(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

निर्मलजित सिंग सेखों (Nirmaljit Singh Sekhon)

निर्मलजित सिंग सेखों

सेखों, निर्मलजित सिंग : (१७ जुलै १९४५‒१४ डिसेंबर १९७१). भारतीय हवाई दलातील एक धाडसी, पराक्रमी वैमानिक आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी ...
पंचमस्तंभ (Fifth Column)

पंचमस्तंभ

स्वदेशाविरुद्ध शत्रूस घातपाताच्या मार्गाने साह्य करणारी देशद्रोही फितुरांची संघटना. विशेषतः युद्धकाळात हे लोक घातपात, हेरगिरी वा तत्सम राष्ट्रविरोधी कृत्ये करून ...
परभारी युद्ध (Proxy War)

परभारी युद्ध

ज्या दोन देशांमधील संघर्षात एक किंवा दोन्ही प्रतिस्पर्धी वेगवेगळ्या कारणांसाठी एकमेकांशी प्रत्यक्ष युद्ध करण्याचे टाळतात; परंतु आपले उद्दिष्ट त्यांना अनुकूल ...
परमशिव प्रभाकर कुमारमंगलम्‌ (Paramasiva Prabhakar Kumramangalam)

परमशिव प्रभाकर कुमारमंगलम्‌

कुमारमंगलम्‌, परमशिव प्रभाकर : (१ जुलै १९१३—१३ मार्च २०००). भारतीय भूसेनेचे भूतपूर्व सरसेनापती. १९३३ मध्ये भारतीय भूसेनेच्या तोफखाना दलात कमिशन. १९३३-३४ या काळात ...
पर्ल हार्बरवरील हल्ला (Pearl Harbor Attack)

पर्ल हार्बरवरील हल्ला

दुसर्‍या महायुद्धकाळात जपानने अमेरिकेतील हवाई राज्याच्या ओआहू बेटावरील नाविक तळावर दि. ७ डिसेंबर १९४१ रोजी अनपेक्षितपणे केलेला हवाई हल्ला. पार्श्वभूमी ...
पहिला चंद्रगुप्त (First Chandragupt)

पहिला चंद्रगुप्त

चंद्रगुप्त, पहिला : (कार. इ.स. ३१८ ‒ ३३५). गुप्त साम्राज्याच्या भक्कम पायाचा रचयिता म्हणून पहिला चंद्रगुप्त ओळखला जातो. कुशाण राज्याच्या ...
पानिपतची तिसरी लढाई (Third Battle Of Panipat)

पानिपतची तिसरी लढाई

पार्श्वभूमी : अफगाणिस्तानच्या पातशाहाने संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या आधिपत्याखाली आणल्यावर मुघल सत्तेवर स्वारी करण्याचे त्याने ठरविले आणि अफाट सैन्य घेऊन १७६० ...
पालखेडचा संग्राम (Battle of Palkhed)

पालखेडचा संग्राम

पहिला बाजीराव आणि निजाम-उल-मुल्क यांच्यामध्ये १७२८ साली औरंगाबादच्या नैऋत्येस २८ मैलांवर (सु. ४५ किमी.) असलेल्या पालखेड (गोदावरी नदीच्या तीरावर महाराष्ट्रातील ...
प्रताप चंद्र लाल (Pratap Chandra Lal)

प्रताप चंद्र लाल

लाल, प्रताप चंद्र : (६ डिसेंबर १९१६–१३ ऑगस्ट १९८२). भारताचे भूतपूर्व हवाई दलप्रमुख (१९६९–७३). लुधियाना (पंजाब राज्य) येथे बसंत व ...
प्ररोधन (Deterrence)

प्ररोधन

प्रस्तावना : ही संकल्पना गेली तीन-चार दशके आंतरराष्ट्रीय राजकारणाचे लक्ष वेधून घेत आहे. अणुयुगाचा आधार घेऊन सुरक्षाविषयक विचार मांडताना प्ररोधन ...
प्राणनाथ थापर (Prananath Thapar)

प्राणनाथ थापर

थापर, प्राणनाथ : (८ मे १९०६‒२३ जून १९७५). भारताचे माजी भूसेनाप्रमुख. लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात शिक्षण. इंग्‍लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात लष्करी शिक्षण ...
प्रेमिंद्र सिंग भगत (Premindra Singh Bhagat)

प्रेमिंद्र सिंग भगत

भगत, प्रेमिंद्र सिंग : (१४ ऑक्टोबर १९१८—२३ मे १९७५). दुसऱ्या महायुद्धात व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित केले गेलेले पहिले भारतीय लष्करी अधिकारी ...
फेर्दीनां फॉश (Ferdinand Foch)

फेर्दीनां फॉश

फॉश, फेर्दीनां : (२ ऑक्टोबर १८५१‒२० मार्च १९२९). पहिल्या महायुद्धातील दोस्तराष्ट्रांचा सर्वोच्च. ओत-पीरेने प्रांतातील तार्ब गावी एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्म ...
बसंतर नदीची लढाई (Battle of Basantar River)

बसंतर नदीची लढाई

पार्श्वभूमी : १९७१च्या भारत-पाक युद्धात पश्चिमी सीमेवर बसंतर नदीची लढाई सर्वांत महत्त्वाची आणि निर्णायक होती, जिच्यात पाकिस्तानच्या सैन्याचा दारुण पराभव झाला ...
बाना सिंग (Bana Singh)

बाना सिंग

सिंग, नायब सुभेदार बाना : (६ जानेवारी १९४९). भारतीय भूसेनेतील एक धाडसी, शूर सैनिक आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी पदाचे मानकरी. त्यांचा जन्म सामान्य शेतकरी शीख कुटुंबात ...
बार्बारोसाची लढाई (Battle of Barbarossa)

बार्बारोसाची लढाई

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी-रशिया यांत झालेले (दि. २२ जून १९४१–६ डिसेंबर १९४१) युद्ध. या मोहिमेला ‘बार्बारोसा मोहीम’ हे सांकेतिक नाव दिले ...
बिंबिसार (Bimbisar)

बिंबिसार

बिंबिसार : (इ.स.पू.सु. ५५८—४९१). बिंबिसार हा मगध राज्याचा राज्यकर्ता होता. बुद्धचरितानुसार हर्यंक या घराण्यातील भट्टिय नावाच्या एका छोट्या टोळीच्या प्रमुखाचा ...
बिमस्टेक (Bimstec)

बिमस्टेक

पार्श्वभूमी : बंगालच्या उपसागराच्या परिसरातील देशांची विविध क्षेत्रांतील आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकार्य संघटना. ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून बांगला ...
ब्रिक्स (Brics)

ब्रिक्स

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली वित्तीय संस्था. उपरोक्त पाचही देशांच्या इंग्रजी ...
भारत-चीन युद्ध, १९६२ (Indo-China War, 1962)

भारत-चीन युद्ध, १९६२

ठळक गोषवारा : भारत-चीन युद्ध हे भारताच्या ईशान्य आणि उत्तर सीमेवर २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर १९६२च्या दरम्यान झाले. त्यात भारतीय ...