(प्रस्तावना) पालकसंस्था : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक | समन्वयक : सरोज उपासनी | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड

रुग्णाच्या सर्व गरजा तत्परतेने, काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने पूर्ण करण्याला रुग्णपरिचर्या म्हणतात. आजारी व्यक्तीची योग्य काळजी घेऊन, वैद्याने योजिलेल्या उपचारांचा त्याला सर्व प्रकारे फायदा मिळवून देणे हा रुणपरिचर्येचा प्रमुख उद्देश असतो. परिचर्या हा वैद्यकाचा महत्त्वाचा घटक असल्याने अनादिकालापासून ज्ञात असल्याची नोंद भारतीय इतिहासात आढळते. सुश्रुतांनी सांगितलेल्या वैद्यकाच्या चार आधारस्तंभांपैकी “रुग्णपरिचारिका” हा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. चरकांच्या मते परिचारिकेला, “औषध तयार करण्याचे किंवा त्यांचे मिश्रण तयार करता येण्याचे ज्ञान असावे; परिचर्या करणारी व्यक्ती हुशार, रुग्णसमर्पित व कायावाचामने शुद्ध असावी.”
परिचर्या हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून त्यासाठी प्रशिक्षित परिचारिका (स्त्री / पुरुष) पदवी, पदविका व पदव्युत्तर हे शिक्षण घेऊन प्राविण्य मिळवितात. त्यानंतर परिचारिका विविध वयोगटातील व विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना विविध दवाखाने, आरोग्यकेंद्र यामार्फत सेवा-शुश्रूषा पुरवितात. तसेच त्या निरोगी व्यक्ती व कुटुंबांचे आरोग्य संवर्धन, आरोग्य संवर्धन, आरोग्य शिक्षण पुरवून प्रतिबंधात्मक सेवा समाजाला पुरवितात.

मानवाची शुश्रूषा करणे हे रुग्णपरिचारिकेचे आद्य कर्तव्य असते. परिचारिकेने रुग्णाची सेवा करणे, त्याच्या सामाजिक व आध्यात्मिक परिसराची तो रोगमुक्त होण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी घेणे, तसेच आरोग्य शिक्षणाने व स्वत:च्या उदाहरणाने आजार टाळणे आणि प्रकृतिस्वास्थ्य टिकविण्याचे महत्त्व पटविणे ही कार्ये करतात. वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यविषयक सेवा करताना इतर आरोग्यासंबंधीच्या सेवांबरोबर सहसंयोजन साधणे जरूर असते. परिचर्येची गरज जागतिक स्वरूपाची आहे. परिचर्येच्या आड देश, जात, वर्ण, राजकीय किंवा सामाजिक भेदभाव येऊ शकत नाहीत.

मराठी भाषा व मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी व प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. त्यालाच अनुसरून परिचर्या किंवा नर्सिंग या विषयातील अद्ययावत ज्ञान मराठीतून उपलब्ध करून देण्याचे कार्य परिचर्या या ज्ञानमंडळाद्वारे करण्यात येत आहे. परिचर्या या ज्ञानमंडळामध्ये मूलभूत परिचर्या, संशोधन व व्यवस्थापन परिचर्या, सामाजिक आरोग्य परिचर्या, वैद्यकिय व शल्यचिकित्सा परिचर्या, मानसिक आरोग्य व मानसिक आजार परिचर्या, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र परिचर्या आणि बालरोग व संगोपन परिचर्या या उपविषयांचा समावेश केला आहे. या नोंदी विशिष्ट परिचर्या, वैशिष्ट्यपूर्ण परिचर्या आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण परिचर्या या विभागांत वर्गीकृत करून दिल्या आहेत. या विषयाचे महत्त्वपूर्ण ज्ञान मराठीतून उपलब्ध झाल्याने वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरेल.

परिचर्या माहितीशास्त्र प्रतिकृती [Nursing Informatics Model]

शिक्षण, संशोधन आणि प्रशासन विज्ञान यांच्याद्वारे वैद्यकीय सराव प्रदान करण्यासाठी आरोग्यसेवा कशी वापरावी याचे वर्णन परिचर्या माहितीशास्त्र प्रतिकृतीद्वारे केले जाते ...
परिचर्या व्यवस्थापन प्रक्रिया (Nursing Management System)

परिचर्या व्यवस्थापन प्रक्रिया

प्रस्तावना : रुग्णालयातील परिचर्या व्यवस्थापनात रुग्ण सेवा देण्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश केला जातो. रुग्ण सेवा ही रुग्णाला कोणत्या प्रकारचा आजार ...
परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन व प्रशासन (Nursing Management & amp; Administration)

परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन व प्रशासन 

प्रशासन हा शब्द व्यवस्थापनाच्या संदर्भात वापरला जातो. याचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारची सेवा देणाऱ्या लोकांची काळजी घेण्याची सामूहिक क्रिया ...
परिचर्या संशोधन : अर्थ व व्याख्या (Nursing Research : Meaning and Definitions)

परिचर्या संशोधन : अर्थ व व्याख्या

अर्थ : संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे, काळजीपूर्वक परीक्षण करणे. संशोधन म्हणजे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ज्ञानाचे व माहितीचे प्रमाणीकरण करून ...
परिचर्या संशोधन : इतिहास (Nursing Research: History)

परिचर्या संशोधन : इतिहास

परिचर्या संशोधनाच्या इतिहासात मागील दीडशे वर्षांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९५० च्या आधी परिचर्या संशोधनाची उत्क्रांती ही ...
परिचर्या संशोधन : प्रकार (Nursing Research : Types)

परिचर्या संशोधन : प्रकार

परिचर्या संशोधन हे परिचारिकांनी करण्याच्या वेगवेगळ्या सेवाक्रिया व उपचार पद्धतीसाठी शास्त्रीय पुरावा निर्माण करून परिचर्या व्यवसायात शास्त्रीय ज्ञानाची भर घालते ...
परिचर्या संशोधन : प्रस्तावना (Nursing Research : Introduction)

परिचर्या संशोधन : प्रस्तावना

प्रत्येक क्षेत्रात त्या क्षेत्राशी निगडीत संशोधन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तसेच प्रत्येक क्षेत्रातील प्रगती ही त्या क्षेत्रातील संशोधनाशी निगडित ...
परिचर्या संशोधन : महत्त्व व गरज (Nursing Research : Importance and Need)

परिचर्या संशोधन : महत्त्व व गरज

परिचर्या संशोधनाचे महत्त्व हे परिचर्या क्षेत्रातील परिचर्या प्रशिक्षण, परिचर्या रुग्णसेवा, परिचर्या व्यवस्थापन आणि परिचर्या व्यवसाय या सर्व घटकांशी संबंधित आहे ...
परिचर्या संशोधन : वैशिष्ट्ये (Nursing Research : Characteristics)

परिचर्या संशोधन : वैशिष्ट्ये

परिचर्या संशोधनातून आरोग्यविषयीचे ज्ञान विकसित होते. आरोग्य समस्या किंवा व्यंग असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याकरिता तसेच वास्तविक किंवा संभाव्य आरोग्य समस्यांना ...
परिचर्येतील नैतिकतेची तत्त्वे (Code of Ethics in Nursing)

परिचर्येतील नैतिकतेची तत्त्वे

प्रस्तावना : नैतिक तत्त्वे व नीतिमूल्ये ही प्रत्येक परिचारिकेच्या वर्तणुकीचा अथवा कर्तव्याचा एक अविभाज्य आहे. परिचारिका आपल्या व्यावसायिक पदानुसार रुग्णांना ...
परिचर्येमध्ये समाजशास्त्राचा सहभाग (Participation of Sociology in Nursing)

परिचर्येमध्ये समाजशास्त्राचा सहभाग

प्रस्तावना : समाजशास्त्र म्हणजे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. समाजशास्त्र हे व्यक्ती व त्याच्या सभोवतालचे वातावरण याचा अभ्यास करते. परिचारिका व्यक्तीच्या आरोग्यासाठी ...
परिचारिका : आरोग्य संघाचा एक घटक (Nurse : A Component of Health Team)

परिचारिका : आरोग्य संघाचा एक घटक

समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य टिकविणे, वृद्धिंगत करणे, रोग होऊ न देणे, आजार झाला असल्यास बरा करणे व त्याचे पुनर्वसन करणे ...
परिचारिका (आरोग्य सेवेचा  कणा ) (Nurse)

परिचारिका

अनादिकालापासून प्रत्येक स्त्रीला तिच्या कुटुंबातील कुणातरी आजारी व्यक्तीची परिचर्या करण्याचा प्रसंग आलेलाच असतो. रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या स्त्रीला “नर्स” हा इंग्रजी ...
परिचारिका आणि मनोरुग्ण संबंध (Nurse and Mentally Ill Patient Relationship)

परिचारिका आणि मनोरुग्ण संबंध

प्रस्तावना : “दोन व्यक्तींमधील असलेली आपुलकी किंवा नाते यालाच संबंध (Relationship) असे म्हटले जाते.” आरोग्य सेवा प्रणालीमध्ये परिचारिका आणि रुग्ण ...
पुनर्वसन व सामाजिक आरोग्य परिचारिका (Rehabilitation and Community Health Nursing)

पुनर्वसन व सामाजिक आरोग्य परिचारिका

व्याख्या : व्यक्तीची कार्यात्मक क्षमता शक्य तितकी जास्त होण्यासाठी वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक घटकांचा एकत्रितपणे, समायोजकपणे वापर करून व्यक्तीला शिक्षण ...
प्रजनन व बाल आरोग्य सेवा (Reproductive and Child Health Services)

प्रजनन व बाल आरोग्य सेवा

कैरो येथे १९९४ मध्ये लोकसंख्या आणि विकास यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमधील शिफारशींनुसार बहुप्रावस्था (Multiphase) प्रजनन व बाल आरोग्य या ...
प्रतिबंधात्मक बाल आरोग्य सेवा (Preventive child health care)

प्रतिबंधात्मक बाल आरोग्य सेवा

संकल्पना : बहुतांश बालरोग हे टाळता येण्याजोगे असतात. यामुळेच रोग झाल्यानंतर तो बरा करणे किंवा दुष्परिणाम टाळणे यापेक्षा रोग होऊच ...
प्रभावी संभाषण व रुग्ण सेवा (Effective Communication and Patient Care)

प्रभावी संभाषण व रुग्ण सेवा

परिचर्या क्षेत्रात आवश्यक कौशल्यांपैकी एक महत्त्वाचे कौशल्य म्हणजे संभाषण होय. संभाषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस माहिती पुरविणे ज्यामध्ये काहीवेळा ...
प्रसूतिपूर्व तपासणी व परिचारिकेची भूमिका (Role of nurse in Antenatal Examination)

प्रसूतिपूर्व तपासणी व परिचारिकेची भूमिका

बाळंतपण हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो आणि म्हणूनच मातृत्वप्राप्तीसाठी प्रसूतिपूर्व काळापासूनच काळजी घेणे इष्ट ठरते. यासाठी प्रसूतिपूर्व तपासणी व सल्ला अत्यंत ...
प्रसूतिविद्या व प्रसविका : इतिहास (Midwifery and Midwife : History)

प्रसूतिविद्या व प्रसविका : इतिहास

प्रसूती व स्त्रीरोग परिचर्येचा प्रवास हा मानवाच्या उत्पत्तीपासून सुरू झालेला आहे. जागतिक स्तरावर पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासासाठी केलेल्या उत्खननात प्रसूती दरम्यान ...