(प्रस्तावना)

पालकसंस्था : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. | विषयपालक : श्रीकांत उमरीकर | समन्वयक : जयंत शेवतेकर | विद्याव्यासंगी : वर्षा देवरुखकर

वैश्विक स्तरावर लोकमान्यता व लोकप्रियता मिळविणारे नाट्य हे सामाजिक संप्रेषणाचे प्रभावी माध्यम ठरले आहे. समाजमनाचे मनोरंजन आणि मतरंजन करणारी ही नाट्यकला आदिकाळापासून आजतागायत काळाच्या अनंत आव्हानांना सामोरे जात आपले अस्तित्व राखून आहे. संगीत, चित्र, शिल्प, नृत्य इत्यादी कलांचा समावेश नाट्यकलेत होत असल्याने नाट्यकला अधिकच समृद्ध झाली आहे. शेकडो वर्षांच्या कालखंडात आपल्या रूपात, घाटात व शैलीत काळानुरूप बदल
घडवित नाट्यकला आज जागतिक स्तरावर सर्वदूर विस्तारली आहे. या कलेची ही सार्वत्रिकता लक्षात घेता अभिजात भारतीय व ग्रीक रंगभूमीपासून सुरू होत असलेला नाट्यकलेचा इतिहास तसेच परंपरा, शैली, तंत्र, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या संकल्पना, परिभाषा व यातील परिवर्तनाची नोंद या सर्वांच् अंतर्भाव
या नाट्यशास्त्र ज्ञानमंडळात केला आहे.

इसवी सन पूर्व काळातच भारतात नाट्यशास्त्र लिहून भरतमुनींनी नाट्यकलेला शास्त्राचा दर्जा प्राप्त करवून दिला होता. त्यामुळे शास्त्रबरहुकूम लिहिल्या गेलेल्या अभिजात रंगभूमीवरील नाटकांची, नाटककरांची आणि नाट्यशास्त्रातील महत्त्वाच्या परिभाषांची माहिती अभिजात रंगभूमी या विभागात करून देण्यात आली आहे. भारत हा खंडप्राय देश आहे. इथे भिन्नभिन्न प्रांतात जन्मास आलेल्या रंगभूमीचा आढावा भारतीय रंगभूमी या विभागात घेण्यात आला आहे. मराठी नाटकांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या तंजावरी नाटकांपासून ते नंतर संगीत नाट्य रंगभूमी, आधुनिक मराठी रंगभूमी आणि हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी ते आदिम, लोक व दलित रंगभूमीपर्यंतचा इतिहास मराठी रंगभूमी या विभागात असणार आहे. भारतीय रंगभूमीप्रमाणे जगातील विविध नाट्यपरंपरांचा शोध जागतिक रंगभूमी या विभागात घेण्यात आला आहे. भारतीय तसेच जागतिक रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान देणाऱ्या देशभरातील काही प्रमुख नाट्यसंस्थांची व रंगकर्मींची ओळख महत्त्वाच्या नाट्यसंस्था व महत्त्वाचे रंगकर्मी या विभागात करून देण्यात आली आहे.

अनुरूपा (Anurupa)

ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र  या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात अनुरूपा, विरूपारुपानुसारिणी ...

विरूपा (Virupa)

ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र  या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात अनुरूपा, विरूपा व रुपानुसारिणी ...
Close Menu