विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग पहिला अंकुरण ते ग्लुकोज (सु. २८३ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.
अनाच्छादित भूप्रदेश, वेल्लारी, कर्नाटक राज्य पर्यावरणातील एक प्रभावी प्रक्रिया. अनाच्छादन म्हणजे आवरण किंवा आच्छादन निघणे किंवा काढणे. भूपृष्ठ हे पृथ्वीचे ...
बिनविषारी सर्पाने केलेले अनुकरण आकार, ढब, रंग आणि वर्तन यांबाबतींत इतर प्राण्यांशी, वनस्पतींशी किंवा निर्जीव वस्तूंशी असणार्या प्राण्यांच्या साम्याला किंवा ...
वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणार्या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे ...
प्रत्येक परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या असतात. त्या परस्परसंबंधाने जोडल्या जाऊन अन्नजाळी तयार होते. परिसंस्थेमध्ये स्वयंपोषी वनस्पतींनी तयार केलेली अन्नऊर्जा एक किंवा ...
अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व ...
अन्नसाखळी परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत ...
परिसंस्थेतील महत्त्वाची प्रक्रिया. मृत सेंद्रियघटकांतील सेंद्रिय रेणूंचे साध्या व कमी ऊर्जेच्या असेंद्रियसंयुगांमध्ये सावकाश रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे ‘अपघटन’. संकीर्ण पदार्थ ...
अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून ...
अपिवनस्पती : एराइड्स वंशातील ऑर्किड अपिवनस्पती दुसर्या वनस्पतीच्या फांदीवर किंवा खोडावर वाढतात. आपले अन्न व पाणी आधारभूत वनस्पतीच्या शरीरातून किंवा ...
काही अपुष्प वनस्पती ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत अशा वनस्पतींना ‘अपुष्प वनस्पती’ (क्रिप्टोगॅमस) म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांचा अभाव असलेल्या ...
अपुष्ठवंशी प्राणीसंघातील काही उदाहरणे पाठीचा कणा नसणार्या प्राण्यांना ‘अपृष्ठवंशी’ म्हणतात. वर्गीकरणाच्या दृष्टीने अपृष्ठवंशी प्राणी हा प्राणिसृष्टीचा वेगळा असा नैसर्गिक विभाग ...
शरीरामधील रक्तातील त्याज्य घटक बाहेर टाकण्याचे काम मुख्यतः मूत्रपिंडाद्वारे (वृक्काद्वारे) होते. काही कारणाने मूत्रपिंडे निकामी झाल्यास ती रक्तातील त्याज्य घटक ...
जीवाश्माच्या रूपाने आढळणा-या प्रामुख्याने अनावृतबीजी वृक्षांच्या राळेला अंबर म्हणतात. अंबर हा कठिण, पिवळ्या रंगाचा कार्बनी पदार्थ आहे. अनावृतबीजी वृक्षामधील राळ ...