भाग १ : अंकुरण ते ग्लुकोज
डॉ. जयंत नारळीकर
प्रस्तावना

अंकुरण ते ग्लुकोज

विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग पहिला अंकुरण ते ग्लुकोज (सु. २८३ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.

जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.

गवत्या साप (Green snake)

गवत्या साप

‘गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ...
गवा (Indian bison)

गवा

स्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या गोकुलातील एक प्राणी. हिंदी भाषेत याला गौर हे नाव आहे. भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव बॉस गॉरस असे ...
गवार (Cluster bean)

गवार

गवार ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव स्यामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा असे आहे. भारतात सर्वत्र या शिंबावंत वनस्पतीची लागवड फळभाजीसाठी (शेंगांसाठी) करतात ...
गहू (Wheat)

गहू

जगभरातील लोकांचे अन्नधान्याचे एक मुख्य पीक. पोएसी (ग्रॅमिनी) कुलामधील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे ...
गाजर (Carrot)

गाजर

गाजर ही द्विवर्षायू वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव डॉकस कॅरोटा सॅटायव्हा आहे. डॉकस कॅरोटा या रानटी जातीची निवडक निपज करून सॅटायव्हा ही उपजाती विकसित ...
गांडूळ (Earthworm)

गांडूळ

अ‍ॅनेलिडा (वलयी) संघाच्या ऑलिगोकीटा वर्गात गांडुळाचा समावेश होतो. गांडुळाच्या सु. १५० प्रजाती व सु. ३,००० जाती आहेत. भारतात सर्वत्र आढळणार्‍या ...
गाढव (Ass)

गाढव

स्तनी  वर्गातील विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील एक प्राणी. आशिया खंडात मंगोलिया आणि तिबेटपासून सिरियापर्यंत, तर आफ्रिका खंडाच्या पूर्व आणि उत्तर ...
गांधील माशी (Wasp)

गांधील माशी

संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणात गांधील माशीचा समावेश होतो. याच गणात मुंग्या आणि मधमाश्या यांचाही समावेश होतो. यांच्या सु ...
गाय (Cow)

गाय

माणसाळलेल्या प्राण्यांमध्ये जगभरात मोठ्या संख्येने असलेला प्राणी. स्तनी वर्गाच्या समखुरी (आर्टिओडॅक्टिला) गणाच्या गोकुलातील बोव्हिनी उपकुलात गायीचा समावेश होतो. हा रवंथ ...
गारवेल (Railway creeper)

गारवेल

जगभर सर्वत्र आढळणारी बहुपयोगी, सदाहरित व प्रसर्पी (सरपटत वाढणारी) वेल. गारवेल ही बहुवर्षायू वनस्पती कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आयापोमिया ...
गालगुंड (Mumps)

गालगुंड

विषाणूंच्या संसर्गामुळे माणासाला होणारा एक संसर्गजन्य रोग. पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंमुळे गालगुंड रोगाचा प्रसार होतो. या रोगात कानाच्या पुढे आणि गालाच्या ...
गिधा़ड (Vulture)

गिधा़ड

अ‍ॅक्सिपिट्रिडी या कुलातील पक्षी. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. यांच्या पाच-सहा जाती भारतात आढळतात. काळे ...
गिनी पिग (Guinea pig)

गिनी पिग

स्तनी वर्गाच्या कृंतक गणातील व केव्हीइडी कुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव केव्हिया पोरर्सेलस आहे. केव्हिया हा प्रजातिदर्शक पोर्तुगीज शब्द असून याचा अर्थ उंदीर, ...
गिबन (Gibbon)

गिबन

गिबन या मानवसदृश कपीचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील हायलोबेटिडी कुलात होतो. हा प्राणी म्यानमार, मलेशिया, बांगला देश, जावा, सुमात्रा, ...
गुग्गूळ (Guggul)

गुग्गूळ

गुग्गुळाचा डिंक गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ ...
गुंज (Crab’s eye/Indian Liquorice)

गुंज

गुंज गुंज ही बहुवर्षीय वेल लेग्युमिनोजी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅब्रस प्रिकॅटोरियस आहे. बारीक फांद्यांची ही पानझडी वेल दुसर्‍या झाडावर पाच-सहा ...
गुणसूत्रे (Chromosomes)

गुणसूत्रे

सर्व सजीवांच्या पेशींत आढळणारी धाग्यांसारखी सूक्ष्म संरचना. प्रत्येक गुणसूत्रात डीएनएचे रेणू असतात. डीएनए म्हणजे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाचे जटिल रासायनिक संयुग. गुणसूत्रे ...
गुलमोहर (Peacock flower)

गुलमोहर

रस्त्याच्या कडेने शोभेसाठी व सावलीसाठी वाढविण्यात येणारा शोभिवंत वृक्ष. हा फॅबेसी कुलातील पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव डेलोनिक्स रेजिया आहे. गुलमोहर ...
गुलाब (Rose)

गुलाब

फुलांचा राजा म्हणून सर्वांना माहीत असलेले सदापर्णी झुडूप. रोझेसी कुलातील रोझा प्रजातीमधील ही वनस्पती आहे. जगभर गुलाबाच्या १५० हून अधिक ...
गेंडा (Rhinoceros)

गेंडा

जमिनीवरील आकारमानाने मोठ्या असलेल्या प्राण्यांपैकी एक मोठा प्राणी. गेंडा हा स्तनी वर्गाच्या विषमखुरी गणातील प्राणी असून त्याला तीन खूर असतात ...