलच्या प्रांगणात वयात आलेले युवक-युवती रात्री एकत्र जमून समूह नृत्ये करतात. रेलॉ, सींगमाडिया, हुलकी, करमा, रेवा, सेला, गेडी, गिरदा, सुआ अशा अनेक प्रकारची नृत्ये केली जातात. घोटुलच्या समोर होळीचा सण साजरा करतात. होळी भोवती ढोलकीच्या तालावर वर्तुळाकार फेर धरून एकमेकांच्या कमरेभोवती व खांद्यावर हात टाकून बेभान होऊन नृत्य करतात. याप्रसंगी शृंगारिक गीते गायिली जातात. मुलींची छेडखानी, थट्टा मस्करीला सुद्धा यात स्थान असते. या गीतांचे विषय विविध असतात. वैवाहिक स्वप्न, लग्नसमारंभ, प्रियकराच्या भेटीची आतुरता, प्रेयसीची थट्टा, वैवाहिक जीवन, प्रियकराची निवड, प्रेयसीचे सौंदर्य इत्यादी. विधवा व विवाहित स्त्रियांना घोटुलमध्ये प्रवेश नसतो.(अधिक…)
निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात, उदा., जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यामध्ये हवेतील धूलिकण, जीवाणू, पराग आणि कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन ह्यांसारखे वायू मिसळतात. जमिनीवरून पाणी वाहत असताना तिच्यावर…
लहान प्रमाणातील लोकसंख्येला पाणीपुरवठा (विशेषतः विहिरीमधून) करण्याआधी विहिरीमध्येच पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत म्हणजे एकघट (Single pot) किंवा द्विघट (Two pot) पद्धत . या पद्धतीमध्ये ७ ते १० लिटर धारणाशक्ती असलेल्या…
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील खेडा जिल्ह्यातील (Gujrat) शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन. ⇨ महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८) आणि सरदार ⇨ वल्लभभाई पटेल (३१ ऑक्टोबर १८७५ – १५ डिसेंबर…
आमोणकर, किशोरी : (१० एप्रिल १९३१ – ३ एप्रिल २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या एक श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायिका. त्यांच्या जन्म मुंबई येथे झाला. जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका गानतपस्विनी…