ख्रिस्ती संत (Christian Saints)

‘संत’ हा शब्द इंग्रजीतील ‘सेंट’ या शब्दाचा मराठी पर्याय म्हणून वापरला आहे. सेंट हा इंग्रजी शब्द Sanctus (सॅन्क्टस) या लॅटिन, haegios (हिगीऑस) या ग्रीक आणि qadosh (कादोश) या हिब्रू शब्दांशी…

मजकूर-मंथन (Text Mining)

शोध संकेतस्थळाद्वारे दिलेल्या शब्दावरून इच्छित संकेतस्थळावर किंवा त्यामधील एखाद्या पानावर जाणे हे मजकूर-मंथन या विद्याशाखेमुळे शक्य होते. संख्या विश्लेषणात संख्यात्मक माहितीचा अभ्यास केला जातो तर मजकूर-मंथनात भाषेच्या रूपातील माहितीचा अभ्यास…

साथरोगशास्त्र व सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका (Epidemiology And Role of Community Health Nurse)

प्रस्तावना : साथरोग हा शब्द ग्रीक भाषेतील Epidemic या शब्दावरून आलेला आहे. निर्दिष्ट केलेल्या लोकसंख्येची आरोग्यासंबंधी स्थिती किंवा घटनेचे विभाजन व परिणामकारक घटकांचा अभ्यास आणि आरोग्य समस्येवरील नियंत्रण म्हणजे साथरोगशास्त्र…

संत गोन्सालो गार्सिया (St. Gonsalo Garcia)

गार्सिया, संत गोन्सालो : ( १५५७ - ५ फेब्रुवारी १५९७ ). भारतातील पहिले रोमन कॅथलिक संत. ते १८६२ या वर्षी पवित्र वेदीचा मान मिळालेले पहिले भारतीय कॅथलिक संत ठरले. प्रभू…

इजीअन कला : सिक्लाडिक कला (Aegean Art : Cycladic Art)

इजीअन समुद्रातील बेटांमध्ये तसेच आसपासच्या प्रदेशात अश्मयुग (इ. स. पू. ७००० ते ३०००) व प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगात (इ. स. पू. सु. ३००० ते ११००) विकसित झालेल्या यूरोपमधील पहिल्या प्रगत…

ग्रीन नदी (Green River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागातून वाहणारी कोलोरॅडो नदीची प्रमुख उपनदी. या नदीची लांबी १,१७५ किमी. व जलवाहन क्षेत्र १,१७,००० चौ. किमी. आहे. अमेरिकेच्या वायोमिंग, कोलोरॅडो व उटा या राज्यांतून ही…

खाडी (Creek, Channel etc.)

समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळा फाटा वा भाग म्हणजे खाडी होय. किनाऱ्यावरील सखल भाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे खाडी निर्माण होते. भरतीचे पाणी खाडीत शिरते आणि त्या पाण्याबरोबर…

फादर मॅथ्यू लेदर्ले (Father Matthew Lederle)

लेदर्ले, फादर मॅथ्यू : ( १३ मार्च १९२६—८ जून १९८६ ). ख्रिस्ती धर्मगुरू. त्यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला. प्रत्येक सशक्त तरुणाने काही काळ तरी लष्करामध्ये नोकरी करावी, हा त्या काळातील यूरोपियन…

ॲल्युमिनियम निष्कर्षण (Aluminium extraction)

ॲल्युमिनियम या धातूच्या निष्कर्षणाचे पुढील महत्त्वाचे टप्पे आहेत : (१) धातुपाषाणांपासून (Ore) शुद्ध ॲल्युमिना मिळविणे आणि (२) ॲल्युमिनाचे विद्युत् विच्छेदन करून निव्वळ धातू मिळविणे. (१) धातुपाषाणांपासून शुद्ध ॲल्युमिनाची प्राप्ती : प्रथम ॲल्युमिनियमचे धातुपाषाण…

रॉबर्ट डी नोबिली (Robert de Nobili)

डी नोबिली, फादर रॉबर्ट : ( १५७७—१६ जानेवारी १६५६ ). ख्रिस्ती धर्मप्रसारक. फादर डी नोबिली हे मूळचे इटलीचे रहिवासी. रोममधील एका उमराव घराण्यात त्यांचा जन्म झाला. ‘येशू संघ’ या कॅथलिक…

खचदरी (Rift Valley)

खंदकासारखा आकार असणाऱ्या दरीला खचदरी म्हणतात. समोरासमोर असलेल्या हिच्या भिंती एकमेकींना जवळजवळ समांतर असून त्यांचा उतार तीव्र असतो. भूकवचात परस्परांना समांतर असणारे सामान्य विभंग (तडे) निर्माण होतात आणि त्यांच्यादरम्यान असलेली…

खंडीय सीमाक्षेत्र (Continental Margin)

समुद्रकिनारा व खोल सागरी तळ यांच्या दरम्यान असलेल्या भूप्रदेशांना एकत्रितपणे खंडीय सीमाक्षेत्र म्हणतात. यामध्ये सामान्यपणे खंड-फळी (भूखंड मंच किंवा सागरमग्न खंडभूमी), खंडान्त उतार व खंडीय उंचवटा यांचा अंतर्भाव होतो. अशा…

जनार्दनपंत (Janardanpant)

जनार्दनपंत पेशवे : ( १० जुलै १७३५–२१ सप्टेंबर १७४९ ). मराठेशाहीतील श्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव (१७००–१७४०) यांचे पुत्र. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. बाजीरावांना काशीबाई या पत्नीपासून नानासाहेब, रामचंद्र, जनार्दन…

Read more about the article ढवळगड (Dhavalgad)
ढवळगड

ढवळगड (Dhavalgad)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला. हा किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर, समुद्रसपाटीपासून ८६४ मी. (पायथ्यापासून १०० मी.) उंचीवर वसलेला आहे. मराठी साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या…

कल्याणी चालुक्यांची नाणी (Coins of the Kalyani Chalukyas)

दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध राजवंश (इ. स. दहावे शतक ते तेराव्या शतकाची सुरुवात). कर्नाटकातील कल्याणी (बसवकल्याण) ही त्यांची राजधानी. कल्याणी चालुक्य राजवंशाला अनेकविध प्रकारची नाणी काढल्याचे श्रेय दिले जाते. यामध्ये…