(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मध्ययुग ही इतिहासातील विशिष्ट कालखंड दर्शविणारी एक संज्ञा होय. तिचा प्रदेशपरत्वे कालखंड भिन्न असून मध्ययुगीन कालखंड केव्हा सुरू होतो आणि कधी समाप्त होतो याची संदिग्धता आढळते; तथापि यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन इतिहासकारांनी रूढ केली व तीच सर्व पाश्चात्त्य देशांत ग्राह्य ठेवली. इ. स. सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षांच्या कालखंडाला सामान्यत: यूरोपीय इतिहासात ‘मध्ययुग’ ही संज्ञा देतात.

भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. मध्ययुगीन इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरित होय. त्यांतून सम्राट हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर बिल्हणाचे विक्रमांकदेवचरित, हेमचंद्राचे कुमारपालचरित, संध्याकर नंदीचे रामचरित, मेरुतुंगाचा प्रबंध चिंतामणी वगैरे ग्रंथांतून मध्ययुगीन राजसत्तांविषयी माहिती मिळते. कल्हणाच्या राजतरंगिणीत काश्मीरच्या राजवंशाचा इतिहास आहे. हे काही निवडक ग्रंथ सोडले तर या काळाविषयी बखरी, शिलालेख, प्रवासवर्णने, सनदा, नाणी इ. साधनांचा आधार घ्यावा लागतो.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची विभागणी तीन भागांत केली जाते. पूर्व मध्ययुग, मध्ययुग आणि उत्तर मध्ययुग. कनौजचा सम्राट हर्षवर्धन (कार. ६०६–सु. ६४७) याचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने पराभव केला. तिथून पूर्व मध्ययुगाची सुरुवात मानली जाते. काही अभ्यासकांच्या मते गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर (इ. स. ५५५) पूर्व मध्ययुगाची सुरुवात होते. मध्ययुगीन कालखंडातील मध्याची सुरुवात १२ व्या शतकात होऊन त्याचा शेवट १६ व्या शतकात होतो. तर मोगल साम्राज्याचा उदय आणि त्यापुढील कालखंड हा उत्तर मध्ययुगीन कालखंड समजला जातो.

एकूणच जागतिक मध्ययुगीन इतिहासाबरोबर भारतातील पूर्व, मध्य आणि उत्तर मध्ययुगीन या कालखंडांतील १. राजवंश, २. राजे, ३. प्रसिद्ध व्यक्ती, ४. परकीय प्रवासी, ५. संत, ६. किल्ले, ७. वास्तू, मंदिरे, मूर्ती, वीरगळ, ८.सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थिती, ९. बखरी / इतिहासाची साधने, १०. उत्खनने आणि ११. मध्ययुगीन लढायांतील आयुधे इत्यादींवर योग्य, स्वतंत्र व संक्षिप्त नोंदी मराठी विश्वकोशाच्या या मध्ययुगीन इतिहास – भारतीय व जागतिक या ज्ञानमंडळात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यांतील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन ६०० ते इसवी सन १८०० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी मध्ययुगीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत. आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे.

इंदूर संस्थान (Indore State)

इंदूर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. क्षेत्रफळ २४,६०५ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस ग्वाल्हेर, पूर्वेस देवास व भोपाळ, दक्षिणेस पूर्वीचा मुंबई इलाखा, ...
इब्‍न बतूता (Ibn Battuta)

इब्‍न बतूता

इब्‍न बतूता : (२४ फेब्रुवारी १३०४-१३७८). मध्ययुगातील एक प्रसिद्ध अरब प्रवासी व प्रवासवर्णनकार. मोरोक्कोमधील तँजिअर या शहरात न्यायाधीशांची (काझी) परंपरा ...
इब्राहिम आदिलशाह, दुसरा (Ibrahim Adil Shah, II)

इब्राहिम आदिलशाह, दुसरा

दुसरा इब्राहिम आदिलशाह : (१५५६ – १६२७). मध्ययुगीन दक्षिण भारतातील मुसलमानी राज्यसत्तेतील एक सुलतान. ‘अज पूजा सिरी सरसतीʼ आणि इब्राहिम ...
इब्राहिमखान गारदी (Ibrahim Khan Gardi)

इब्राहिमखान गारदी

गारदी, इब्राहिमखान : (? – १७६१). पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांचा एक प्रमुख सरदार. या लढाईत त्याने गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले ...
उदगीर किल्ला (Udgir Fort)

उदगीर किल्ला

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला. उदगीर हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून लातूरपासून ६५ किमी. अंतरावर वसले आहे. उदगीरच्या ...
उदयपूर संस्थान (Udaypur State)

उदयपूर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानमधील राजस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ३२,८६८ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस अजमीर, मेवाड आणि शाहपूर; पश्चिमेस जोधपूर आणि सिरोही;  दक्षिणेस दुर्गापूर, बांसवाडा आणि ...
उदीराज मुनशी (उदयराज) (Udiraj Munashi)

उदीराज मुनशी

मुनशी, उदीराज : उदयराज. मोगल सरदार रुस्तमखान आणि मिर्झाराजा जयसिंह यांच्या हाताखालील एक विश्वासू चिटणीस. तो आपल्या अंगीभूत कौशल्याने आणि ...
औरंगजेबाची किल्ले मोहीम (Aurangzeb's Fort Expedition)

औरंगजेबाची किल्ले मोहीम

दिल्लीचा मोगल बादशाह औरंगजेब (१६१८—१७०७) याने दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध केलेली मोहीम. औरंगजेबाला मराठ्यांच्या वाढत्या सत्तेला छ. शिवाजी महाराजांच्या हयातीत आळा घालता ...
औसा किल्ला (Ausa Fort)

औसा किल्ला

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला. हा किल्ला औसा शहराच्या दक्षिणेस सु. ३ किमी., लातूर शहरापासून २० किमी., तर ...
कतरिना दी सान क्वान (Catarina de San Juan)

कतरिना दी सान क्वान

कतरिना दी सान क्वान : (१६०६–१६८८). मेक्सिकन वसाहतीतील एक गुलामगिरीविरोधी चळवळीतील कार्यकर्ती आणि ख्रिस्ती धर्मगुरू. तिच्या पूर्वायुष्याविषयी नेमकी माहिती मिळत ...
कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग (Kanakdurg and Fattedurg)

कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले. कनकदुर्ग हा किल्ला हर्णे गावापासून १.५ किमी. अंतरावर असलेल्या हर्णे बंदराजवळ आहे. किल्ला तीन बाजूंनी ...
कन्नौज (Kannauj)

कन्नौज

भारतातील एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ. गंगा नदीच्या तीरावर असलेले हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असून ते कानपूर (उत्तर प्रदेश) शहराच्या वायव्य ...
कर्नल याकोब पेत्रुस (Colonel Jacob Petrus)

कर्नल याकोब पेत्रुस

कर्नल याकोब पेत्रुस : (२४ मार्च १७५५ – २४ जून १८५०). भूतपूर्व ग्वाल्हेर संस्थानमधील लष्करी अधिकारी. त्याचा जन्म दिल्लीत झाला ...
कल्याणी चालुक्यांची नाणी (Coins of the Kalyani Chalukyas)

कल्याणी चालुक्यांची नाणी

दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध राजवंश (इ. स. दहावे शतक ते तेराव्या शतकाची सुरुवात). कर्नाटकातील कल्याणी (बसवकल्याण) ही त्यांची राजधानी. कल्याणी ...
कानिफनाथ (सिद्ध कृष्णपाद) (Kaniphanath)

कानिफनाथ

नवनाथांपैकी एक ‘नाथ’ व चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक ‘सिद्ध’. जालंधरनाथांचे शिष्य. साधारणतः दहाव्या-बाराव्या शतकातील बंगाली चर्यापदांमध्ये ते स्वतःला ‘कापालिक’ संबोधतात. कानिफनाथांना ...
कासारदुर्ग (Kasardurg)

कासारदुर्ग

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील किल्ला. हा गुढे गावाजवळ वसलेला असून कुटगिरी नदीवरील पुलापासून पुढे ५० मी. अंतरावर कासारदुर्ग किल्ल्याचा खंदक ...
किल्ले (दुर्ग) (Forts)

किल्ले

शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे ...
केंजळगड (घेराकेळंज) (Kenjalgad)

केंजळगड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा वाई तालुक्यात वाई शहरापासून वायव्येस सु. २८ किमी. अंतरावर, तर पुण्याहून सु. ८० ...
केळशी (Kelshi)

केळशी

रत्नागिरी जिल्ह्यातील एक मध्ययुगीन तसेच सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे एक वाळूचे टेकाड (जुने वालुधन्व) असून दापोली तालुक्यात भारजा नदीच्या मुखाशी ...
खुन्या मुरलीधर (Khunya Muralidhar)

खुन्या मुरलीधर

पुणे येथे पेशवाईत बांधलेले प्रसिद्ध मंदिर. पुण्यातील सदाशिव पेठेत सावकार रघुनाथ सदाशिव उर्फ दादा गद्रे यांनी मुरलीधराचे मंदिर बांधले (१७९९) ...