विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग पहिला अंकुरण ते ग्लुकोज (सु. २८३ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.
अंकुशकृमी तोंडामध्ये अंकुश अथवा आकडे असलेल्या परजीवी, अपायकारक कृमीला ‘अंकुशकृमी’ म्हणतात. अंकुशकृमी हा सूत्रकृमी (नेमॅटोडा) संघातील असून याचे शास्त्रीय नाव अँकिलोस्टोमा ...
अक्कलकाराचे स्तबक अक्कलकारा ही कंपॉझिटी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव स्पायलँथिस ऍक्मेला आहे. ही औषधी वनस्पती भारत, श्रीलंका व फिलिपीन्स या ...
अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव हार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील ...
शाश्वत विकासघटकांचा परस्परसंबंध एकविसाव्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबत केलेला एक आराखडा. इ.स. १९९२ मध्ये ब्राझीलमधील रीओ दे जानेरो येथे संयुक्त ...
पेंग्विन :अंटार्क्टिकाचे वैशिष्टय. हे पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते ...
उभयलिंगी प्राण्यांच्या किंवा स्त्रीलिंगी प्राण्यांच्या अंडाशयात निर्माण होणार्या प्रजननक्षम पेशीला ‘अंड’ (अंडाणू) म्हणतात. या परिपक्व अंडपेशीचा शुक्रपेशीबरोबर संयोग होऊन गर्भाची ...
वनस्पतीचे अंडाशय सपुष्प वनस्पतीच्या लैंगिक प्रजननासाठी दोन भिन्नलिंगी पेशींची गरज असते. त्यांपैकी स्त्रीलिंगी पेशी ज्या ग्रंथीमध्ये तयार होते त्या ग्रंथीला ...
अडुळसा अडुळसा ही अॅकँथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅधॅटोडा व्हॅसिका आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया ...
मानवी काही अंत:स्रावी ग्रंथी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात. ही ...
उदरगुहिकेचा अंतर्गळ शरीरातील एखादी ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या विकृतीला ‘अंतर्गळ’ म्हणतात. शरीरातील फुप्फुसे, हृदय किंवा आतडी ...
अध:पृष्ठीय जल : पुनर्भरण पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्यास अध:पृष्ठीय जल किंवा भूजल म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास ‘पृष्ठीय जल’ ...