(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

जैविक युद्ध (Biological Warfare)

जैविक युद्ध

प्रस्तावना : जैविक युद्धामध्ये जिवंत जीवजंतू आणि त्यांच्यापासून उत्पादित पदार्थांचा वापर केला जातो. परंपरागत जैविक युद्धात सूक्ष्म जीवाणू, सूक्ष्मातिसूक्ष्म रोगजंतू, ...
जॉर्ज स्मिथ पॅटन (George Smith Patton)

जॉर्ज स्मिथ पॅटन

पॅटन, जॉर्ज स्मिथ : (११ नोव्हेंबर १८८५‒२१ डिसेंबर १९४५). अमेरिकन जनरल व चिलखती रणगाड्याच्या युद्धतंत्रातील तज्ज्ञ. कॅलिफोर्निया राज्यात सॅन गाब्रीएल गावी जन्म ...
जोखीम मूल्यांकन (Risk Assessment)

जोखीम मूल्यांकन

जोखीम मूल्यांकन केवळ जोखीम विशालतेचे मूल्यांकनच करत नाही, तर संभाव्य नुकसानाची शक्यता, त्यामागील कारणे आणि त्याचा परिणाम समजून घेणे आणि ...
जोगिंदर जसवंत सिंग (Joginder Jaswant Singh)

जोगिंदर जसवंत सिंग

सिंग, जोगिंदर जसवंत : (१७ एप्रिल १९४५). भारतीय भूदलाचे प्रमुख. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात भावलपूर (पाकिस्तान ) येथे झाला ...
झोरावर चंद बक्षी (Zorawar Chand Bakshi)

झोरावर चंद बक्षी

बक्षी, झोरावर चंद : (२१ ऑक्टोबर १९२१—२४ मे २०१८). भारतीय भूसेनेतील एक धाडसी, शूर सैनिक आणि महावीरचक्र या लष्करी पदकाचे ...
डेनिस अँटनी ला फाँतेन (La Fontaine Denis Anthony)

डेनिस अँटनी ला फाँतेन

ला फाँतेन, डेनिस अँटनी : (१७ सप्टेंबर १९२९—६ एप्रिल २०११). भारताचे भूतपूर्व हवाई दल प्रमुख. जन्म मद्रास येथे. वडील स्वातंत्र्यपूर्व ...
ड्युरँड रेषा (Durand Line)

ड्युरँड रेषा

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषा म्हणजे ड्युरँड रेषा. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ही आंतरराष्ट्रीय सीमा समजली जाते. पार्श्वभूमी : रशिया १८८० पासून ...
तवांगची लढाई (Battle of Tawang)

तवांगची लढाई

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : भारतीय सैन्याच्या ४ इन्फन्ट्री ब्रिगेडने नामकाचू नदीवर उभारलेल्या मोर्चावर दिनांक २० ऑक्टोबर १९६२ ...
तापीश्वर नारायण रैना (Tapishwar Narain Raina)

तापीश्वर नारायण रैना

रैना, तापीश्वर नारायण : (२१ ऑगस्ट १९२१ – १९ मे १९८०). भारताचे माजी भूसेनाप्रमुख (१९७५–७९). जन्म जम्मू येथे एका सुविद्य ...
तोफखाना (Artillery)

तोफखाना

प्रगतीचा इतिहास : पूर्वी समोरासमोरील लढ्यात सैनिक हातघाईची शस्त्रे वापरीत असत. कालांतराने शत्रूवर दुरून मारा करण्याच्या कलेचा आणि अस्त्रांचा उदय ...
दिएन-बिएन फूची लढाई (Battle of Dien-Bien Phu)

दिएन-बिएन फूची लढाई

हे उत्तर व्हिएटनाममधील एक रणक्षेत्र असून तिथे दि. १३ मार्च ते ८ मे १९५४ दरम्यान वसाहतवादी फ्रेंच सैन्य आणि आधुनिक ...
दिलबाघ सिंग (Dilbagh Singh)

दिलबाघ सिंग

सिंग, दिलबाघ : (१० मार्च १९२६‒९ फेब्रुवारी २००१). भारतीय हवाई दलाचे प्रमुख. त्यांचा जन्म गुरदासपूर (पंजाब) येथे लष्करी वारसा असलेल्या कुटुंबात झाला ...
दुसरा चंद्रगुप्त (Second Chandragupt)

दुसरा चंद्रगुप्त

चंद्रगुप्त, दुसरा : (इ.स. ३८० ‒ इ.स. ४१५). समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीनंतर त्याचा जेष्ठ पुत्र रामगुप्त गादीवर आला. शक राजाने रामगुप्तावर आक्रमण ...
धोके / संकटे (Hazard)

धोके / संकटे

आपत्ती निवारणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय रणनीतीनुसार (UNISDR) ‘धोका’ ही एक नैसर्गिक प्रक्रिया किंवा इंद्रियगोचर आहे, ज्यामुळे नैसर्गिक घटक आणि मानवी ...
नदीमय प्रदेशातील युद्धपद्धती (Operations in Riverine Terrain)

नदीमय प्रदेशातील युद्धपद्धती

भूभागाचे वैशिष्ट्य : ज्या भूभागात एक किंवा अधिक नद्या, कालवे, पाणीपुरवठ्यासाठी किंवा संरक्षणासाठी खोदलेले पाटबंधारे, त्यांच्या दोन्ही बाजूंस असलेले बांध, ...
नव-उदारमतवाद (Neo-Liberalism)

नव-उदारमतवाद

उदारमतवादी आणि नव-उदारमतवादी विचारांमधील प्रमुख भेद रॉबर्ट कोहेन याने मांडला आहे. मूळ उदारमतवादी सिद्धांतामागील गृहीतक हे आहे की, देशांमधील व्यापार ...
नाफ्टा (NAFTA)

नाफ्टा

पार्श्वभूमी : उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार (North American Free Trade Agreement) असा त्याचा पूर्णरूप होतो. हा करार कॅनडा, मेक्सिको ...
नामकाचूची लढाई (Battle of Namkachu)

नामकाचूची लढाई

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : संरक्षणमंत्री कृष्ण मेनन, आयबी. (Intelligence Bureau) प्रमुख बी. एन. मलिक आणि लेफ्टनंट जनरल बी ...
निम्न राजकारण (Low Politics)

निम्न राजकारण

निम्न राजकारणामध्ये राष्ट्रा-राष्ट्रांमधील व्यापार, पर्यावरण, मानवी हक्क, दहशतवादाविरोधी लढा इत्यादी सामाजिक तसेच लोककल्याणकारी विषयांचा समावेश होतो. त्यांच्याशी संबंधित उद्भवलेले विवाद ...
निर्मल चंद्र सूरी (Nirmal Chandra Suri)

निर्मल चंद्र सूरी

सूरी, निर्मल चंद्र : (२६ जुलै १९३३). भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख व एक निष्णात वैमानिक. त्यांचा जन्म सुशिक्षित व ...