(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

अहमद नज़ीर ( Ahmad Najeer)

अहमद नज़ीर

नज़ीर, अहमद  (२७ जानेवारी १९३२ – ८ जून २०१३). कॅरिबियन मृदाशास्त्रज्ञ. प्राध्यापक डॉ. नज़ीर अहमद हे त्यांच्या उष्ण प्रदेशीय  मृदेवरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले ...
अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी (Ampere, Andre Marie)

अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी

अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी : ( २० जानेवारी १७७५ ते १० जून १८३६ ) अ‍ॅम्पियर ह्यांनी कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतले ...
आइकमान क्रिस्तिआन (Eijkman Christian)

आइकमान क्रिस्तिआन

क्रिस्तिआन, आइकमान :   (११ ऑगस्ट, १८५८  ते  ५ नोव्हेंबर, १९३०) क्रिस्तिआन आइकमान यांचा जन्म नेदरलँड्समधील नियकर्क येथे झाला. त्यांचे ...
आइनस्टाइन, अल्बर्ट  (Einstein, Albert)

आइनस्टाइन, अल्बर्ट 

आइनस्टाइन, अल्बर्ट : (१४ मार्च १८७९ – १८ एप्रिल १९५५) मूळचे जर्मनीत जन्मलेले अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन ह्यांना २० व्या शतकातील ...
आकाशमित्र, कल्याण (Akashamitra, Kalyan)

आकाशमित्र, कल्याण

(स्थापना : ऑगस्ट १९८६). आकाशमित्र एक हौशी खगोलशास्त्रज्ञ संस्था आहे. खगोलशास्त्र लोकप्रिय करणे आणि विद्यार्थ्यांना, खगोलशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात उपयुक्त योगदान ...
आघारकर संशोधन संस्था (Agharkar Research Institute)

आघारकर संशोधन संस्था

           आघारकर संशोधन संस्थेची इमारत, पुणे. आघारकर संशोधन संस्था : (स्थापना – १९४६) पुण्यात असलेली आघारकर ...
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (International Institute for Population Sciences)

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था : (स्थापना १९५६) आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था ही इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिक ...
आतियाह, एम. एफ. (Atiyah, M. F.)

आतियाह, एम. एफ.

आतियाह, एम. एफ. : ( २२ एप्रिल, १९२९ – ११ जानेवारी, २०१९ ) मायकेल फ्रान्सिस आतियाह हे भूमितिमध्ये विशेष प्राविण्य ...
आंतॉन व्हान लेव्हेनहूक (Antony Van Leeuwenhoek)

आंतॉन व्हान लेव्हेनहूक

लेव्हेनहूक, आंतॉन व्हान : (२४ ऑक्टोबर १६३२ —  २६ ऑगस्ट १७२३). डच सूक्ष्मदर्शकीविज्ञ व जीववैज्ञानिक. सूक्ष्मदर्शकाचा वापर करून त्यांनी सर्वप्रथम जीवाणू ...
आदित्य नारायण पुरोहित (Aditya Narayan Purohit)

आदित्य नारायण पुरोहित

पुरोहित, आदित्य नारायण  : (३० जुलै १९४०-) आदित्य नारायण पुरोहित यांचा जन्म चमोली जिल्ह्यातील किमनी या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ...
आंद्रिया सीझाल्पिनो (Andrea Cesalpino)

आंद्रिया सीझाल्पिनो

सीझाल्पिनो आंद्रिया : (६ जून १५१९ – २३ फेब्रुवारी १६०३) आंद्रिया सीझाल्पिनो यांचा जन्म इटालीतील अरेझ्झो, टस्कॅनी येथे झाला. त्यांच्या वैयक्तिक ...
आंद्रे मिशेल लॉफ (André Michel Lwoff)

आंद्रे मिशेल लॉफ

लॉफ, आंद्रे मिशेल : ( ८ मे १९०२ ते ३० सप्टेंबर १९९४ ) आंद्रे लॉफ यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीची सुरुवात वयाच्या १९ ...
आनंद दिनकर कर्वे (Anand Dinkar Karve)

आनंद दिनकर कर्वे

कर्वे, आनंद दिनकर : (७ ऑगस्ट  १९३६). भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी जैवखाद्यापासून जैवइंधन आणि शेतीतील कचऱ्यापासून कांडी ...
आय. व्ही. सुब्बा राव (I. V. Subba Rao)

आय. व्ही. सुब्बा राव

सुब्बा राव, आय. व्ही. : (२० डिसेंबर १९३४ – १४ ऑगस्ट २०१०). भारतीय मृदाशास्त्रज्ञ व कृषिशास्त्रज्ञ. त्यांचे संपूर्ण नाव इदुपुगांती ...
आयफल, आलेक्झांडर गुस्ताव्ह  (Eiffel, Alexandre Gustave)

आयफल, आलेक्झांडर गुस्ताव्ह 

आयफल, आलेक्झांडर गुस्ताव्ह : ( १५ डिसेंबर १८३२ – २७ डिसेंबर १९२३ )  अलेक्झांडर गुस्ताव्ह आयफल या मूळ जर्मन ...
आयुर्वेद संशोधन केंद्र (Ayurvedic Research Center)

आयुर्वेद संशोधन केंद्र

आयुर्वेद संशोधन केंद्र : (स्थापना – १९८९) १९७० च्या आसपास औषधीशास्त्राचे (फार्माकॉलॉजी) वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय ...
आयुष (Ayush)

आयुष

आयुष ही वैद्यक क्षेत्रांत संशोधन करणारी भारत सरकारची संस्था आहे . आयुर्वेद,  सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी या चार (योग आणि ...
आरती (ARTI)

आरती

(स्थापना – १९९६). आरती हे ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (Appropriate Rural Technology Institute) या संस्थेचे संक्षिप्त नाव आहे. १९९६साली वीस ...
आंरी कॅर्ताँ (Henri Cartan)

आंरी कॅर्ताँ

कॅर्ताँ, आंरी (कार्टन, हेन्री)  (८ जुलै १९०४ – १३ ऑगस्ट २००८). फ्रेंच गणितज्ज्ञ. त्यांचे  संपूर्ण नाव आंरी-पॉल कॅर्ताँ. कॅर्ताँ यांनी ...
आर्चिबाल्ड एडवर्ड गॅरॉड ( Archibald Edward Garrod)

आर्चिबाल्ड एडवर्ड गॅरॉड

गॅरॉड, आर्चिबाल्ड एडवर्ड : (२५ नोव्हेंबर १८५७ – २८ मार्च १९३६ )आर्चिबाल्ड एडवर्ड गॅरॉड यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ...