(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मानवी संस्कृतीची वाटचाल गेली किमान २५ लक्ष वर्षे सुरू आहे. वर्तमानकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल, ही मानवाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडील पाच-सहा हजार वर्षांमधील आहे. तत्पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. प्राचीन मानवाचा वावर असलेल्या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून मानवी वसाहतींच्या समग्र सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करण्याचे काम पुरातत्त्वविद्या करते. आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन नसून ती एक इतिहासाला मदत करणारी, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे.

पुरातत्त्वविद्येमध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण व उत्खनन करून अवशेष जमा केले जातात. उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अर्थान्वय विविध वैज्ञानिक अनेक ज्ञानशाखांची मदत घेऊन करतात. केवळ छंद अथवा अर्थप्राप्तीच्या लोभातून प्रारंभ झालेली पुरातत्त्वविद्या एकविसाव्या शतकात किती आणि कशी विकसित झाली, याचा परामर्श प्रस्तुत ज्ञानमंडळ घेणार आहे. पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. तसेच पुरातत्त्वविद्येची स्वतंत्र उद्दिष्टे असून स्वतंत्र संशोधनपद्धती आहे. पुरातत्त्वविद्येच्या वैकासिक उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या अभ्यासकांची व महत्त्वाच्या प्रसिद्ध उत्खनित पुरातत्त्वीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न हे ज्ञानमंडळ करेल.

इतिहासपूर्व काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधितात. याच काळात शिकार करून व अन्न गोळा करून राहणाऱ्या मानवी समूहांमधून अन्न निर्माण करण्याचे तंत्र अवगत केलेल्या आणि एका जागी स्थिर झालेल्या मानवी संस्कृतींचा विकास झाला. प्रागैतिहासिक काळामध्ये म्हणजे सुमारे पंचवीस लक्ष वर्षे ते आजपासून अंदाजे दहा हजार वर्षे पूर्वीपर्यंतच्या कालखंडात घडलेल्या मानवी संस्कृतीमधील विविध बदलांचा मागोवा हे ज्ञानमंडळ घेईल.

आद्य ऐतिहासिक कालखंडात मानवाने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. यामुळे मानवाचे जीवन स्थिर झाले व मोठ्या वसाहती तयार झाल्या. शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त धान्य उत्पादनाची साठवणूक करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि त्यांचा वापर देवघेव करण्यासाठी केला गेला. यातूनच पुढे व्यापार सुरू झाला आणि मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ह्याचे उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती होय. आद्य ऐतिहासिक कालखंड हा दहा हजार वर्षे ते दोन हजार वर्षे असा आहे. या दरम्यान सिंधू संस्कृती, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि नवाश्मयुगीन संस्कृतीचा उगम तसेच विकास कसा होत गेला, याचाही मागोवा या ज्ञानमंडळाद्वारे घेतला जाईल.

एफ. आर. अल्चिन (F. R. Allchin)

एफ. आर. अल्चिन

अल्चिन, फ्रँक रेमंड : (९ जुलै १९२३–४ जून २०१०). विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडनच्या हॅरो या उपनगरात झाला. रेमंड ...
एफ. ई. झॉयनर (Frederick Everard Zeuner)

एफ. ई. झॉयनर

झॉयनर, फ्रिडरिक ईव्हरार्ड : (८ मार्च १९०५–५ नोव्हेंबर १९६३). विख्यात जर्मन भूपुरातत्त्वज्ञ आणि पुराजीववैज्ञानिक. त्यांचा जन्म जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये रोजी ...
एर्गास्टर मानव (Homo ergaster)

एर्गास्टर मानव

एक विलुप्त पुरातन मानवी जाती. केन्यातील (केनिया) कूबी फोरा या पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळावर केनियन अभ्यासक बर्नार्ड नेगीनो आणि ...
एस. आर. राव (S. R. Rao)

एस. आर. राव

राव, शिकारीपुरा रंगनाथ : (१ जुलै १९२२–३ जानेवारी २०१३). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ आणि भारतीय सागरी पुरातत्त्वाचे जनक. त्यांचा जन्म कर्नाटकमधील ...
ऐतिहासिक पुरातत्त्व (Historical Archaeology)

ऐतिहासिक पुरातत्त्व

कालखंडावर आधारलेली पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची शाखा. ज्या काळाबद्दल लिखित स्वरूपातील माहिती उपलब्ध आहे अशा म्हणजे ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतींचा पुरातत्त्वीय ...
ऑगुस्त मॅरिएट (Auguste Mariette)

ऑगुस्त मॅरिएट

मॅरिएट, ऑगुस्त : (११ फेब्रुवारी १८२१–१९ जानेवारी १८८१). विख्यात फ्रेंच पुरातत्त्वज्ञ आणि इजिप्तविद्या अभ्यासक. पूर्ण नाव ऑगुस्त फर्डिनांड फ्रान्स्वा मॅरिएट ...
ऑब्सिडियन हायड्रेशन (ज्वालाकाच जलसंयोग) कालमापन (Obsidian Hydration Dating)

ऑब्सिडियन हायड्रेशन

कालमापनाची ही एक भूरासायनिक पद्धती असून ऑब्सिडियन काचेपासून बनविलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या कालमापनासाठी ती उपयोगी पडते. ऑब्सिडियन पद्धतीची सुरुवात १९६० मध्ये ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस  डेअिरेमेडा (Australopithecus deyiremeda)

ऑस्ट्रॅलोपिथेकस  डेअिरेमेडा

ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा हे एका नव्याने सापडलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजातीचे नाव आहे. इथिओपियात अफार भागात वोरान्सो-मिली या ठिकाणी इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ योहानेस हाइली-सेलॅसी ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस  बहरेलगझाली (Australopithecus bahrelghazali)

ऑस्ट्रॅलोपिथेकस  बहरेलगझाली

ऑस्ट्रॅलोपिथेकस बहरेलगझाली हे दक्षिण व पूर्व आफ्रिकेच्या बाहेर मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या पहिल्या प्रजातीचे नाव आहे. या प्रजातीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस  सेडिबा (Australopithecus sediba) 

ऑस्ट्रॅलोपिथेकस  सेडिबा

ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा ही मानवी उत्क्रांतीसंबंधी महत्त्वाचा दुवा असलेली प्रजात १९.८ लक्ष वर्षपूर्व या काळात आफ्रिकेत अस्तित्वात होती. या प्रजातीचा शोध ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस (Australopithecus)

ऑस्ट्रॅलोपिथेकस

ऑस्ट्रॅलोपिथेकस हे मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत उगम पावलेल्या व नंतर नामशेष झालेल्या पराजातीचे (Genus) नाव आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस याचा शब्दशः अर्थ ‘दक्षिणेकडील कपीʼ ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस (Australopithecus anamensis)

ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस

ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस ही ऑस्ट्रॅलोपिथेकस पराजातींमधील सर्वांत अगोदर उत्क्रांत झालेली प्रजात. या प्रजातीचे जीवाश्म ४२ ते ३९ लक्षवर्षपूर्व या काळातील असून ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis)

ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस

ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis) ही मानवी उत्क्रांतीशी थेट संबंध असलेली व दीर्घकाळ अस्तित्वात असलेली प्रजात होती. हे मानवसदृश प्राणी सुमारे ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (Australopithecus africanus)

ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस

ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (आफ्रिकॅनस) ही मानव आणि कपी यांची एक महत्त्वाची प्रजात. साधारण ३३ लक्षपूर्व ते २१ लक्षपूर्व या काळात ही ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही (Australopithecus garhi)

ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही

इथिओपियात मिळालेली एक ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजात. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ बेरहान अस्फाव आणि त्यांचे अमेरिकन सहकारी टीम व्हाइट यांना मध्य आवाश भागात बौरी ...
ओरोरिन (Orrorin)

ओरोरिन

ओरोरिन टुजेनेन्सिस (Orrorin tugenensis) ही मानवी उत्क्रांतीशी संबधित जीवाश्मस्वरूपात मिळालेली एक प्रायमेट प्रजात. ओरोरिन टुजेनेन्सिस हा शब्द केनियातील स्थानिक भाषेत ...
ओल्डुवायी गॉर्ज (Olduvai Gorge) (Oldupai Gorge)

ओल्डुवायी गॉर्ज

आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडील ‘द ग्रेट रिफ्ट व्हॅली’ (महाखचदरी) भागातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ‘ओल्डुपायी गॉर्ज’ या नावानेही प्रसिद्ध. हे स्थळ ...
औद्योगिक पुरातत्त्व (Industrial Archaeology)

औद्योगिक पुरातत्त्व

औद्योगिक पुरातत्त्व ही विसाव्या शतकाच्या मध्यावर उदयाला आलेली पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची उपशाखा आहे. या उपशाखेचा मुख्य उद्देश मानवी इतिहासातील औद्योगिक ...
कराड (Karad)

कराड

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळ. कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमावर हे स्थळ वसलेले आहे. कराड ...
कार्बन-१४ कालमापन पद्धती (रेडिओकार्बन) (Radiocarbon or Carbon-14 Dating)

कार्बन-१४ कालमापन पद्धती

प्राचीन अवशेषांच्या कालमापनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रारणमापनाच्या भौतिकी रासायनिक पद्धतींमधील सर्वांत प्रसिद्ध पद्धती. ही पद्धत प्राचीन वस्तूतील किरणोत्सारी कार्बन-१४ या समस्थानिकाचे ...