(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मध्ययुग ही इतिहासातील विशिष्ट कालखंड दर्शविणारी एक संज्ञा होय. तिचा प्रदेशपरत्वे कालखंड भिन्न असून मध्ययुगीन कालखंड केव्हा सुरू होतो आणि कधी समाप्त होतो याची संदिग्धता आढळते; तथापि यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन इतिहासकारांनी रूढ केली व तीच सर्व पाश्चात्त्य देशांत ग्राह्य ठेवली. इ. स. सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षांच्या कालखंडाला सामान्यत: यूरोपीय इतिहासात ‘मध्ययुग’ ही संज्ञा देतात.

भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. मध्ययुगीन इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरित होय. त्यांतून सम्राट हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर बिल्हणाचे विक्रमांकदेवचरित, हेमचंद्राचे कुमारपालचरित, संध्याकर नंदीचे रामचरित, मेरुतुंगाचा प्रबंध चिंतामणी वगैरे ग्रंथांतून मध्ययुगीन राजसत्तांविषयी माहिती मिळते. कल्हणाच्या राजतरंगिणीत काश्मीरच्या राजवंशाचा इतिहास आहे. हे काही निवडक ग्रंथ सोडले तर या काळाविषयी बखरी, शिलालेख, प्रवासवर्णने, सनदा, नाणी इ. साधनांचा आधार घ्यावा लागतो.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची विभागणी तीन भागांत केली जाते. पूर्व मध्ययुग, मध्ययुग आणि उत्तर मध्ययुग. कनौजचा सम्राट हर्षवर्धन (कार. ६०६–सु. ६४७) याचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने पराभव केला. तिथून पूर्व मध्ययुगाची सुरुवात मानली जाते. काही अभ्यासकांच्या मते गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर (इ. स. ५५५) पूर्व मध्ययुगाची सुरुवात होते. मध्ययुगीन कालखंडातील मध्याची सुरुवात १२ व्या शतकात होऊन त्याचा शेवट १६ व्या शतकात होतो. तर मोगल साम्राज्याचा उदय आणि त्यापुढील कालखंड हा उत्तर मध्ययुगीन कालखंड समजला जातो.

एकूणच जागतिक मध्ययुगीन इतिहासाबरोबर भारतातील पूर्व, मध्य आणि उत्तर मध्ययुगीन या कालखंडांतील १. राजवंश, २. राजे, ३. प्रसिद्ध व्यक्ती, ४. परकीय प्रवासी, ५. संत, ६. किल्ले, ७. वास्तू, मंदिरे, मूर्ती, वीरगळ, ८.सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थिती, ९. बखरी / इतिहासाची साधने, १०. उत्खनने आणि ११. मध्ययुगीन लढायांतील आयुधे इत्यादींवर योग्य, स्वतंत्र व संक्षिप्त नोंदी मराठी विश्वकोशाच्या या मध्ययुगीन इतिहास – भारतीय व जागतिक या ज्ञानमंडळात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यांतील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन ६०० ते इसवी सन १८०० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी मध्ययुगीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत. आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे.

जनार्दनपंत (Janardanpant)

जनार्दनपंत

जनार्दनपंत पेशवे : ( १० जुलै १७३५–२१ सप्टेंबर १७४९ ). मराठेशाहीतील श्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव (१७००–१७४०) यांचे पुत्र. त्यांचा जन्म ...
जयगड (Jaigad)

जयगड

रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक बंदर. या बंदरावरच शास्त्री नदीच्या मुखावरील दक्षिण काठावर जयगड किल्ला वसलेला आहे. रत्नागिरीमधून निवळी गावामार्गे डांबरी ...
जव्हार संस्थान (Jawhar State)

जव्हार संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्रात असणारे एक जुने संस्थान. ठाणे जिल्ह्याच्या ईशान्येस असलेले जव्हार संस्थान सांप्रत जव्हार तालुका असून तो पालघर जिल्ह्यात ...
जालंधरनाथ (Jalandharnatha)

जालंधरनाथ

चौऱ्यांशी सिद्धांपैकी एक सिद्ध. नवनाथांपैकी एक नाथ-योगी व कानिफनाथांचे गुरू. जालंधरनाथांना जालंधरी, जळांधरी, जालंधरीपा, हाडिपा, ज्वालेंद्र, बालनाथ, बालगुंडाई, जान पीर ...
जुनाखेडा नाडोल (Junakheda Nadol)

जुनाखेडा नाडोल

राजस्थानातील एक मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ पाली जिल्ह्यात असून राजपुतांच्या चौहान कालखंडातील आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने १९९०-९१ मध्ये येथे ...
जुन्नर (मध्ययुगीन कालखंड) (Junnar : Medieval period)

जुन्नर

महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध शहर. जुन्नर शहर तालुक्याचे ठिकाण असून ते पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या दक्षिण काठावर समुद्रसपाटीपासून सु. २००० ...
जेम्स ऑगस्टस हिकी (James Augustus Hicky)

जेम्स ऑगस्टस हिकी

हिकी, जेम्स ऑगस्टस : (१७४०–१८०२). कलकत्ता (कोलकाता) येथे हिकी’ज बेंगॉल गॅझेट (१७८०) हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू करणारा आयरिश ...
जॉन फ्रायर (John Fryer)

जॉन फ्रायर

फ्रायर, जॉन : ( १६५०–३१ मार्च १७३३ ). परकीय प्रवासी आणि वैद्यक. त्याचा जन्म लंडन येथे झाला. तो विल्यम फ्रायर ...
जॉन विल्यम हेसिंग (John William Hessing)

जॉन विल्यम हेसिंग

हेसिंग, जॉन विल्यम : (५ नोव्हेंबर १७३९ – २१ जुलै १८०३). मराठेशाहीतील प्रसिद्ध लष्करी अधिकारी आणि आग्र्याचा किल्लेदार. हा मूळचा ...
झां बातीस्त ताव्हेर्न्ये (Jean Baptiste Tavernier)

झां बातीस्त ताव्हेर्न्ये

ताव्हेर्न्ये, झां बातीस्त : (१६०५–जुलै १६८९). फ्रेंच जगप्रवासी आणि जडजवाहिरांचा व्यापारी. त्याचा जन्म पॅरिस येथे झाला. तो प्रॉटेस्टंट पंथीय होता ...
टिपू सुलतान (Tipu Sultan)

टिपू सुलतान

टिपू सुलतान :  (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९). म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते ...
टेहरी गढवाल संस्थान (Tehri Garhwal Princely State)

टेहरी गढवाल संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील कुमाऊँ प्रदेशातील एक संस्थान. क्षेत्रफळ १०,८८० चौ. किमी. लोकसंख्या ६,०२,११५ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. ४१ लाख रुपये. उत्तरेस ...
ठक्कुर फेरू (Thakkur Pheru)

ठक्कुर फेरू

ठक्कुर फेरू : (इ. स. तेरावे-चौदावे शतक). मध्ययुगीन भारतातील एक प्रसिद्ध लेखक आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या (खल्जी) (कारकिर्द १२९६–१३१६) पदरी असलेला ...
डच आणि पाँडिचेरी  (Dutch and Pondicherry)

डच आणि पाँडिचेरी  

परकीय व्यापारी असलेल्या डचांनी दक्षिण भारतातील पाँडिचेरी (पुदुच्चेरी) ताब्यात घेण्यासाठी केलेला संघर्ष. या निमित्ताने डच-मराठे-फ्रेंच यांच्यात हा संघर्ष घडून आला ...
डच कागदपत्रे, इंडोनेशिया (Dutch Papers, Indonesia)

डच कागदपत्रे, इंडोनेशिया

डच ईस्ट इंडिया कंपनीची इंडोनेशियात असलेली कागदपत्रे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे अरसिप नॅशनल रिपब्लिक इंडोनेशिया अर्थात राष्ट्रीय पुराभिलेखागारामध्ये ही कागदपत्रे ...
डच कागदपत्रे, नेदरलँड्स (Dutch Papers, Netherlands)

डच कागदपत्रे, नेदरलँड्स

डच ईस्ट इंडिया कंपनीची नेदरलँड्समधील कागदपत्रे. नेदरलँड्समधील द हेग येथील राष्ट्रीय पुराभिलेखागारात ही कागदपत्रे असून त्यांत डच ईस्ट इंडिया कंपनीचे ...
डच वखारीची स्थापना (Dutch factory establishment)

डच वखारीची स्थापना

डच वखारीची स्थापना : (इ.स.१६८०). परकीय व्यापारी. मध्ययुगात डच व्यापारी भारतात आले. व्यापारी सवलती मिळविण्यासाठी डच ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी ...
डच-आंग्रे लढाई (Dutch-Angre Battle)

डच-आंग्रे लढाई

डच-आंग्रे लढाई : (६-७ जानेवारी १७५४). महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळील अरबी समुद्रात आंग्रे घराण्यातील पराक्रमी वीर तुळाजी आंग्रे आणि डच यांच्यात ...
डच-मराठे संबंध (Dutch-Maratha relations)

डच-मराठे संबंध

डच-मराठे संबंध : (१६६०-१६८०). छ. शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि परकीय व्यापारी डच यांच्यातील परस्परसंबंध. येथे तंजावरच्या मराठी ...
डचांची विजयदुर्ग मोहीम

डचांची विजयदुर्ग मोहीम : (१७३९). डचांनी विजयदुर्ग ताब्यात घेण्यासाठी आंग्र्यांविरुद्ध काढलेली एक मोहीम. सरखेल संभाजी आंग्र्यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराची डच ...