(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मध्ययुग ही इतिहासातील विशिष्ट कालखंड दर्शविणारी एक संज्ञा होय. तिचा प्रदेशपरत्वे कालखंड भिन्न असून मध्ययुगीन कालखंड केव्हा सुरू होतो आणि कधी समाप्त होतो याची संदिग्धता आढळते; तथापि यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन इतिहासकारांनी रूढ केली व तीच सर्व पाश्चात्त्य देशांत ग्राह्य ठेवली. इ. स. सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षांच्या कालखंडाला सामान्यत: यूरोपीय इतिहासात ‘मध्ययुग’ ही संज्ञा देतात.

भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. मध्ययुगीन इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरित होय. त्यांतून सम्राट हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर बिल्हणाचे विक्रमांकदेवचरित, हेमचंद्राचे कुमारपालचरित, संध्याकर नंदीचे रामचरित, मेरुतुंगाचा प्रबंध चिंतामणी वगैरे ग्रंथांतून मध्ययुगीन राजसत्तांविषयी माहिती मिळते. कल्हणाच्या राजतरंगिणीत काश्मीरच्या राजवंशाचा इतिहास आहे. हे काही निवडक ग्रंथ सोडले तर या काळाविषयी बखरी, शिलालेख, प्रवासवर्णने, सनदा, नाणी इ. साधनांचा आधार घ्यावा लागतो.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची विभागणी तीन भागांत केली जाते. पूर्व मध्ययुग, मध्ययुग आणि उत्तर मध्ययुग. कनौजचा सम्राट हर्षवर्धन (कार. ६०६–सु. ६४७) याचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने पराभव केला. तिथून पूर्व मध्ययुगाची सुरुवात मानली जाते. काही अभ्यासकांच्या मते गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर (इ. स. ५५५) पूर्व मध्ययुगाची सुरुवात होते. मध्ययुगीन कालखंडातील मध्याची सुरुवात १२ व्या शतकात होऊन त्याचा शेवट १६ व्या शतकात होतो. तर मोगल साम्राज्याचा उदय आणि त्यापुढील कालखंड हा उत्तर मध्ययुगीन कालखंड समजला जातो.

एकूणच जागतिक मध्ययुगीन इतिहासाबरोबर भारतातील पूर्व, मध्य आणि उत्तर मध्ययुगीन या कालखंडांतील १. राजवंश, २. राजे, ३. प्रसिद्ध व्यक्ती, ४. परकीय प्रवासी, ५. संत, ६. किल्ले, ७. वास्तू, मंदिरे, मूर्ती, वीरगळ, ८.सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थिती, ९. बखरी / इतिहासाची साधने, १०. उत्खनने आणि ११. मध्ययुगीन लढायांतील आयुधे इत्यादींवर योग्य, स्वतंत्र व संक्षिप्त नोंदी मराठी विश्वकोशाच्या या मध्ययुगीन इतिहास – भारतीय व जागतिक या ज्ञानमंडळात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यांतील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन ६०० ते इसवी सन १८०० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी मध्ययुगीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत. आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे.

ग. ह. खरे (Ganesh Hari Khare)  

ग. ह. खरे

खरे, गणेश हरि : (१०  जानेवारी  १९०१ —  ५ जून १९८५ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास-संशोधक. पनवेल येथे जन्म. शालेय शिक्षण पनवेल, बेळगाव ...
गणपती-पंतप्रधान रुपया (The Ganapati-Pantpradhan Coins of Miraj)

गणपती-पंतप्रधान रुपया

रुपया प्रकारातील चांदीचे एक चलनी नाणे. मिरज येथील गंगाधरराव पटवर्धन या पेशव्यांच्या सरदारांनी हे नाणे पाडले. अठराव्या शतकात मराठ्यांनी आपल्या ...
गाँथालो (गोंझालो) पिझारो (Gonzalo Pizarro)

गाँथालो

पिझारो, गाँथालो : (१५०६–१५४८). स्पॅनिश समन्वेषक व वसाहतकार. त्याचा जन्म स्पेनमधील त्रुहील्यो (Trujillo) येथे झाला. फ्रॅन्सिस्को (फ्रांथीस्को) पिझारो (१४७८–१५४१) या ...
गोपाळगड (अंजनवेल) (Gopalgad)(Anjanvel)

गोपाळगड

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील एक किल्ला. तो वसिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावरील भूशिरावर वसलेला असून दोन भागांत विभागलेला आहे. खाडीजवळील पडकोट ...
गोरक्षनाथ (गोरखनाथ) (Gorakshanath)

गोरक्षनाथ

नाथ संप्रदायातील एक महान गुरू. हठयोगातील महान नाथ-योगी. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य. गोरक्षनाथांना बोली भाषेत ‘गोरखनाथ’ या नावाने संपूर्ण भारतीय उपखंडात ओळखतात ...
गोवळकोट (गोविंदगड) (Govalkot)

गोवळकोट

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ला. तो चिपळूण तालुक्यामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर आहे. चिपळूण शहर वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेले असून समुद्रातून येणारा ...
गोवळकोटची लढाई (Battle of Govalkot)

गोवळकोटची लढाई

मराठे आणि जंजिरेकर सिद्दी यांच्यातील महत्त्वाची लढाई. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात हा गोवळकोट आहे. सन १७३० पासून गोवळकोटचा परिसर सिद्दीकडून ...
गोव्यातील किल्ले (Forts of Goa)

गोव्यातील किल्ले

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे राज्य. या प्रदेशावर मौर्य, सातवाहन, कदंब, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, दिल्लीचे सुलतान, विजयनगर, बहमनी, आदिलशाही ...
गौतम झुआन (Gautama Zhuan)

गौतम झुआन

गौतम झुआन : (७१२–७७६). प्राचीन चीनमधील भारतीय वंशाचा एक प्रशासकीय अधिकारी व राजज्योतिषी. त्याच्या कुटुंबाचा मूळपुरुष गौतम प्रज्ञारुची नामक वाराणसीतील ...
घनगड (Ghangad)

घनगड

पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. समुद्रसपाटीपासून २५६६ फूट उंचीवर असणारा हा किल्ला ‘येकोल्याचा किल्लाʼ या नावाने देखील ओळखला जातो. पुणे शहरापासून ...
घाशीराम कोतवाल (Ghashiram Kotwal)

घाशीराम कोतवाल

पुणे येथील पेशवेकालीन एक प्रसिद्ध कोतवाल. त्याच्या वडिलांचे नाव सावळादास (शामळदास). घाशीराम मुळचा औरंगाबादचा. नोकरी किंवा व्यापाराच्या निमित्ताने तो पुण्यात ...
घोरपडे घराणे, गुत्ती

गुत्तीचे घोरपडे घराणे व त्यांची नाणी : दक्षिण भारतातील कर्नाटकमधील गुत्ती येथील मराठा सत्ताधीश घोरपडे घराण्याने पाडलेली नाणी. भोसले घराण्याचा ...
चंदेरी संस्थान (Chanderi Dynasty)

चंदेरी संस्थान

मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध प्राचीन संस्थान. विंध्यांचल पर्वतरांगेच्या बुंदेलखंड भागातील अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी हे शहर चंद्रगिरी आणि चंद्रपूरम या नावांनीही ...
चर्पटीनाथ (Charpatinath)

चर्पटीनाथ

एक प्रसिद्ध रससिद्ध व नाथ-योगी. चर्पटीनाथांना चर्पटी, चर्पटीपाद, चर्पट्री, चर्यादिपा या इतर नावांनीही ओळखले जाते. मीनचेतनात यांना ‘कर्पटीनाथ’ म्हटले गेले ...
चांदबीबी (Chand Bibi)

चांदबीबी

चांदबीबी : (सु. १५४७ – ९९). निजामशाही घराण्यातील एक कर्तबगार आणि शूर स्त्री. ती हुसैन निजामशाहाची मुलगी. पहिल्या अली आदिलशाहाशी १५६४ साली ...
चिमाजी आप्पा (Chimaji Appa)

चिमाजी आप्पा

मराठेशाहीतील एक पराक्रमी सेनानी. बाळाजी विश्वनाथ (सु. १६६० ? — २ एप्रिल १७२०) यांचा मुलगा व पहिला बाजीराव (कार. १७२०—४०) ...
चौरंगीनाथ (Chauranginath)

चौरंगीनाथ

नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक नाथ-योगी. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य. चौरंगीनाथांना ‘सारंगधर’ आणि ‘पूरण भगत’ या अन्य नावांनीही ओळखले जाते. त्यांचा सर्वांत जुना ...
छत्रपती राजाराम महाराज

छत्रपती राजाराम महाराज : (२४ फेब्रुवारी १६७० – २ मार्च १७००). छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र आणि मराठेशाहीतील तिसरे छत्रपती ...
छत्रपती रामराजे भोसले (Chhatrapati Ramraje Bhosale)

छत्रपती रामराजे भोसले

रामराजे, छत्रपति : (? १७२२ — ९ डिसेंबर १७७७). सातारा संस्थानचे छत्रपती. सातारा गादीचे पहिले संस्थापक छत्रपती शाहू (१६८२—१७४९) यांच्या ...
जनार्दनपंत (Janardanpant)

जनार्दनपंत

जनार्दनपंत पेशवे : ( १० जुलै १७३५–२१ सप्टेंबर १७४९ ). मराठेशाहीतील श्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव (१७००–१७४०) यांचे पुत्र. त्यांचा जन्म ...