(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

कोदेंदर सुबय्या थिमय्या (Kodandera Subayya Thimayya)

कोदेंदर सुबय्या थिमय्या

थिमय्या, कोदेंदर सुबय्या : (३१ मार्च १९०६‒१८ डिसेंबर १९६५). भारताचे भूतपूर्व सरसेनापती. जन्म कूर्ग (कर्नाटक) येथे. शालेय शिक्षण बंगलोर येथे ...
कोहीमाची लढाई  (Battle of Kohima)

कोहीमाची लढाई

भारताच्या ईशान्य प्रदेशातील इंफाळ व कोहीमा ही दोनच शहरे दुसर्‍या महायुद्धात जपानी सैन्याची लक्ष्य (टार्गेट) बनली होती. एप्रिल १९४४ मध्ये ...
क्योटो प्रोटोकॉल (Kyoto Protocol)

क्योटो प्रोटोकॉल

हा आंतरराष्ट्रीय करार असून ज्याचा उद्देश कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन आणि वातावरणातील हरितगृह वायू यांचे प्रमाण कमी करणे होय. हा करार ...
क्रांतिकारक युद्ध (Revolutionary War)

क्रांतिकारक युद्ध

ही संज्ञा अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाला अनुलक्षून आधुनिक इतिहासात प्रविष्ट झाली आहे. क्रांती या शब्दाचा रूढ अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे ...
गटनिरपेक्षता (Non-Alignment)

गटनिरपेक्षता

शीतयुद्धाच्या काळात लोकशाहीवादी अमेरिका आणि साम्यवादी सोव्हिएट युनियन यांच्यातील विचारसरणीमधील संघर्षातून अमेरिका व मित्र राष्ट्रे आणि सोव्हिएट युनियन व त्यांची ...
गस्तप्रक्रिया (Patrolling)

गस्तप्रक्रिया

युद्धाच्या आघाडीवर वेगवेगळ्या हालचाली आणि कारवाया सातत्याने चालू असतात. भावी कारवायांची पूर्वतयारी, योजनेच्या आराखड्यांची आखणी, शत्रूच्या ठावठिकाण्याविषयी आवश्यक माहिती गोळा ...
गोवा, दीव, दमण मुक्ती (Operation Vijay - 1961)

गोवा, दीव, दमण मुक्ती

योजना : गोवा काबीज करण्यासाठी एक इन्फन्ट्री डिव्हिजन, चिलखती दलाची एक रेजिमेंट, तोफखाना दलाचे दस्ते आणि भारतीय वायुदलाची लढाऊ विमाने ...
गौतमीपुत्र सातकर्णी (Gautamiputra Satakarni)

गौतमीपुत्र सातकर्णी

अमरावती, आंध्र प्रदेश येथील गौतमीपुत्र सातकर्णीचा पुतळा गौतमीपुत्र सातकर्णी : (कार. इ.स. ६२—८६). सातवाहन वंशातील एक बलाढ्य आणि थोर राजा ...
ग्यिऑर्गी झूकॉव्ह (Georgy Zhukov)

ग्यिऑर्गी झूकॉव्ह

झूकॉव्ह, ग्यिऑर्गी कन्स्टंट्यीनव्ह्यिच : (२ डिसेंबर १८९६‒१८ जून १९७४). रशियन मार्शल. कलूग प्रांतात जन्म. १९१५‒१७ या काळात रशियाच्या सेनेत शिपाई. १९१८ च्या ...
घटना प्रतिसाद प्रणाली (Incidence Response System)

घटना प्रतिसाद प्रणाली

भारत देश विविध नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींना वारंवार बळी पडतो आणि ही संकटे देशाच्या विकासात व्यत्यय निर्माण करतात. घटना ...
चंद्रगुप्त मौर्य (Chandragupta Maurya)

चंद्रगुप्त मौर्य

लक्ष्मीनारायण मंदिर नवी दिल्ली येथील चंद्रगुप्त मौर्याचा पुतळा चंद्रगुप्त मौर्य : (इ.स.पू. ३२१—२९७). चंद्रगुप्ताचा जन्म नंद घराण्यातला. धननंद या राज्यकर्त्याच्या ...
चेस्टर विल्यम निमित्स (Chester William Nimitz)

चेस्टर विल्यम निमित्स

निमित्स, चेस्टर विल्यम : (२४ फेब्रुवारी १८८५‒२० फेब्रुवारी १९६६). अमेरिकेच्या नौसेनेचा फ्लीट अ‍ॅड्‌मिरल. टेक्सस राज्यात फ्रेड्रिक्सबर्ग येथे जन्म. ॲन्नपोलिस येथील ...
जंगलमय प्रदेशातील युद्धपद्धती (Battlefield in Wilderness)

जंगलमय प्रदेशातील युद्धपद्धती

पार्श्वभूमी : वेगवेगळ्या भूभागांवर अवलंबिली जाणारी युद्धपद्धती त्या भूभागाच्या ठेवणीनुसार बदलते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेश, बर्फाळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश किंवा सखल ...
जदुनाथ सिंग (Jadunath Singh)

जदुनाथ सिंग

सिंग, नाईक जदुनाथ : (२१ नोव्हेंबर १९१६‒६ फेब्रुवारी १९४८). भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि मरणोत्तर परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात बिरबल सिंग ...
जनरल राजेंद्रसिंहजी (General Rajendrasinhaji)

जनरल राजेंद्रसिंहजी

जडेजा, जनरल राजेंद्रसिंहजी : (१५ जून १८९९‒१ जानेवारी १९६४). भारताचे दुसरे भूसेनाप्रमुख (१९५३–५५). सौराष्ट्रातील सरोदर येथे एका राजघराण्यात जन्म. राजकुमार कॉलेज ...
जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation)

जागतिक व्यापार संघटना

पार्श्वभूमी : जागतिक व्यापार संघटना ही आंतरशासकीय संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करते. दिनांक १५ एप्रिल १९९४ रोजी १२३ राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (District Disaster Management Athority)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

प्रस्तावना : विविध आपत्ती संदर्भांत प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन ...
जी-२० (G-20)

जी-२०

आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या २० देशांची आणि त्या देशांच्या केंद्रिय बँकेच्या गव्हर्नरांची एक संघटना. जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा ...
जी–८ (G-8)

जी–८

जी–८ हा आठ देशांचा एक गट आहे. मात्र सध्या या गटात सातच देश आहेत (रशियाने क्रिमियाच्या विलीनीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे रशियाला ...
जे. एन. चौधरी (J. N. Chaudhari)

जे. एन. चौधरी

चौधरी, जनरल जयंतनाथ : (१० जून १९०८—६ एप्रिल १९८६). भारताचे माजी भूसेनाप्रमुख. जन्म कलकत्ता येथे. शिक्षण कलकत्ता व लंडन येथे. सँडहर्स्ट (इंग्लंड) ...