(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

मानव विकास अहवाल (Human Development Report)

मानव विकास अहवाल

मानव विकास अहवाल हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम – यूएनडीपी) अंतर्गत प्रसिद्ध केला जातो. १९९० मध्ये ...
मार्कोवित्झ मूलतत्त्व (Markowitz Principle)

मार्कोवित्झ मूलतत्त्व

भांडवल बाजारातील गुंतवणुकीमागील प्रेरणा विशद करणारे एक तत्त्व. या तत्त्वाची मांडणी प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांनी केली. त्यांच्या या ...
माल्कम आदिशेषय्या (Malcom Adiseshiah)

माल्कम आदिशेषय्या

माल्कम आदिशेषय्या (Malcom Adiseshiah) : (१८ एप्रिल १९१० – २१ नोव्हेंबर १९९४). प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ व पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. विकासाचे ...
मावळते उद्योग (Sunset Industry)

मावळते उद्योग

मावळते उद्योग ही संज्ञा दोन पद्धतींनी परिभाषित केलेली आढळते. एक, जी जुनी उद्योग अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहेत; परंतु या उद्योगांमधील गुंतवणुकीच्या ...
मिशल कॅलेकी (Michal Kalecki)

मिशल कॅलेकी

कॅलेकी, मिशल (Kalecki, Michal) : (२२ जून १८९९ – १८ एप्रिल १९७०). प्रसिद्ध पोलिश अर्थतज्ज्ञ. मुख्यत: समष्टी अर्थशास्त्र हे त्यांच्या ...
मुहम्मद युनुस (Muhammad Yunus)

मुहम्मद युनुस

मुहम्मद युनुस (Muhammad Yunus) : (२८ जुन १९४०). बांग्लादेशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि २००६ मधील शांतता नोबेल पुरस्काराचे ...
मेक इन इंडिया (Make in India)

मेक इन इंडिया

भारत हा जगातील औद्योगिक उत्पादनाचे केंद्र बनावे, तसेच भारतामध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढून भारताची उत्पादन क्षमता वाढावी या उद्देशातून अस्तित्वात ...
मोरित्स ॲलिस (Maurice Allais)

मोरित्स ॲलिस

ॲलिस, मोरित्स (Allais Maurice) : (३१ मे १९११ – ९ ऑक्टोंबर २०१०). फ्रेंच अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. भौतिकी ...
यालिंग चार्ल्स कूपमान्स (Tjalling Charles Koopmans)

यालिंग चार्ल्स कूपमान्स

कूपमान्स यालिंग चार्ल्स : (२८ ऑगस्ट १९१० – २६ फेब्रुवारी १९८५). डच-अमेरिकन गणिती, अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. दुर्मिळ अशा ...
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (Unit Trust of India - UTI)

युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया

सेबीची एक नोंदणीकृत वित्तीय संस्था. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अधिनियम १९६३ नुसार १९६४ मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या वित्तीय ...
युरो चलन (Euro Currency)

युरो चलन

आंतरराष्ट्रीय व्यवहारात वापरले जाणारे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे चलन. हे चलन यूरोपीयन संघ राष्ट्रांचे अधिकृत चलन आहे. यूरोपीयन संघाच्या २८ ...
यूजीन एफ. फॅमा (Eugene F. Fama)

यूजीन एफ. फॅमा

फॅमा, यूजीन एफ. : (१४ फेब्रुवारी १९३९). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. अर्थतज्ज्ञ रॉबर्ट जेम्स शिलर शिलर (Robert James Shiller) ...
यूजीन फोन बोएम-बाव्हेर्क (Eugen von Böhm-Bawerk)

यूजीन फोन बोएम-बाव्हेर्क

बोएम-बाव्हेर्क, यूजीन फोन : (१२ फेब्रुवारी १८५१ – २७ ऑगस्ट १९१४). नामवंत ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ व मुत्सद्दी. त्यांचा जन्म ब्रून (मोरेव्हिया) ...
यूजीन स्लटस्की (Eugen Slutsky)

यूजीन स्लटस्की

स्लटस्की, यूजीन (Slutsky, Eugen) : (७ एप्रिल १८८० ते १० मार्च १९४८). प्रसिद्ध रशियन अर्थशास्त्रज्ञ. स्लटस्की यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र व ...
यूरोपीय संघ (European Union)

यूरोपीय संघ

जगातील सर्वांत मोठे राजकीय व आर्थिक संघटन. जागतिक विकास संधी व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ गटनीतीच्या माध्यमातून मिळविताना अखंडित, एकसंघ व ...
योजना आयोग (Planning Commission)

योजना आयोग

भारत सरकारच्या मुख्य स्वतंत्र संस्थांपैकी एक. पंचवार्षिक योजनांद्वारे देशातील संसाधनांचा सर्वांत प्रभावी व संतुलित वापर करण्याकरिता योजना तयार करणे, हे ...
रंगराजन समिती (Rangarajan Committee)

रंगराजन समिती

दारिद्र्य निर्मूलन हे भारतीय नियोजनातील एक प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहे. तसेच नियोजनाच्या यशस्वीतेचेही ते एक गमक मानले जाते. त्यामुळे नियोजन ...
राखीव किंमत (Reserve price)

राखीव किंमत

वस्तू किंवा मालमत्तेची विक्री करताना जी किमान (सीमांत) किंमत (Price) अपेक्षित असते, तिला ‘राखीव किंमत’ म्हणतात. एखाद्या वस्तूची विक्री तिच्या ...
राज्य वित्त आयोग (State Finance Commissions)

राज्य वित्त आयोग

केंद्र व राज्य सरकार, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांत वित्तीय समतोल ठेवणारी एक व्यवस्था. भारतीय संविधानात १९९३ मध्ये ७३ व ७४ ...
राल्फ हॉट्रे (Ralf Hawtrey)

राल्फ हॉट्रे

हॉट्रे, राल्फ (Hawtrey, Ralf) : (२२ नोव्हेंबर १८७९ – २१ मार्च १९७५). प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. राल्फ यांचा जन्म लंडनजवळील स्लॉज ...