(प्रस्तावना) पालकसंस्था : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक | समन्वयक : सरोज उपासनी | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड

रुग्णाच्या सर्व गरजा तत्परतेने, काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने पूर्ण करण्याला रुग्णपरिचर्या म्हणतात. आजारी व्यक्तीची योग्य काळजी घेऊन, वैद्याने योजिलेल्या उपचारांचा त्याला सर्व प्रकारे फायदा मिळवून देणे हा रुणपरिचर्येचा प्रमुख उद्देश असतो. परिचर्या हा वैद्यकाचा महत्त्वाचा घटक असल्याने अनादिकालापासून ज्ञात असल्याची नोंद भारतीय इतिहासात आढळते. सुश्रुतांनी सांगितलेल्या वैद्यकाच्या चार आधारस्तंभांपैकी “रुग्णपरिचारिका” हा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. चरकांच्या मते परिचारिकेला, “औषध तयार करण्याचे किंवा त्यांचे मिश्रण तयार करता येण्याचे ज्ञान असावे; परिचर्या करणारी व्यक्ती हुशार, रुग्णसमर्पित व कायावाचामने शुद्ध असावी.”
परिचर्या हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून त्यासाठी प्रशिक्षित परिचारिका (स्त्री / पुरुष) पदवी, पदविका व पदव्युत्तर हे शिक्षण घेऊन प्राविण्य मिळवितात. त्यानंतर परिचारिका विविध वयोगटातील व विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना विविध दवाखाने, आरोग्यकेंद्र यामार्फत सेवा-शुश्रूषा पुरवितात. तसेच त्या निरोगी व्यक्ती व कुटुंबांचे आरोग्य संवर्धन, आरोग्य संवर्धन, आरोग्य शिक्षण पुरवून प्रतिबंधात्मक सेवा समाजाला पुरवितात.

मानवाची शुश्रूषा करणे हे रुग्णपरिचारिकेचे आद्य कर्तव्य असते. परिचारिकेने रुग्णाची सेवा करणे, त्याच्या सामाजिक व आध्यात्मिक परिसराची तो रोगमुक्त होण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी घेणे, तसेच आरोग्य शिक्षणाने व स्वत:च्या उदाहरणाने आजार टाळणे आणि प्रकृतिस्वास्थ्य टिकविण्याचे महत्त्व पटविणे ही कार्ये करतात. वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यविषयक सेवा करताना इतर आरोग्यासंबंधीच्या सेवांबरोबर सहसंयोजन साधणे जरूर असते. परिचर्येची गरज जागतिक स्वरूपाची आहे. परिचर्येच्या आड देश, जात, वर्ण, राजकीय किंवा सामाजिक भेदभाव येऊ शकत नाहीत.

मराठी भाषा व मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी व प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. त्यालाच अनुसरून परिचर्या किंवा नर्सिंग या विषयातील अद्ययावत ज्ञान मराठीतून उपलब्ध करून देण्याचे कार्य परिचर्या या ज्ञानमंडळाद्वारे करण्यात येत आहे. परिचर्या या ज्ञानमंडळामध्ये मूलभूत परिचर्या, संशोधन व व्यवस्थापन परिचर्या, सामाजिक आरोग्य परिचर्या, वैद्यकिय व शल्यचिकित्सा परिचर्या, मानसिक आरोग्य व मानसिक आजार परिचर्या, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र परिचर्या आणि बालरोग व संगोपन परिचर्या या उपविषयांचा समावेश केला आहे. या नोंदी विशिष्ट परिचर्या, वैशिष्ट्यपूर्ण परिचर्या आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण परिचर्या या विभागांत वर्गीकृत करून दिल्या आहेत. या विषयाचे महत्त्वपूर्ण ज्ञान मराठीतून उपलब्ध झाल्याने वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरेल.

बहूद्देशीय आरोग्य परिचारिका (Multi Purpose Health Worker)

बहूद्देशीय आरोग्य परिचारिका

प्रस्तावना : भारत सरकारतर्फे १९७२ मध्ये श्री. कर्तारसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत एक समिती ...
बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व सेवा (Child Survival and Safe Motherhood Services)

बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व सेवा

प्रस्तावना : राष्ट्रीय बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व (CSSM) हा कार्यक्रम २० ऑगस्ट १९९२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते भारतात सुरू ...
बालकांचे चिकित्सालय व सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका ( Under Five Clinics & Role of Community Health Nurse )

बालकांचे चिकित्सालय व सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका

बालकांचे चिकित्सालय प्रामुख्याने शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांकरिता विकसित केले गेले आहे. यामध्ये रोगनिवारक, प्रतिबंधात्मक आणि प्रोहात्सन देणारी आरोग्य ...
बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक ( Factors affecting the growth and development of the child)

बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक

प्रस्तावना : वाढ व विकासाची प्रक्रिया ही बाळ जन्माला येण्याआधी म्हणजेच मातेच्या गर्भाशयात गर्भधारणा झाल्यापासूनच सुरू झालेली असते. म्हणूनच या ...
भारतीय परिचर्या मानके (Indian Nursing standards)

भारतीय परिचर्या मानके

प्रस्तावना : परिचर्या शास्त्राची जनक फ्लोरेंस नायटिंगेल यांनी सर्वप्रथमत “गुणवत्ता पूर्वक परिचर्या” या विषयाची संकल्पना मांडली. गुणवत्ता पूर्वक परिचर्या देण्याची ...
मनोरुग्ण रुग्णालयात दाखल व रवाना होण्याची प्रक्रिया (Admission and Discharge procedure of Mentally Ill Patient)

मनोरुग्ण रुग्णालयात दाखल व रवाना होण्याची प्रक्रिया

मनोरुग्णाचा रुग्णालयातील प्रवेश आणि रुग्णालयातून रवाना होण्याची प्रक्रिया हे घटक  मानसिक आरोग्य कायदा या विषयांतर्गत अभ्यास केले जातात. मनोरुग्ण परिचर्या ...
मनोरुग्णाचे पुनर्वसन आणि मनोरुग्ण परिचारिकेची भूमिका  (Rehabilitation of Mentally ill Patient and Role of Psychiatric Nurse)

मनोरुग्णाचे पुनर्वसन आणि मनोरुग्ण परिचारिकेची भूमिका

रुग्ण किंवा व्यक्ती ज्याची रोजच्या कामकाजाची क्षमता काही कारणाने किंवा काही आजारामुळे बाधित झालेली असते अशा व्यक्‍तीस त्याच्या सर्वसाधारण कामकाजाच्या ...
मानवी संबंध आणि परिचारिका  (Human Relation and Nurses)

मानवी संबंध आणि परिचारिका 

परिचर्या व्यवस्थापनात व आरोग्य सेवेत मानवी सबंध आणि परस्पर सबंध हे महत्त्वाचे घटक असतात. मानवी संबध ही एक सामाजिक प्रक्रिया ...
मानसिक आजार प्रतिबंधासाठी परिचारिकेची भूमिका (The Role of Nurse for Mental Illness Prevention)

मानसिक आजार प्रतिबंधासाठी परिचारिकेची भूमिका

मानसिक आजार म्हणजे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील बिघाड. मानसिक आजार हे व्यक्तीमधील दैनंदिन मानवी गरजा परिपूर्ण करण्याच्या प्रभावी आणि पारंपरिक क्षमतेमध्ये ...
मानसिक आरोग्य व परिचर्या (Mental Health and Nursing)

मानसिक आरोग्य व परिचर्या

प्रस्तावना : व्यक्तीच्या आरोग्य या संकल्पनेमध्ये आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचाही समावेश होतो. तणावपूर्ण, स्पर्धात्मक व जलद जीवनशैली मधील प्राप्त परीस्थितीस आनंदाने, ...
मुलांची शारीरिक वाढ व परिचर्या (Physical Growth of Children and Nursing)

मुलांची शारीरिक वाढ व परिचर्या

शारीरिक वाढीची तपासणी ही मानवमितिय मोजमाप (anthropometric measurement)  आणि शारीरिक वाढीचा वेग यावरून करता येते. शारीरिक वाढीची तपासणी ही प्रामुख्याने ...
मुलांमधील वर्तणुकीच्या समस्या व परिचर्या (Behavioral Problems in children and Nursing)

मुलांमधील वर्तणुकीच्या समस्या व परिचर्या

बाल्यावस्था ही मानवी जीवनातील इतरांवर अवलंबून असणारी अवस्था आहे. हळूहळू बालक आपल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास शिकते. परंतु जेव्हा त्यांच्या सभोवतालचे ...
मुलांमधील स्थूलपणा व परिचर्या (Obesity in children and Nursing)

मुलांमधील स्थूलपणा व परिचर्या

किशोरवयीन मुलांमधील स्थूलता ही जागतिक आरोग्य समस्या बनते आहे. स्थूलतेचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असल्याने ती टाळणे ...
मूलभूत परिचर्या (Fundamental Nursing)

मूलभूत परिचर्या

मूलभूत परिचर्या ही संकल्पना मानवाच्या निर्मिती पासूनच आलेली आहे. अपत्य प्राप्तीनंतर आईने बालकाचे संपूर्ण संगोपन करणे, घरातील स्त्रीने मुलाबाळांची, वयस्कर, ...
रक्तसंक्रमण प्रक्रिया परिचर्या (Blood transfusion procedure nursing)

रक्तसंक्रमण प्रक्रिया परिचर्या

अपघात, आघात किंवा इतर काही कारणांमुळे अतिरक्तस्राव झाला व शरीरातील रक्त कमी झाले असता रुग्णाला शिरेतून बाह्य रक्तपुरवठा केला ...
रुग्ण पाठवणी प्रक्रिया व परिचर्या (Patient Discharge Process and Nursing)

रुग्ण पाठवणी प्रक्रिया व परिचर्या

व्यक्तीचे आजारपण, त्यासाठी दवाखान्यात दाखल होणे आणि संपूर्ण उपचार प्रक्रिया हे सर्व त्या व्यक्तीला एक नवीन अनुभव देऊन जातो. त्याचबरोबर ...
रुग्ण प्रवेश व परिचर्या (Patient Admission And Nursing)

रुग्ण प्रवेश व परिचर्या

व्यक्ती आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये दोन प्रकारे उपचारासाठी दाखल होते.
  • नियमित प्रवेश ( Routine Admission)
  • आपत्कालीन प्रवेश (Emergency Admission)
...
रुग्णाची वैद्यकीय तपासणी व परिचर्या  (Patient’s Medical examination And Nursing)

रुग्णाची वैद्यकीय तपासणी व परिचर्या 

प्रस्तावना (Introduction) : रुग्णाची रुग्णालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी डॉक्टरांना रुग्णाची तपासणी करणे आणि उपचार सुरु करण्याची आवश्यकता असते. यासाठी ...
वातायक संलग्न रुग्ण परिचर्या (Ventilator attached patient care)

वातायक संलग्न रुग्ण परिचर्या

रुग्णाच्या श्वसन मार्गातील वायुप्रवाह नियंत्रित करणाऱ्या यंत्राला यांत्रिक वातायक (mechanical ventilator) असे म्हणतात. चिंताजनक स्थितीत असणाऱ्या रुग्णाची अस्वाभाविक श्वसनक्रिया स्वाभाविक ...
विद्युताघात उपचार पद्धती व परिचर्या (Electroconvulsive Therapy and Nursing)

विद्युताघात उपचार पद्धती व परिचर्या

विद्युत उपकरणांद्वारे कृत्रिम पद्धतीने मेंदूमध्ये बृहत् अपस्मार (Grand mal) झटके देऊन मेंदूच्या पुरो-पश्च भागात (fronto-temporal) किंवा मेंदूच्या प्रबळ नसलेल्या एका ...