(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
जीवशास्त्र/जीवविज्ञान या विज्ञानशाखेत सर्व जीवांसंबंधीच्या संपूर्ण माहितीचे संकलन आणि त्या माहितीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधीचे मार्गदर्शन यांचा अंतर्भाव होतो. मनुष्यासह सर्व जीवांविषयी संपूर्ण ज्ञान मिळविणे हे जीवविज्ञानाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे ही विज्ञानशाखा सर्व विज्ञानशाखांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अधिक विशिष्ट, सखोल व चिकित्सापूर्ण अभ्यासाच्या दृष्टीने जीवविज्ञानाची अनेक उपविभाग व शाखा यांमध्ये वर्गवारी केली जाते. या प्रत्येक शाखेत प्राणी वा वनस्पती यांचा भिन्न दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या स्वतंत्रपणे केलेल्या अभ्यासाची माहिती अनुक्रमे ‘वनस्पतिविज्ञान’ आणि ‘प्राणिविज्ञान’ या दोन प्रमुख मोठ्या शाखांमध्ये दिली जाते. शाखाविस्तार लक्षात घेऊन वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांची स्वतंत्र ज्ञानमंडळे तयार करण्यात आली आहेत. ‘जीवशास्त्र-प्राणिविज्ञान’ या ज्ञानमंडळांतर्गत प्राणिविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

प्राण्यांचा सर्वांगीण अभ्यास केल्या जाणाऱ्या प्राणिविज्ञान या विज्ञानशाखेच्या शारीर, शरीरक्रियाविज्ञान, आकारविज्ञान, कोशिकाविज्ञान, प्राणिभूगोल इत्यादी विविध उपशाखा आहेत. या उपशाखांच्या अनुषंगाने विविध अभ्यासपद्धतींचा अवलंब केला जातो. मानवी वैद्यक, पशुवैद्यक, सार्वजनिक आरोग्य, कृषिविज्ञान, प्राणिजातींचे संरक्षण व संवर्धन ह्या सर्वांसाठी प्राणिविज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सूक्ष्मजीवांची ओळख, त्यांचे वर्गीकरण, संरचना व कार्य तसेच सूक्ष्मजीवांचा इतर सृष्टीवर होणारा परिणाम इत्यादींचा अभ्यास सूक्ष्मजीवविज्ञान या शाखेत केला जातो. सूक्ष्मजंतुविज्ञान, आदिजीवविज्ञान, विषाणुविज्ञान या सूक्ष्मजीवविज्ञानाच्या प्रमुख उपशाखा आहेत. चयापचय, प्रकाशसंश्लेषण, जनुकक्रिया इत्यादींसारख्या मूलभूत जैव प्रक्रियांचा अभ्यास करताना वैज्ञानिकांना मूलभूत प्रायोगिक साधन म्हणून मुख्यत सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो.

जीवरसायनशास्त्र हे जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान या विषयांशी निगडित असलेले शास्त्र असून त्यामध्ये सजीव घटकांच्या रासायनिक विश्लेषण व रासायनिक स्थित्यंतर यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सजीव सृष्टीचा अभ्यास करताना या शास्त्रातील नवनवीन संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरते. जैवतंत्रज्ञान ही वेगाने विकसित होत असलेली आधुनिक विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा आहे. यात सजीवांमधील जैविक तत्त्वे आणि प्रक्रिया यांचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जाते. रेणू पातळीवर आधारित असलेले हे शास्त्र मुख्यत्वेकरून कृषि, आरोग्य व पर्यावरण या विज्ञानशाखांशी संबंधित आहे. या शाखांशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे क्रांतिकारक बदल घडून येत आहेत. एकूणच मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्व विषयांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. यासाठी जीवशास्त्र-प्राणिविज्ञान या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून या ज्ञानशाखांची माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

दाढा मासा (Indian threadfin)

दाढा मासा 

दाढा माशाचा समावेश अस्थिमस्त्य वर्गातील ॲक्टीनोप्टेरीजी (Actinopterygii) या उपवर्गाच्या पर्सिफॉर्मीस (Perciformes) गणातील पॉलिनीमिडी (Polynemidae) कुलात होतो. याला इंग्रजीत इंडियन थ्रेडफिन ...
दैनिक लयबद्धता (Circadian rhythm)

दैनिक लयबद्धता

भौगोलिक स्थितीनुसार पृथ्वीवरील विविध भागांत असलेला परिसर, तापमान, सूर्यप्रकाशाची उपलब्धता या विविधतेशी व स्थिती बदलाशी जुळवून घेण्यासाठी बहुतेक सजीवांमध्ये अंतर्जात ...
नयन / तिबेटी मेंढी  (Tibetan argali)

नयन / तिबेटी मेंढी 

सस्तनी वर्गाच्या बोव्हिडी (Bovidae) कुलातील आणि समखुरी अधिगणातील (आर्टिओडॅक्टिला) ही सर्वांत मोठी जंगली मेंढी आहे. ती तिबेटच्या पठारावर लडाखच्या उत्तर ...
नागझिरा अभयारण्य (Nagzira Wildlife Sanctuary)

नागझिरा अभयारण्य

नागझिरा अभयारण्य नागझिरा अभयारण्य हे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात असून जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे अभयारण्य आहे. १९७० मध्ये घोषित करण्यात आलेल्या या ...
नायगाव मयूर अभयारण्य (Nayagaon Mayur Wildlife Sanctuary)

नायगाव मयूर अभयारण्य

मराठवाड्यातील बीड शहराच्या बीड-पाटोदा-अहमदनगर तसेच बीड-लिंबादेवी-अहमदनगर या दोन रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या डोंगराळ भागात सु. २० किमी. अंतरावर हे अभयारण्य असून ...
निओपिलिना गॅलॅथिया (Neopilina galatheae)

निओपिलिना गॅलॅथिया

निओपिलिना गॅलॅथिया ही मृदुकाय संघातील एककवची (Monoplacophora) वर्गातील निओपिलिनिडी (Neopilinidae) कुलातील सागरी प्रजाती आहे. सुमारे ५-६ हजार मीटर खोलीपर्यंत सागरतळाशी ...
निर्बंधन विकर (Restriction enzyme)

निर्बंधन विकर

जीवाणू स्वत:च्या पेशीमध्ये विषाणूची वाढ थांबवण्यासाठी विविध रेणवीय साधने (Tools) वापरतात. निर्बंधन विकरे हे त्यांपैकी एक महत्त्वाचे साधन आहे. या विकरांना निर्बंधन विकरे, निर्बंधन एंडोन्यूक्लिएज किंवा ...
पक्षी जीनोम प्रकल्प (B10K Project)

पक्षी जीनोम प्रकल्प

निसर्गात सुमारे १०,३०० विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. या त्यांच्या विविधतेचे कारण जनुकीय अभ्यासातून शोधण्याचे वैज्ञानिकांनी ठरवले. यातूनच ‘पक्षी दहा हजार ...
पक्ष्यांचे स्थलांतर (Bird migration)

पक्ष्यांचे स्थलांतर

पक्षी स्थलांतर ही एक दरवर्षी नियमितपणे ऋतुमान बदलाबरोबर होणारी हालचाल आहे. पक्ष्यांचे प्रजननस्थळ व हिवाळी अधिवास या दरम्यान स्थलांतर साधारणत: ...
पंचसृष्टी वर्गीकरण (Five kingdom classification)

पंचसृष्टी वर्गीकरण

सजीव सृष्टीचे वर्गीकरण आजपर्यंत अनेक पद्धतींनी करण्यात आले आहे. गेल्या शतकाच्या प्रारंभी हे वर्गीकरण एकपेशीय व बहुपेशीय, वनस्पती व प्राणी ...
परभृत सजीव (Brood parasites)

परभृत सजीव

पिलांच्या पालनपोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असणाऱ्या सजीवांना परभृत किंवा परजीवी म्हटले जाते. परभृत सजीव ही संकल्पना पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून ...
पाणकावळा (Cormorant)

पाणकावळा

पक्षिवर्गातील सुलिफॉर्मिस किंवा पेलिकॅनिफॉर्मिस (Suliformes / Pelecaniformes) गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी  (Phalacrocoracidae) कुलातील पक्षी. पाणथळ जागेत अधिवास असल्याने त्यास पाणकावळा असे म्हणतात ...
पिंगळा (Owlet)

पिंगळा

पिंगळा पक्ष्याचे विविध प्रकार भारतीय घुबड जातीतील पक्ष्यांपैकी आकाराने सर्वांत लहान घुबड. आकाराने लहान असल्याने याला पिंगळा असे नाव पडले ...
पृष्ठवंशी उपसंघ (subphylum Vertebrata)

पृष्ठवंशी उपसंघ

पृष्ठवंशी अधिवर्ग रज्जूमान संघातील पृष्ठवंशी उपसंघात पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचा समावेश होतो. पृष्ठवंशी उपसंघामध्ये पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची संख्या सुमारे ...
पेडवा (Sardinella fimbriata)

पेडवा

पेडवा माशाचा समावेश क्लुपिफॉर्मिस (Clupeiformes) गणातील क्लुपिइडी (Clupeidae) या मत्स्यकुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला फिंब्रिएटा (Sardinella fimbriata) असे आहे ...
पेशी (Cell)

पेशी

रॉबर्ट हूक यांनी ५० पट मोठी प्रतिमा देणाऱ्या सूक्ष्मदर्शकाखाली बूच वृक्षाच्या बाह्य सालीचा (Cork) पातळ काप पाहिला. त्यांना त्यात अनेक पोकळ ...
पेशीअंगके (Cell organelles)

पेशीअंगके

विशिष्ट रचना असणाऱ्या पेशींतील भागांना ‘पेशींची अंगके’ म्हणतात. पेशींची अंगके ही ‘पेशींची सूक्ष्म इंद्रिये’ आहेत. पेशीअंगकांमुळे पेशी कार्याचे श्रम विभाजन  ...
पेशीद्रव्य (Cytoplasm)

पेशीद्रव्य

पेशीद्रव्य (पेशीद्रव) हे एक पेशीअंगक आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांची शरीरे एक वा अनेक पेशींनी बनलेली आहेत. सर्व पेशींमध्ये जीवद्रव्य (Protoplasm) ...
पेशीनाश (Necrosis)

पेशीनाश

एखाद्या ऊतीतील (ऊतक; Tissue) पेशींचा संसर्ग, जखम किंवा रक्तपुरवठा थांबण्यामुळे तेथील पेशी (Cell) मृत पावतात यास पेशीनाश (Necrosis) असे म्हणतात ...
पेशीपटल (Cell membrane)

पेशीपटल

एक महत्त्वाचे पेशीअंगक. पेशी हा सर्व सजीवांचा मूलभूत घटक आहे. पेशी जिवंत राहण्यात पेशीपटलाचा महत्त्वाचा वाटा आहे. आभासी केंद्रकी (Pseudo ...