(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
जीवशास्त्र/जीवविज्ञान या विज्ञानशाखेत सर्व जीवांसंबंधीच्या संपूर्ण माहितीचे संकलन आणि त्या माहितीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधीचे मार्गदर्शन यांचा अंतर्भाव होतो. मनुष्यासह सर्व जीवांविषयी संपूर्ण ज्ञान मिळविणे हे जीवविज्ञानाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे ही विज्ञानशाखा सर्व विज्ञानशाखांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अधिक विशिष्ट, सखोल व चिकित्सापूर्ण अभ्यासाच्या दृष्टीने जीवविज्ञानाची अनेक उपविभाग व शाखा यांमध्ये वर्गवारी केली जाते. या प्रत्येक शाखेत प्राणी वा वनस्पती यांचा भिन्न दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या स्वतंत्रपणे केलेल्या अभ्यासाची माहिती अनुक्रमे ‘वनस्पतिविज्ञान’ आणि ‘प्राणिविज्ञान’ या दोन प्रमुख मोठ्या शाखांमध्ये दिली जाते. शाखाविस्तार लक्षात घेऊन वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांची स्वतंत्र ज्ञानमंडळे तयार करण्यात आली आहेत. ‘जीवशास्त्र-प्राणिविज्ञान’ या ज्ञानमंडळांतर्गत प्राणिविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

प्राण्यांचा सर्वांगीण अभ्यास केल्या जाणाऱ्या प्राणिविज्ञान या विज्ञानशाखेच्या शारीर, शरीरक्रियाविज्ञान, आकारविज्ञान, कोशिकाविज्ञान, प्राणिभूगोल इत्यादी विविध उपशाखा आहेत. या उपशाखांच्या अनुषंगाने विविध अभ्यासपद्धतींचा अवलंब केला जातो. मानवी वैद्यक, पशुवैद्यक, सार्वजनिक आरोग्य, कृषिविज्ञान, प्राणिजातींचे संरक्षण व संवर्धन ह्या सर्वांसाठी प्राणिविज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सूक्ष्मजीवांची ओळख, त्यांचे वर्गीकरण, संरचना व कार्य तसेच सूक्ष्मजीवांचा इतर सृष्टीवर होणारा परिणाम इत्यादींचा अभ्यास सूक्ष्मजीवविज्ञान या शाखेत केला जातो. सूक्ष्मजंतुविज्ञान, आदिजीवविज्ञान, विषाणुविज्ञान या सूक्ष्मजीवविज्ञानाच्या प्रमुख उपशाखा आहेत. चयापचय, प्रकाशसंश्लेषण, जनुकक्रिया इत्यादींसारख्या मूलभूत जैव प्रक्रियांचा अभ्यास करताना वैज्ञानिकांना मूलभूत प्रायोगिक साधन म्हणून मुख्यत सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो.

जीवरसायनशास्त्र हे जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान या विषयांशी निगडित असलेले शास्त्र असून त्यामध्ये सजीव घटकांच्या रासायनिक विश्लेषण व रासायनिक स्थित्यंतर यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सजीव सृष्टीचा अभ्यास करताना या शास्त्रातील नवनवीन संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरते. जैवतंत्रज्ञान ही वेगाने विकसित होत असलेली आधुनिक विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा आहे. यात सजीवांमधील जैविक तत्त्वे आणि प्रक्रिया यांचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जाते. रेणू पातळीवर आधारित असलेले हे शास्त्र मुख्यत्वेकरून कृषि, आरोग्य व पर्यावरण या विज्ञानशाखांशी संबंधित आहे. या शाखांशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे क्रांतिकारक बदल घडून येत आहेत. एकूणच मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्व विषयांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. यासाठी जीवशास्त्र-प्राणिविज्ञान या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून या ज्ञानशाखांची माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

गुणसूत्र (Chromosome)

गुणसूत्र

पेशी केंद्रकातील डीएनए (DNA; डिऑक्सिरायबोन्यूक्लिइक अम्ल) व आरएनए (RNA; रायबोन्यूक्लिइक अम्ल) नेहमी विस्कळीत स्वरूपात केंद्रकामध्ये असतो, याला गुणद्रव्य (Chromatin) असे ...
ग्लुकोजलयन (Glycolysis)

ग्लुकोजलयन

ग्लुकोज ही कार्बनचे सहा अणू असलेली शर्करा असून सर्व सजीव पेशींतील उर्जेचा प्रमुख स्रोत आहे. आहारातील स्टार्च, सेल्युलोज, पेक्टीन यांसारख्या ...
घार (Black kite)

घार

सामान्य घार (मिल्व्हस मायग्रान्स) पक्षी वर्गाच्या फॅल्कोनिफॉर्मीस (Falconiformes) गणातील असिपिट्रिडी (Accipitridae)  कुलाच्या मिल्व्हिनी (Milvinae) उपकुलातील एक शिकारी पक्षी. याला सामान्य ...
घोरपड (Bengal monitor)

घोरपड

घोरपड हा सरीसृप वर्गातील स्क्वॅमॅटा (Squamata) गणातील व्हॅरॅनिडी (Varanidae) कुलातील प्राणी असून याचे शास्त्रीय नाव व्हॅरॅनस बेंगालेन्सिस (Varanus bengalensis) आहे ...
चिमणी (House Sparrow)

चिमणी

चिमणी किंवा घर चिमणी हा पक्षिवर्गाच्या पॅसरिफॉर्मीस (Passeriformes) गणातील आणि पॅसरिडी (Passeridae) कुलातील पॅसर (Passer) प्रजातीच्या पंचवीस जातींपैकी एक पक्षी ...
चुंबक अनुचलनी जीवाणू (Magnetotactic bacteria)

चुंबक अनुचलनी जीवाणू

जीवसृष्टीतील बरेच सजीव पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीला संवेदनशील असतात. त्यांतील काही फक्त उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरील चुंबक क्षेत्रास, तर काही उत्तर ...
छिद्री संघ (Phylum Porifera)

छिद्री संघ

अपृष्ठवंशी उपसृष्टीतील प्राथमिक पेशी संघटन असलेल्या सजीवांचा संघ. यामध्ये सर्व प्रकारच्या स्पंजांचा समावेश होतो. या संघातील प्राण्यांच्या शरीरावर बाहेरून अनेक ...
जठर (Stomach)

जठर

जठर हा अन्नमार्गातील सर्वांत रुंद व फुगीर पिशवीसारखा स्नायुयुक्त भाग आहे. मानवी शरीरात जठर वरील बाजूस ग्रासनलीमध्ये / ग्रसिकामध्ये (घशापासून ...
जनुकीय संकेत (Genetic code)

जनुकीय संकेत

पेशींमधील जैवरासायनिक प्रक्रिया विविध प्रथिनांद्वारे (Proteins) होतात. प्रथिन निर्मितीसाठी आवश्यक असलेली माहिती सजीवांच्या जनुकांमध्ये सांकेतिक स्वरूपात साठवलेली असते. डीएनए (DNA) आधारक्रम ...
जायकवाडी पक्षी अभयारण्य ( Jayakwadi Bird sanctuary)

जायकवाडी पक्षी अभयारण्य

जायकवाडी धरण (नाथसागर) जायकवाडी पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील पाणपक्ष्यांचे सर्वांत मोठे पक्षी अभयारण्य ...
जीनोम आधारित पक्ष्यांचे वर्गीकरण (Genomic basis of Bird classification)

जीनोम आधारित पक्ष्यांचे वर्गीकरण

पृथ्वीवर १५० दशलक्ष वर्षांपूर्वी पक्षिवर्ग उदयास आला. पक्षी कोणत्याही सूक्ष्म अधिवासाशी (Niche) जुळवून घेतात. लहान गुंजन (Humming bird) पक्ष्यापासून पाण्यात ...
जीवदीप्ती (Bioluminescence)

जीवदीप्ती

निसर्गत: काही पदार्थ विविध प्रकारे प्रकाशमान होतात. त्यातील प्रतिदीप्ती (Fluorescence), स्फुरदीप्ती (Phosphorescence), रासायनिक प्रतिदीप्ती (Chemical fluorescence) हे प्रमुख प्रकार आहेत ...
जीवनप्रक्रिया : नियंत्रण (Life process : Control)

जीवनप्रक्रिया : नियंत्रण

अत्यंत लहान सजीवांपासून ते मोठ्या सस्तन प्राण्यांपर्यंतच्या सजीवांची रचना गुंतागुंतीची असते. त्यांच्यामधील अंतर्गत कार्यांत जसे की, पोषक तत्त्वांचे शरीरातील वहन, ...
जीवनसत्त्व अ  (Vitamin A)

जीवनसत्त्व अ  

जीवनसत्त्व हे एक सेंद्रिय संयुग असून मेद विद्राव्य आहे. त्याची आहारातील आवश्यकता कमी आहे. परंतु, त्याच्या कमतरतेमुळे काही विकार ...
जीवनसत्त्व ई (Vitamin E)

जीवनसत्त्व ई

जीवनसत्त्व याचे रासायनिक नाव टोकोफेरॉल (Tocopherol) असे आहे. हे मेदविद्राव्य असून ऑक्सिडीकरण विरोधक गुणधर्माचे आहे. याची आठ मेदविद्राव्य संयुगे ...
जीवनसत्त्व क (Vitamin C)

जीवनसत्त्व क

जीवनसत्त्व पाण्यात विद्राव्य असून काही अन्नपदार्थांत ते नैसर्गिकरित्या सापडते. याचा समावेश ब जीवनसत्त्व समूहात होत नाही. याची रचना एकशर्करा ...
जीवनसत्त्व के (Vitamin K)

जीवनसत्त्व के

जीवनसत्त्व के मेदविद्राव्य आहे. मानवी शरीरामध्ये रक्त क्लथनासाठी (रक्त गोठण्यासाठी) आवश्यक असणाऱ्या पूर्व प्रथिनांचे संश्लेषण आणि हाडांमध्ये कॅल्शियमला बांधून ठेवणाऱ्या ...
जीवनसत्त्व ड (Vitamin D)

जीवनसत्त्व ड

जीवनसत्त्व मेदविद्राव्य असून याला ‘सनशाइन जीवनसत्त्व’ असेही म्हणतात. हे जीवनसत्त्व स्टेरॉइडसारख्या (Steroids) संरचनेत तसेच संप्रेरकांसारखे (Hormones) कार्य करते. ...
जीवनसत्त्व ब-समूह (B Complex Vitamins)

जीवनसत्त्व ब-समूह

प्रत्येक सजीवाची वाढ व जोपासना जीवनसत्त्वांवर अवलंबून असते. ब-समूह जीवनसत्त्वांचा समावेश जलविद्राव्य जीवनसत्त्वांमध्ये होतो. ब-समूह जीवनसत्त्वे ऊर्जानिर्मितीसंबंधी (Energy releasing) आणि रक्तवृद्धीसंबंधी ...
जीवनसत्त्वे (Vitamins)

जीवनसत्त्वे

जीवनसत्त्व म्हणजे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात सजीवास आवश्यक चयपचयास मदत करणारा असा कार्बनी रेणू आहे. यांपैकी काही आवश्यक रेणू सहसा शरीरात ...