विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग पहिला अंकुरण ते ग्लुकोज (सु. २८३ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.
उष्ण प्रदेशात सर्वत्र आढळणारी शिंबावंत वेल. ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लियटोरिया टर्नेटिया आहे. ही वनस्पती मूळची आशियाच्या ...
सराटा किंवा काटे गोखरू ही जमिनीवर सरपटत वाढणारी वर्षायू आहे. या वनस्पतीचा समावेश झायगोफायलेसी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस आहे ...
कवचधारी गोगलगाय मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गात गोगलगायींचा समावेश होतो. गोगलगायींचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीरावर असणारी कवचे. मात्र कवच ...
गोमाशी संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक प्राणी. गोमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या टॅबॅनिडी कुलात होतो. या माशीचे शास्त्रीय नाव टॅबॅनस लिनेओलस असे आहे ...
गोलकृमी प्राणिसृष्टींतील जास्तीत जास्त जैवविविधता असलेल्या संघांपैकी अपृष्ठवंशी प्राण्यांचा नेमॅथेल्मिंथिस हा एक संघ आहे. त्यातील २८,००० हून अधिक जाती ओळखल्या ...
वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरात विविध प्रकारचे स्राव स्रवणार्या पेशीसमूहाच्या संरचनांना ग्रंथी म्हणतात. मात्र काही ग्रंथी एकपेशीयदेखील असतात. ग्रंथींपासून शरीराला आवश्यक ...
चयापचय प्रक्रियेतील एक टप्पा. सजीवांच्या पेंशीमध्ये ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हिक आम्लात होण्याच्या जीवरासायनिक अभिक्रियेला ग्लायकॉलिसिस म्हणतात. या प्रक्रियेत एकूण दहा अभिक्रिया ...
ग्लायकोजेन हे एक कर्बोदक आहे. मानव तसेच उच्चस्तरीय प्राण्यांच्या शरीरात ग्लुकोजचा संचय ग्लायकोजेनच्या रूपात केला जातो. ग्लायकोजेन ही ग्लुकोजपासून तयार ...
ग्लुकोज हे कर्बोदक वर्गाच्या एकशर्करा (मोनोसॅकॅराइड) गटातील संयुग आहे. याचे रासायनिक सूत्र C6H12O6 आहे. यामधील एक कार्बनाचा अणू आल्डिहाइड (-CHO) या ...
ॲनाकोंडा मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा बोइडी कुलातील मोठ्या आकाराचा साप. पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात याचे वास्तव्य असल्याने ...
महाराष्ट्र शासनाने “विकसित महाराष्ट्र २०४७” असे उद्दिष्ट ठेवले असून त्याचा आराखडा निर्माण करण्याचे काम चालू आहे. सदर आराखडा अधिकाधिक व्यापक व समावेशक व्हावा ह्यासाठी तो लोकसहभागातून निर्माण करण्याचे ठरविले आहे. यानुषंगाने नागरिकांकडून सूचना, कल्पना, संकल्पना मागवल्या जात आहेत…..
या अनुषंगाने मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषेसाठी” मसुदा तयार करण्याचे काम सुरु आहे. तरी मराठी भाषा सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने आपल्या काही सूचना, कल्पना, प्रकल्प, विचार असतील तर त्या मराठी भाषा विभागाच्या sec.marathibhasha@maharashtra.gov.in या ई-मेल आयडी वर दि.१५.०६.२०२५ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन आपणांस करण्यात येत आहे.