(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा देवरूखकर
वैश्विक स्तरावर लोकमान्यता व लोकप्रियता मिळविणारे नाट्य हे सामाजिक संप्रेषणाचे प्रभावी माध्यम ठरले आहे. समाजमनाचे मनोरंजन आणि मतरंजन करणारी ही नाट्यकला आदिकाळापासून आजतागायत काळाच्या अनंत आव्हानांना सामोरे जात आपले अस्तित्व राखून आहे. संगीत, चित्र, शिल्प, नृत्य इत्यादी कलांचा समावेश नाट्यकलेत होत असल्याने नाट्यकला अधिकच समृद्ध झाली आहे. शेकडो वर्षांच्या कालखंडात आपल्या रूपात, घाटात व शैलीत काळानुरूप बदल
घडवित नाट्यकला आज जागतिक स्तरावर सर्वदूर विस्तारली आहे. या कलेची ही सार्वत्रिकता लक्षात घेता अभिजात भारतीय व ग्रीक रंगभूमीपासून सुरू होत असलेला नाट्यकलेचा इतिहास तसेच परंपरा, शैली, तंत्र, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या संकल्पना, परिभाषा व यातील परिवर्तनाची नोंद या सर्वांच् अंतर्भाव
या नाट्यशास्त्र ज्ञानमंडळात केला आहे.

इसवी सन पूर्व काळातच भारतात नाट्यशास्त्र लिहून भरतमुनींनी नाट्यकलेला शास्त्राचा दर्जा प्राप्त करवून दिला होता. त्यामुळे शास्त्रबरहुकूम लिहिल्या गेलेल्या अभिजात रंगभूमीवरील नाटकांची, नाटककरांची आणि नाट्यशास्त्रातील महत्त्वाच्या परिभाषांची माहिती अभिजात रंगभूमी या विभागात करून देण्यात आली आहे. भारत हा खंडप्राय देश आहे. इथे भिन्नभिन्न प्रांतात जन्मास आलेल्या रंगभूमीचा आढावा भारतीय रंगभूमी या विभागात घेण्यात आला आहे. मराठी नाटकांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या तंजावरी नाटकांपासून ते नंतर संगीत नाट्य रंगभूमी, आधुनिक मराठी रंगभूमी आणि हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी ते आदिम, लोक व दलित रंगभूमीपर्यंतचा इतिहास मराठी रंगभूमी या विभागात असणार आहे. भारतीय रंगभूमीप्रमाणे जगातील विविध नाट्यपरंपरांचा शोध जागतिक रंगभूमी या विभागात घेण्यात आला आहे. भारतीय तसेच जागतिक रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान देणाऱ्या देशभरातील काही प्रमुख नाट्यसंस्थांची व रंगकर्मींची ओळख महत्त्वाच्या नाट्यसंस्था व महत्त्वाचे रंगकर्मी या विभागात करून देण्यात आली आहे.

अनुरूपा (Anurupa)

अनुरूपा

ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र  या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात अनुरूपा, विरूपारुपानुसारिणी ...
इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन - इप्टा (Indian People's Theatre Association - IPTA)

इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन – इप्टा

भारतातील कलावंतांची एक सर्वांत जुनी संस्था. भारतभर ती ‘इप्टा’ या नावाने ओळखली जाते. स्वातंत्र्य लढ्याच्या वाटचालीबरोबरच दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमिवर समाजात ...
इब्राहिम अल्काझी (Ebrahim Alkazi)

इब्राहिम अल्काझी

अल्काझी, इब्राहिम : (१८ ऑक्टोबर १९२५ – ४ ऑगस्ट २०२०). आधुनिक भारतीय नाट्यसृष्टीत मूलभूत कार्य करणारे रंगकर्मी आणि राष्ट्रीय नाट्य ...
केशवराव भोसले (Keshavarao Bhosale)

केशवराव भोसले

भोसले, केशवराव : (९ ऑगस्ट १८९० – ४ ऑक्टोबर १९२१). मराठी संगीत रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध गायक नट. त्यांचा जन्म कोल्हापूर ...
गोविंदराव टेंबे (Govindrao Tembe)

गोविंदराव टेंबे

टेंबे, गोविंदराव सदाशिव : (५ जून १८८१–९ ऑक्टोबर १९५५). प्रख्यात महाराष्ट्रीय हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, गायकनट व साहित्यिक. त्यांचा जन्म सांगवडे, जि ...
छोटा गंधर्व (Chhota Gandharva)

छोटा गंधर्व

छोटा गंधर्व : (१० मार्च १९१८– ३१ डिसेंबर १९९७). मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट. ‘सौदागर’ ह्या नावानेही परिचित. संपूर्ण नाव ...
जागतिक रंगभूमी दिवस (World Theatre Day)

जागतिक रंगभूमी दिवस

नाटक या कलेबाबत जनजागृती करण्यासाठी २७ मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. अभिनितकला माध्यमातील सर्व ...
जोहरा सहगल (Zohra Sehgal)

जोहरा सहगल

सहगल, जोहरा : (२७ एप्रिल १९१२—१० जुलै २०१४). नृत्यक्षेत्रात आणि चित्रपटक्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका. नृत्य ...
ब्रॉडवे (Broad Way)

ब्रॉडवे

ब्रॉडवेवरील नाट्यगृहे न्यूयॉर्क शहरातील लोकप्रिय नाट्यगृहांच्या समूहास / परिसरास (डिस्ट्रिक्ट) दिलेली संज्ञा. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ते एक व्यावसायिक रंगभूमीचे प्रमुख ...
मराठी नाट्यसंगीत : सौंदर्यशास्त्र (Marathi Natyasangeet : Saundaryashastra)

मराठी नाट्यसंगीत : सौंदर्यशास्त्र

नाट्यसंगीताच्या ऐतिहासिक स्थित्यंतरामागे बारकाईने पाहिल्यास एक प्रकारची वैचारिक भूमिका आकार घेत असलेली दिसते. या भूमिकेस सौंदर्यशास्त्रीय भूमिका असे म्हणता येईल ...
मराठी नाट्यसंगीत (Marathi Natyasangeet )

मराठी नाट्यसंगीत

मराठी नाट्यसंगीतातील विविध स्थित्यंतरांचा ऐतिहासिक दृष्ट्या परामर्श घ्यावयाचा झाल्यास विष्णुदास भावे यांच्या सीतास्वयंवर या आख्यानवजा संगीत पौराणिक नाटकापासून सुरुवात करावी ...
रूपानुसारिणी (Rupanusarini)

रूपानुसारिणी

ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात पात्राच्या आंतर्बाह्य गुणांचा व ...
रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi)

रोहिणी हट्टंगडी

हट्टंगडी, रोहिणी : (११ एप्रिल १९५१). प्रख्यात भारतीय अभिनेत्री. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. रिचर्ड ॲटेनबरो यांनी निर्मिलेल्या गांधी (१९८२) या चित्रपटातील ...
वसंत शंकर कानेटकर (Vasant Shankar Kanetkar)

वसंत शंकर कानेटकर

कानेटकर, वसंत शंकर : (२० मार्च १९२२ – ३० जानेवारी २००१). लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत. त्यांचा जन्म ...
वामन माधवराव केंद्रे (Waman Madhavrao Kendre)

वामन माधवराव केंद्रे

वामन केंद्रे केंद्रे, वामन माधवराव : (१७ जानेवारी १९५७). महाराष्ट्रातील एक विख्यात नाट्यदिग्दर्शक, नाट्यअभ्यासक, नाट्यप्रशिक्षक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात दरडगाव ...
विजया मेहता (Vijaya Mehata)

विजया मेहता

मेहता, विजया : (४ नोव्हेंबर १९३४ ). सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यप्रशिक्षक. पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत. त्या नाट्यक्षेत्रात ...
विनायक रामचंद्र हंबर्डे (Vinayak Ramchandra Hambarde)

विनायक रामचंद्र हंबर्डे

हंबर्डे, विनायक रामचंद्र : (२३ एप्रिल १९०८ – १९ नोव्हेंबर १९६३). वैदर्भीय मराठी नाटककार, कादंबरीकार व संपादक. अमरावतीजवळील बडनेरा या ...
विरूपा (Virupa)

विरूपा

ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र  या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात अनुरूपा, विरूपा व रुपानुसारिणी ...
विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (Vishwanath Bhalchandra Deshpande)

विश्वनाथ भालचंद्र देशपांडे

देशपांडे, वि. भा. : (३१ मे १९३८ – ९ मार्च २०१७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यसमीक्षक. नाट्यक्षेत्रात ते ‘विभा’ म्हणून ओळखले जात ...
शफाअत खान (Shafaat Khan)

शफाअत खान

खान, शफाअत : (२१ नोव्हेंबर १९५२). आधुनिक मराठी प्रायोगिक नाटककार, नाट्यदिग्दर्शक व नाट्यप्रशिक्षक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात सावंतवाडी (सिंधुदुर्ग जिल्हा) ...