(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

भारत-पाकिस्तान युद्ध, १९४७ (Indo-Pak War, 1947)

भारत-पाकिस्तान युद्ध, १९४७

पार्श्वभूमी : ३ जून १९४७ रोजी ब्रिटिश सरकारने ‘भारतीय स्वातंत्र्य कायद्या’ला संमती देऊन ब्रिटिश इंडियाची फाळणी भारत आणि पाकिस्तान या ...
भारत-पाकिस्तान युद्ध, १९६५ (Indo-Pak War, 1965)

भारत-पाकिस्तान युद्ध, १९६५

पार्श्वभूमी : काश्मीर हे पाकिस्तानात विलीन व्हावे ही सुप्त इच्छा १९४७-४८च्या युद्धानंतरसुद्धा पाकिस्तानने जोपासली होती आणि काश्मीर पादाक्रांत करण्याची संधीच ...
भारत-पाकिस्तान युद्ध, १९७१ (Indo-Pak War, 1971)

भारत-पाकिस्तान युद्ध, १९७१

ठळक गोषवारा : पार्श्वभूमी : १९६९ मध्ये फील्डमार्शल अयुबखानने पाकिस्तानच्या सत्तेची सूत्रे सेनाप्रमुख जनरल याह्याखानकडे सोपवल्यानंतर याह्याखानने १९७०च्या डिसेंबर महिन्यात ...
भारतीय संरक्षण आर्थिक नियोजन (Indian Defence Financial Planning)

भारतीय संरक्षण आर्थिक नियोजन

संरक्षण योजनेची सुरुवात : भारतात आर्थिक नियोजनाची सुरुवात १९५०-५१ मध्ये झाली. संरक्षण नियोजनदेखील याच काळात सुरू झाले; पण १९६२ पर्यंत ...
भास्कर सदाशिव सोमण (Bhaskar Sadashiv Soman)

भास्कर सदाशिव सोमण

सोमण, भास्कर सदाशिव : (३० मार्च १९१३‒८ फेब्रुवारी १९९५). स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. त्यांचा जन्म सदाशिव ऊर्फ बाबासाहेब आणि उमा या ...
भोपाळची लढाई (Battle of Bhopal)

भोपाळची लढाई

मोगलांचे, विशेषत: निजाम-उल्-मुल्क व मराठे यांत झालेले इ. स. १७३७-३८ दरम्यानचे युद्ध. पार्श्वभूमी : निजाम-उल्-मुल्कला दिल्लीमध्ये बोलावून त्याचा जंगी सत्कार ...
माँट्रियल करार (Montreal Protocol)

माँट्रियल करार

एक आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करार. १९७० पासून आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास, तपमानवाढ, ओझोनचा थर विरळ होणे या पर्यावरणीय समस्यांची संस्थात्मक ...
माधवेंद्र सिंग (Madhvendra Singh)

माधवेंद्र सिंग

सिंग, माधवेंद्र : (? १९४५). भारताचे माजी नौसेनाप्रमुख आणि एक निष्णात गोलंदाज. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात राजस्थानातील चोमू गावी (जि. जयपूर) झाला. त्यांचे वडील मेजर ...
मेजर पिरु सिंग (Major Piru Singh)

मेजर पिरु सिंग

सिंग, मेजर पिरु : (२० मे १९१८–१८ जुलै १९४८). एक पराक्रमी भारतीय सैनिक व परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म लष्करी परंपरा लाभलेल्या राजपूत शेतकरी कुटुंबात रामपुरा बेरी ...
मौर्यपूर्व काळातील सामरिक कार्यवाही (Strategic Action in Pre-Mourya Empires)

मौर्यपूर्व काळातील सामरिक कार्यवाही

प्राचीन काळापासून भारतात लढाया होत आल्या आहेत. इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ४०० वर्षांपर्यंत भारतात छोटीछोटी राज्ये, टोळ्या आणि जमाती होत्या ...
युद्धकैदी नियंत्रण (Management of Prisoners of War)

युद्धकैदी नियंत्रण

प्रस्तावना : जिनीव्हा करारानुसार विश्वातील सगळ्या राष्ट्रांनी युद्धकैदी नियंत्रण प्रणाली संमत केलेली आहे. त्यातील मुख्य तत्त्वे, घटक आणि व्यवस्थापनासंबंधी माहिती ...
युलिसिस सिम्पसन ग्रँट (Ulysses Simpson Grant)

युलिसिस सिम्पसन ग्रँट

ग्रँट, युलिसिस सिम्पसन :  (२७ एप्रिल १८२२—२३ जुलै १८८५). अमेरिकेचा अठरावा अध्यक्ष व कुशल सेनापती. ओहायओ संस्थानात पॉइंट प्लेझंट गावी जन्म ...
राजनय (Diplomacy)

राजनय

आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत स्वतंत्र देशांमध्ये परस्परसंबंध प्रस्थापित करणे आणि टिकवून ठेवण्याचे साधन म्हणजे राजनय होय. राजनयाला राजनीती, मुत्सद्देगिरी अशाही पर्यायी संज्ञा ...
राजनयाचे प्रकार (Types of Diplomacy)

राजनयाचे प्रकार

जुना आणि नवा राजनय (Old and New Diplomacy) : ‘जुना राजनय’ ही संज्ञा सर्वसाधारणपणे पहिल्या महायुद्धापर्यंत प्रचलित असलेल्या पारंपरिक राजनयिक ...
रामदास कटारी (Ramdas Katari)

रामदास कटारी

कटारी, रामदास : (८ ऑक्टोबर १९११—२१ जानेवारी १९८३). भारताचे माजी नौसेनाप्रमुख. जन्म तमिळनाडूमधील चिंगलपुट येथे. वडिलांचे नाव एस. व्ही. नायडू ...
राष्ट्र (Nation)

राष्ट्र

राष्ट्र म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अस्तित्व असलेल्या आणि त्यायोगे आपली  वेगळी ओळख निर्माण करणा‍र्‍या लोकांचा एक समुदाय. अशा समुदायातील ...
राष्ट्र-राज्य (Nation-State)

राष्ट्र-राज्य

राष्ट्र या संकल्पनेचे वैधानिक राज्यसंस्थेत होणारे स्थित्यंतर म्हणजे राष्ट्र-राज्य होय.राष्ट्र किंवा राष्ट्रीय भावना या कल्पना संधिग्ध आहेत. त्यामुळे त्यांना वैधानिक ...
राष्ट्रकुल परिषद (Commonwealth)

राष्ट्रकुल परिषद

पार्श्वभूमी : राष्ट्रकुल परिषद ही पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात असलेल्या ५२ देशांची संघटना आहे. या संघटनेला पूर्वी ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ म्हणत असत ...
राष्ट्रवाद (Nationalism)

राष्ट्रवाद

राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानून त्यांवर निष्ठा ठेवणारी आधुनिक राजकीय प्रणाली व त्यावर आधारलेला ध्येयवाद. एकोणिसाव्या शतकपासून, विशेषत: औद्योगिक ...
राष्ट्रहित (National Interest)

राष्ट्रहित

आपण जेव्हा राष्ट्रहिताबद्दल बोलतो तेव्हा आपण राष्ट्राच्या भल्याचा विचार करत असतो. ही चर्चा नफ़ा-तोटा किंवा (एक अमूर्त घटक म्हणून) राज्याच्या ...