(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
आजच्या आधुनिक विज्ञानात रसायनशास्त्राच्या विविध शाखा कार्यरत आहेत. या प्रत्येक शाखेचे महत्त्व हे वेगळे आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या निर्मितीपासून ते वैद्यकीय क्षेत्रातील औषधनिर्मितीपर्यंतची विविध क्षेत्रे ही रसायनशास्त्राच्या पायावर उभी आहेत. यात सेंद्रिय रसायनशास्त्र, असेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, तसेच भौतिक रसायनशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्र अशा रसायनशास्त्रांच्या विविध शाखांचा वापर केला जातो. रसायनशास्त्राच्या या मूळ शाखांव्यतिरिक्त
धातुशास्त्र, बहुवारिकशास्त्र, पदार्थशास्त्र, जनुकशास्त्र, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र, अणुशास्त्र अशा इतर अनेक शाखांचाही रसायनशास्त्र हा एक अविभाज्य घटक आहे. इतकेच कशाला, तर आपल्या शरीरात वा निसर्गातील इतर सजीवांत चाललेल्या विविध क्रिया या रसायनशास्त्रामुळेच शक्य झाल्या आहेत.
रसायनशास्त्र हे प्रत्येक पदार्थाची जडण-घडण तपासते. तसेच एखाद्या पदार्थाची दुसऱ्या
पदार्थाबरोबर कशी आंतरक्रिया होते याचाही पाठपुरावा करते. त्यामुळे विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या
जडण-घडणीशी आणि त्याच्या गुणधर्माशी रसायनशास्त्राचा संबंध येतो. निसर्गात उपलब्ध असलेल्या
पदार्थांपासून मानवाला उपयुक्त ठरणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीसंबंधीचा अभ्यास हा
रसायनशास्त्राचाचा भाग आहे. एखाद्या वस्तूच्या गुणधर्मात बदल करून त्याची सुधारित आवृत्ती निर्माण करणे किंवा विशिष्ट कारणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एखाद्या पदार्थाची नवनिर्मिती करणे, हीसुद्धा रसायनशास्त्राचीच कार्यक्षेत्रे आहेत. रसायनशास्त्राचा या बहुविध उपयोगांमुळे, रसायनशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन हे विज्ञानाच्या इतर अनेक शाखांचीही अत्यावश्यक गरज बनले आहे. याच कारणास्तव रसायनशास्त्राची विलक्षण वेगाने सर्वांगीण प्रगती होत आहे. या प्रगतीची माहिती होण्यासाठी, रसायनशास्त्राची वेगेवगळ्या अंगांनी ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्यांना ही ओळख मराठीतून करून दिल्यास, जनसामान्यांना मानवी जीवनाशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष निगडित असणाऱ्या रसायनशास्त्राचे आकलन अधिक सहजपणे होऊ शकेल. रसायनशास्त्रावरील ज्ञानमंडळाचे हेच उद्दिष्ट आहे. विश्वकोशातील रसायनशास्त्रावरील या विभागात, रसायनशास्त्रातील विविध संज्ञा, रसायने, नियम, अभिक्रिया, प्रक्रिया, संशोधने, इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती करून देण्यात येत आहे.
हायड्रोडीसल्फरीकरण (Hydrodesulfurisation)

हायड्रोडीसल्फरीकरण

डीझेल तसेच इतर इंधनांमधील सल्फरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेलशुध्दिकरण कारखान्यात हायड्रोडीसल्फरीकरण ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे इंधनातील सल्फरच्या प्रमाणावर नियंत्रण ...
ॲझाइडे (Azides)

ॲझाइडे

आ. १. ॲझाइड आयन. ॲझाइडाचे रासायनिक सूत्र R(N3)x  असे आहे. सूत्रातील R हा सामान्यत: कोणत्याही धातूचा, हायड्रोजनाचा किंवा हॅलोजनाचा अणू ...
ॲट्रोपीन (Atropine)

ॲट्रोपीन

सोलॅनेसी कुलातील ॲट्रोपा बेलाडोना (Atropa belladonna)  ह्या वनस्पतीच्या मुळांमध्ये  मुख्य प्रमाणात मिळणारे आणि पुरातन काळापासून वापरात असलेले एक अल्कलॉइड संयुग आहे. आपल्याकडे सर्वत्र आढळणाऱ्या धोतऱ्याच्या ...
ॲरोमॅटीकरण (Aromatization)

ॲरोमॅटीकरण

ॲलिफॅटिक व ॲलिसायक्लिक हायड्रोकार्बनांचे  ॲरोमटिक हायड्रोकार्बनांत रूपांतर करणे या प्रक्रियेस ‘ॲरोमॅटीकरण’ म्हणतात. खनिज तेल उद्योगधंद्यात या प्रक्रियेला फार महत्त्व आहे. दुसऱ्या महायुद्धकाळी स्फोटक द्रव्यांच्या ...
ॲल्युमिना (Alumina)

ॲल्युमिना

ॲल्युमिनाचे रासायनिक सूत्र Al2O3 असे आहे. यालाच ॲल्युमिनियम सेस्क्विऑक्साइड असेही म्हणतात. आढळ : कुरुविंद, माणिक, नील इ. खनिजांच्या स्वरूपात ॲल्युमिना ...
ॲल्युमिनियम (Aluminium)

ॲल्युमिनियम

ॲल्युमिनियम मूलद्रव्य ॲल्यु‍मिनियम हे आवर्त सारणीच्या गट ३ मधील धातुरूप मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक १३ असून अणुभार २६.९८ इतका आहे ...
ॲल्युमिनियम निष्कर्षण (Aluminium extraction)

ॲल्युमिनियम निष्कर्षण

ॲल्युमिनियम या धातूच्या निष्कर्षणाचे पुढील महत्त्वाचे टप्पे आहेत : (१) धातुपाषाणांपासून (Ore) शुद्ध ॲल्युमिना मिळविणे आणि (२) ॲल्युमिनाचे विद्युत् विच्छेदन ...
ॲसिटिक अम्‍ल (Acetic acid)

ॲसिटिक अम्‍ल

ॲसिटिक अम्ल : रासायनिक संरचना भौतिक गुणधर्म : एक कार्बनी अम्‍ल. सूत्र CH3·COOH. इतर नावे अथॅनॉइक अम्‍ल, एथॅनॉलाचे अम्‍ल. स्वच्छ, ...
ॲसिटिलीकरण (Acetylation)

ॲसिटिलीकरण

एखाद्या कार्बनी संयुगातील विक्रियाशील हायड्रोजन अणूचे ॲसिटिक (CH3— CO) या गटाने प्रतिष्ठापन करण्याच्या (हायड्रोजन अणू काढून त्या जागी ॲसिटिक गट ...
ॲस्टटीन (Astatine)

ॲस्टटीन

ॲस्टटीन हे आवर्त सारणीच्या गट ७ अ मधील अधातुरूप मूलद्रव्य आहे. ॲस्टटिनची रासायनिक संज्ञा At अशी असून अणुक्रमांक ८५ आणि ...