(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

आर्थर रीग्ज (Arthur Riggs)

आर्थर रीग्ज

रीग्ज, आर्थर : (१९३९) आर्थर रिग्ज यांचा जन्म कॅलिफोर्निया येथे मोडेस्टोमध्ये (Modesto) झाला. त्यांचे जनुकशास्त्र हे अभ्यासाचे क्षेत्र होते. त्यांचे ...
आर्थर होम्स (Arthur Homes)

आर्थर होम्स

होम्स, आर्थर :  (१४ जानेवारी १८९० – २० सप्टेंबर १९६५) आर्थर होम्स यांचा जन्म ईशान्य इंग्लंडमधील हेबर्न येथे झाला. रॉयल कॉलेज ऑफ ...
आर्मीन डेल कायजर  (Armin Dale Kaiser)

आर्मीन डेल कायजर 

कायजर, आर्मीन डेल :    (१० नोव्हेंबर १९२७ – ५ जून २०२०) आरमिन डेल कायजर यांचा जन्म  अमेरिकेच्या ओहायो राज्यात ...
आर्यभट, दुसरे (Aryabhat, Second)

आर्यभट, दुसरे

(अंदाजे इ. स. ९२० — इ. स. १०००). आर्यभट (दुसरे) यांच्याविषयी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यांचा महासिद्धान्त हा खगोलगणितावरील ...
आर्यभट, पहिले (Aryabhat, First)

आर्यभट, पहिले

आर्यभट, पहिले. (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका, IUCAA), पुणे येथील) (इ.स. ४७६ – अंदाजे इ.स. ५५०). भारतीय गणित ...
आल्फ्रेट व्हेर्नर (Alfred Werner)

आल्फ्रेट व्हेर्नर

व्हेर्नर, आल्फ्रेट : (१२ डिसेंबर १८६६ – १५ नोव्हेंबर १९१९ ). फ्रेंच-स्विस रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी सहसंबद्ध सिद्धांत (Coordination Theory; Werner’s Theory of Coordinate Compounds) प्रतिपादित केला. या सिद्धांतामुळे ...
आल्फ्रेड जे. लोटका (Alfred J. Lotka)

आल्फ्रेड जे. लोटका

लोटका, आल्फ्रेड जे. : (२ मार्च, १८८० ते ५ डिसेंबर १९४९) लोटका यांचा जन्म ऑस्ट्रियातील (सध्याचे युक्रेन) लेम्बर्ग येथे झाला ...
आल्फ्रेड तार्स्की  (A. Tarski)

आल्फ्रेड तार्स्की

तार्स्की, आल्फ्रेड :  (१४ जानेवारी, १९०१ ते २६ ऑक्टोबर, १९८३) पोलिश–अमेरिकन गणिती व तर्कशास्त्रज्ञ तार्स्की यांचा जन्म आणि शिक्षणही पोलंडमधील वॉरसॉ ...
आल्फ्रेड थीओडोर मेक्काँकी (Alfred Theodore MacConkey)

आल्फ्रेड थीओडोर मेक्काँकी

मेक्काँकी, आल्फ्रेड थीओडोर : (१८६१ — १७ मे १९३१). ब्रिटीश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी मेक्काँकी नावाचे आगर विकसीत केले. मेक्काँकी आगर हे ...
आल्फ्रेड मॅगिल्टन बेस्ट (Alfred Magilton Best)

आल्फ्रेड मॅगिल्टन बेस्ट

बेस्ट, आल्फ्रेड मॅगिल्टन : (३१ ऑगस्ट १८७६ – ६ मे १९५८) क्लॅडवेल, न्यू जर्सी येथे जन्मलेल्या आल्फ्रेड मॅगिल्टन बेस्ट यांनी वयाच्या ...
आल्फ्रेड रसेल वॉलेस (Alfred Russel Wallace)

आल्फ्रेड रसेल वॉलेस

वॉलेस, आल्फ्रेड रसेल : (८ जानेवारी १८२३  – ७ नोव्हेंबर १९१३ ) आल्फ्रेड रसेल वॉलेस यांचा जन्म युनायटेड किंग्डमचा घटक असलेल्या, वेल्स ...
आल्फ्रेड हेन्री स्टर्टेव्हान्ट (Alfred Henry Sturtevant)

आल्फ्रेड हेन्री स्टर्टेव्हान्ट

स्टर्टेव्हान्ट, आल्फ्रेड हेन्री : (२१ नोव्हेंबर १८९१ – ५ एप्रिल १९७०) आल्फ्रेड हेन्री स्टर्टेव्हान्ट यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील जॅक्सनव्हिल या ...
आल्बेर कालमेट (Albert Calmette)

आल्बेर कालमेट

कालमेट,आल्बेर : ( १२ जुलै १८६३ – २९ ऑक्टोंबर १९३३ ). फ्रेंच जीवाणुशास्त्रज्ञ.  त्यांचे संपूर्ण नाव लेआँ शार्ल आल्बेर कालमेट ...
इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (International Indian Statistical Association)

इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन

इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन : (स्थापना – १९९२-९३) इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (IISA) ही संस्था १९९२-९३ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची ...
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, आयएसओ (International organization for standardization, ISO)

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, आयएसओ

आयएसओ मुख्यालय, जिनिव्हा आयएसओ हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन या नावाचे संक्षिप्त रूप आहे. आयएसओ ही आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था असून ...
इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अ‍ॅन्ड नॅचरल रिसोर्सेस - आययूसीएन (IUCN)

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अ‍ॅन्ड नॅचरल रिसोर्सेस – आययूसीएन

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अ‍ॅन्ड नॅचरल रिसोर्सेस – आययूसीएन : (स्थापना: ५ ऑक्टोबर, १९४८) आंतरराष्ट्रीय निसर्ग व नैसर्गिक स्रोत संवर्धन ...
इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री (आययुपॅक) (शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था, International Union of Pure and Applied Chemistry- IUPAC)

इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री

इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री (आययुपॅक) (शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था, International Union of Pure and Applied ...
इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी (International Centre for Genetic Engineering and Biotechnology - ICGEB)

इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी

इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी :  ( स्थापना – १९८३ ) संयुक्त राष्ट्र संघाच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या  (युनायटेड ...
इटाकुरा, कैची ( Itakura, Keiichi)

इटाकुरा, कैची

इटाकुरा, कैची : ( १८ फेब्रुवारी, १९४२ )  कैची इटाकुरा यांचा जन्म टोकियो, जपान येथे झाला. ते सेंद्रिय रसायन शास्त्रज्ञ आहेत ...
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (Indian Institute of Petrolium)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम

(स्थापना – १९६०) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (आय.आय.पी.)ही संस्था देहरादून येथे आहे. तिची स्थापना १९६०साली झाली. इंधने, वंगणे, द्रावणे इत्यादी ...