(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

बेकायदा निधी हस्तांतरण (Money Laundering)

बेकायदा निधी हस्तांतरण

बेकायदेशीर व गुन्हेगारी पद्धतीने प्राप्त निधी व संपत्तीचे, बँक आणि इतर आर्थिक व्यवहारांद्वारे कायदेशीर संपत्तीत रूपांतर करण्याच्या गुन्हेगारी व्यवहारांना बेकायदा ...
बेंग्ट रॉबर्ट होल्मस्ट्रॉम ( Bengt Robert Holmström)

बेंग्ट रॉबर्ट होल्मस्ट्रॉम

होल्मस्ट्रॉम, बेंग्ट रॉबर्ट (Holmström Bengt Robert) : (१८ एप्रिल १९४९). ख्यातकीर्त फिनी-अमेरिकन अर्थतज्ज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. होल्मस्ट्रॉम यांना २०१६ ...
बेवरीज अहवाल (Beveridge Report)

बेवरीज अहवाल

कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी उत्तम मार्ग अथवा उपाययोजना सुचविण्यासाठी सामाजिक विमा आणि संबंधित सेवा यासंबंधातील एक अहवाल. दुसऱ्या महायुद्धाच्या ...
बोल्टन समिती (Bolton Committee)

बोल्टन समिती

लघुउद्योगांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडमध्ये स्थापन केलेली औद्योगिक समिती. जॉन ई. बोल्टन यांच्या अध्यक्षतेखाली जुलै १९६९ मध्ये या समितीची स्थापना करण्यात ...
बौद्धिक संपदा (Intellectual Property)

बौद्धिक संपदा

मनुष्याची बौद्धिक गुणवत्ता आणि परिश्रम, तसेच व्यक्तीच्या सर्जनक्षमतेमुळे त्या व्यक्तीस जी संपत्ती प्राप्त होते, ती बौद्धिक संपदा होय. बौद्धिक संपदेचा ...
ब्रिटिश बँकिंग स्कूल (British Banking School)

ब्रिटिश बँकिंग स्कूल

एकोणिसाव्या शतकात ब्रिटनमधील काही अर्थशास्त्रज्ञ पैसा व बँकिंगसंबंधी आपले विचार व्यक्त करणाऱ्या विचारशाळेला ब्रिटिश बँकिंग स्कूल असे म्हणत. यामध्ये थॉमस ...
ब्रेक्झिट (Brexit)

ब्रेक्झिट

ब्रिटनच्या यूरोपीय संघातून रितसर बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेक्झिट’ म्हणतात. ब्रिटन या शब्दाच्या स्पेलिंग मधील ‘बी’ व ‘आर’ ही आद्याक्षरे आणि ...
भांडवलाचे संचारण (Capital Flight)

भांडवलाचे संचारण

अधिक स्थिरता किंवा भांडवलावरील वाढीव उच्च परतावा या मुख्य उद्देशाने भांडवलाच्या एका गुंतवणुकीतून दुसऱ्या गुंतवणुकीची चळवळ म्हणजे भांडवलाचे संचारण होय ...
भांडवली अंदाजपत्रक/भांडवली अर्थसंकल्प (Capital Budgeting)

भांडवली अंदाजपत्रक/भांडवली अर्थसंकल्प

कर्ज घेऊन व मालमत्तेची विक्री करून मिळालेला पैसा आणि मालमत्ता निर्माण करण्यासाठी लागणारा खर्च व कर्जाचे वाटप केल्याने होणारा खर्च ...
भाडेपट्टा करार (Lease Agreement)

भाडेपट्टा करार

भाडेपट्टा करार ही एक अशी व्यवस्था आहे की, ज्यामध्ये एखादी कंपनी आपली साधनसामग्री किंवा जमीन भाडेपट्टा कराराने देऊ इच्छिते. सर्वसाधारणपणे ...
मक्तेदारी चौकशी आयोग (Monopolies Inquiry Commission)

मक्तेदारी चौकशी आयोग

खाजगी क्षेत्राच्या उद्योगधंद्यांतील मक्तेदारी आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण यांची चौकशी करून त्यांवर उपाययोजना करण्याकरिता केंद्र शासनाकडून नेमण्यात आलेला एक आयोग ...
मक्तेदारी धोरण (Monopoly Policy)

मक्तेदारी धोरण

ग्राहक व विक्रेते यांच्या वर्तणुकीनुसार एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरेल, हे बाजाराच्या संरचनेवर अवलंबून असते. सनातन पंथीयांनी मांडलेल्या सिद्धांताप्रमाणे बाजाराच्या ...
मक्तेदारी शक्ती (Monopoly Power)

मक्तेदारी शक्ती

वस्तूचे उत्पादन, तिची किंमत, तिचा साठा इत्यादींबाबत स्वनिर्णय घेण्याची मक्तेदाराची शक्ती. उत्पादन आणि किमतीबाबत धोरण ठरविण्याकरिता उपयोगात येणाऱ्या स्पर्धेच्या तीव्रतेला ...
मंदीयुक्त भाववाढ (Stagflation)

मंदीयुक्त भाववाढ

वस्तूंच्या किमतीत वाढ होऊनही उत्पादनात घट व बेरोजगारीत वृद्धी होते आणि आर्थिक व्यवहांरातील घडामोडी मंदावलेल्या दिसतात अशा अवस्थेला मंदीयुक्त भाववाढ ...
मर्टन एच. मिलर (Merton H. Miller)

मर्टन एच. मिलर

मिलर, मर्टन एच. : (१६ मे १९२३ – ३ जून २०००). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मिलर यांना ...
मर्यादा किंमत (Limit Pricing)

मर्यादा किंमत

उद्योग जगतात नवीन उद्योगसंस्थांचा प्रवेश मर्यादित करणारी किंमत निश्चिती. बाजाराच्या मक्तेदारी, अल्पविक्रेताधिकार अशा प्रकारांमध्ये उत्पादकाला मिळणाऱ्या असाधारण नफ्यामुळे नवीन उद्योगसंस्था ...
मर्यादित दायित्व (Limited Liability)

मर्यादित दायित्व

मर्यादित दायित्व म्हणजे व्यावसायिक व्यक्तींचे असे आर्थिक दायित्व की, जे त्यांनी व्यवसायात गुंतविलेल्या रकमेइतके मर्यादित असते. मर्यादित दायित्व ही संकल्पना ...
मसाला रोखे (Masala Bonds)

मसाला रोखे

परदेशी भांडवली बाजारात गुंतवणुकीसाठी भारतीय रुपयांत लागू केलेल्या रोख्यांना मसाला रोखे असे म्हणतात. परकीय बाजारातील परकीय चलनाची जोखीम दूर करण्यासाठी ...
मानव विकास अहवाल (Human Development Report)

मानव विकास अहवाल

मानव विकास अहवाल हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम – यूएनडीपी) अंतर्गत प्रसिद्ध केला जातो. १९९० मध्ये ...
मार्कोवित्झ मूलतत्त्व (Markowitz Principle)

मार्कोवित्झ मूलतत्त्व

भांडवल बाजारातील गुंतवणुकीमागील प्रेरणा विशद करणारे एक तत्त्व. या तत्त्वाची मांडणी प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांनी केली. त्यांच्या या ...