भाग १ : अंकुरण ते ग्लुकोज
डॉ. जयंत नारळीकर
प्रस्तावना

अंकुरण ते ग्लुकोज

विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग पहिला अंकुरण ते ग्लुकोज (सु. २८३ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.

जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.

खार (Squirrel)

खार

स्तनी वर्गाच्या कृंतक (कुरतडून खाणार्‍या प्राण्यांच्या) गणातील सायूरिडी कुलातील हा प्राणी आहे. या कुलात दोन उपकुले आहेत. सायूरिनी उपकुलात भूचर ...
खारफुटी (Mangrove)

खारफुटी

उष्ण कटिबंधातील समुद्रकिनार्‍यावर सागरी लाटांचा प्रभाव असणार्‍या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे. खारफुटी (कच्छ ...
खूर (Hoof)

खूर

काही सस्तन प्राण्यांच्या पावलांवरील असलेली कठिण वाढ म्हणजे खूर. अशा प्राण्यांचा समावेश खूरधारी प्राणी (अंग्युलेटा) गणात होतो. यामध्ये डुक्कर, झीब्रा, ...
खेकडा (Crab)

खेकडा

रुंद व चपटे शरीर असलेला, शरीरभर कवच असलेला आणि पायांच्या पाच जोड्या असलेला अपृष्ठवंशी प्राणी.  संधिपाद संघातील कवचधारी (क्रस्टेशिया) वर्गातील ...
खेचर (Mule)

खेचर

खेचर हा एक पाळीव व संकरित प्राणी असून घोडी आणि गाढव (नर) यांच्या संकरातून तो निपजतो. तसेच घोडा आणि गाढवी ...
खैर (Catechu tree)

खैर

काताबद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष. खैर-बाभूळ, खदिर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फॅबेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया कॅटेच्यू आहे ...
खोकड (Fox)

खोकड

खोकड हा सस्तन प्राणी मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी येतात. खोकड ...
खोकला (Cough)

खोकला

फुप्फुसातील दबलेली हवा कंठद्वारामधून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया म्हणजे खोकला. या क्रियेत हवा एकदम बाहेर पडल्यामुळे आवाज ...
खोड (Stem)

खोड

बिजाच्या कोंबापासून जमिनीच्या वर वाढणार्‍या वनस्पतीच्या भागाला खोड म्हणतात. फांद्या, पाने, फुले आणि फळे यांना आधारभूत असा हा कणखर स्तंभ ...
गजकर्ण (Ringworm)

गजकर्ण

विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, ...
गजगा (Fever nut)

गजगा

अशोक, आपटा, गुलमोहर इत्यादींचा समावेश असलेल्या सीसॅल्पिनिऑइडी या फुलझाडांच्या उपकुलातील वनस्पती. ही बहुवर्षायू वनस्पती मोठी आणि काटेरी वेल असून तिचे ...
गंध (Odour)

गंध

गंध म्हणजे वास. प्राणी आणि मनुष्यातील महत्त्वाच्या आणि मूलभूत संवेदांपैकी एक संवेद. काही प्राणी त्यांचा वावर असलेला प्रदेश आणि त्यांच्या ...
गपी (Guppy)

गपी

गपी मासा ऑस्ट्रेइक्थीज वर्गातील सायप्रिनोडॉटिफॉर्मिस गणातील पीसिलायइडी कुलात समाविष्ट आहे. याचे शास्त्रीय नाव पोईझिला रेटिक्युलाटा आहे. १८६६ साली त्रिनिदाद बेटावर ...
गरुड (Eagle)

गरुड

पक्षीवर्गाच्या फॅल्कॉनिफॉर्मिस गणातील अ‍ॅक्सिपिट्रिडी कुलातील शिकारी पक्षी. घार, ससाणा, गिधाड इ. पक्ष्यांचा या कुलात समावेश होतो. सोनेरी, पिंगट, शिखाधारी, मत्स्याहारी, ...
गर्भजलचिकित्सा (Amniocentesis)

गर्भजलचिकित्सा

गर्भावरणाभोवती असलेल्या उल्बी द्रवाची चिकित्सा. हे एक वैद्यकीय चिकित्सा तंत्र असून यामार्फत गर्भाच्या गुणसूत्रांमधील अपसामान्यता आणि संसर्ग यांचे जन्माअगोदर निदान ...
गर्भविज्ञान (Embryology)

गर्भविज्ञान

तौलनिक गर्भावस्था बहुपेशीय सजीवांच्या प्रारंभिक अवस्थेतील विकास आणि वाढ यांचा अभ्यास गर्भविज्ञान किंवा भ्रूणविज्ञान या शाखेत केला जातो. सामान्यपणे ही ...
गलगंड (Goitre)

गलगंड

अवटू ग्रंथी सुजल्यामुळे निर्माण झालेली एक अवस्था. या रोगाला ‘आवाळू’ असेही म्हणतात. गळ्याच्या पुढच्या भागात अवटू ग्रंथी असते. बहुतेक वेळा ...
गवत (Grass)

गवत

जगभर विपुल प्रसार असणार्‍या पोएसी (ग्रॅमिनी) कुलातील वनस्पतींना गवत म्हणतात. इंग्रजीत ‘ग्रास’ या संज्ञेत पोएसी कुलाबरोबरच सायपेरेसी आणि जुंकेसी या ...
गवताळ भूमी परिसंस्था (Grass land ecosystems)

गवताळ भूमी परिसंस्था

पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्‍या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. गवताळ प्रदेशाचे ...
गवती चहा (Lemon grass)

गवती चहा

एक सुवासिक वनस्पती. सुगंध येण्यासाठी या वनस्पतींची पाने चहामध्ये मिसळतात. गहू, ही वनस्पती पोएसी (गॅमिनी) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन ...