रुग्णाच्या सर्व गरजा तत्परतेने, काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने पूर्ण करण्याला रुग्णपरिचर्या म्हणतात. आजारी व्यक्तीची योग्य काळजी घेऊन, वैद्याने योजिलेल्या उपचारांचा त्याला सर्व प्रकारे फायदा मिळवून देणे हा रुणपरिचर्येचा प्रमुख उद्देश असतो. परिचर्या हा वैद्यकाचा महत्त्वाचा घटक असल्याने अनादिकालापासून ज्ञात असल्याची नोंद भारतीय इतिहासात आढळते. सुश्रुतांनी सांगितलेल्या वैद्यकाच्या चार आधारस्तंभांपैकी “रुग्णपरिचारिका” हा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. चरकांच्या मते परिचारिकेला, “औषध तयार करण्याचे किंवा त्यांचे मिश्रण तयार करता येण्याचे ज्ञान असावे; परिचर्या करणारी व्यक्ती हुशार, रुग्णसमर्पित व कायावाचामने शुद्ध असावी.”
परिचर्या हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून त्यासाठी प्रशिक्षित परिचारिका (स्त्री / पुरुष) पदवी, पदविका व पदव्युत्तर हे शिक्षण घेऊन प्राविण्य मिळवितात. त्यानंतर परिचारिका विविध वयोगटातील व विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना विविध दवाखाने, आरोग्यकेंद्र यामार्फत सेवा-शुश्रूषा पुरवितात. तसेच त्या निरोगी व्यक्ती व कुटुंबांचे आरोग्य संवर्धन, आरोग्य संवर्धन, आरोग्य शिक्षण पुरवून प्रतिबंधात्मक सेवा समाजाला पुरवितात.
मानवाची शुश्रूषा करणे हे रुग्णपरिचारिकेचे आद्य कर्तव्य असते. परिचारिकेने रुग्णाची सेवा करणे, त्याच्या सामाजिक व आध्यात्मिक परिसराची तो रोगमुक्त होण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी घेणे, तसेच आरोग्य शिक्षणाने व स्वत:च्या उदाहरणाने आजार टाळणे आणि प्रकृतिस्वास्थ्य टिकविण्याचे महत्त्व पटविणे ही कार्ये करतात. वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यविषयक सेवा करताना इतर आरोग्यासंबंधीच्या सेवांबरोबर सहसंयोजन साधणे जरूर असते. परिचर्येची गरज जागतिक स्वरूपाची आहे. परिचर्येच्या आड देश, जात, वर्ण, राजकीय किंवा सामाजिक भेदभाव येऊ शकत नाहीत.
मराठी भाषा व मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी व प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. त्यालाच अनुसरून परिचर्या किंवा नर्सिंग या विषयातील अद्ययावत ज्ञान मराठीतून उपलब्ध करून देण्याचे कार्य परिचर्या या ज्ञानमंडळाद्वारे करण्यात येत आहे. परिचर्या या ज्ञानमंडळामध्ये मूलभूत परिचर्या, संशोधन व व्यवस्थापन परिचर्या, सामाजिक आरोग्य परिचर्या, वैद्यकिय व शल्यचिकित्सा परिचर्या, मानसिक आरोग्य व मानसिक आजार परिचर्या, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र परिचर्या आणि बालरोग व संगोपन परिचर्या या उपविषयांचा समावेश केला आहे. या नोंदी विशिष्ट परिचर्या, वैशिष्ट्यपूर्ण परिचर्या आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण परिचर्या या विभागांत वर्गीकृत करून दिल्या आहेत. या विषयाचे महत्त्वपूर्ण ज्ञान मराठीतून उपलब्ध झाल्याने वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरेल.

अतिदक्षता विभाग : परिचारिकेचे कर्तव्य व जबाबदारी (Intensive Care Unit : Duties and Responsibilities of Nurse)

आघात रुग्ण परिचर्या (Trauma patient Nursing)

उपजत व्यंग (Congenital Anomalies)

ऋतुनिवृत्ती व परिचर्या (Menopause and Nursing)

ऋतुस्राव व परिचर्या (Menstruation And Nursing)

कर्करोग नियंत्रण व प्रतिबंध परिचर्या (Cancer Control and Prevention Nursing)

कौटुंबिक आरोग्य सेवा व परिचर्या (Family Health care & nursing)

कौटुंबिक परिचर्या देण्यासाठी उपयोगी स्त्रोत (Identifying resources in Family Health Nursing Care)

गृहभेटीद्वारे कौटुंबिक आरोग्य परिचर्या (Family Oriented Nursing Care : Home Visit)

ग्रामीण आरोग्य सेवा : पर्यवेक्षक भूमिका (Rural Health Services : Supervisor Role)

जीवनावश्यक चिन्हे तपासणीमध्ये परिचारिकेची भूमिका (Role of Nurse in Examination of Vital Signs)

जोखमीचे गरोदरपण व परिचर्येचे निरीक्षण (Risk Pregnancy and Care Monitoring)

नवजात शिशु परिचर्या (Neonatal Nursing)

परिचर्या : व्यवसायिक संकल्पना (Nursing : Occupational Concept)

परिचर्या (आरोग्य सेवेचा अविभाज्य भाग)(Nursing)

परिचर्या क्षेत्रात संगणकाची उपयुक्तता (The Usefulness of Computer in Nursing field)

परिचर्या प्रक्रिया (NURSING PROCESS)

परिचर्या व्यवस्थापन प्रक्रिया (Nursing Management System)

परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन व प्रशासन (Nursing Management & amp; Administration)
