(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

भास्कराचार्य- १ (Bhaskaracharya - 1)

भास्कराचार्य- १

भास्कराचार्य– १ : (अंदाजे इ.स. ६२८ ) भास्कराचार्य-१ यांच्या जन्म-मृत्यूबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या महाभास्करीय, लघुभास्करीय, आणि आर्यभटीयभाष्य  या ...
भिसे, शंकर आबाजी (Bhisey, Shankar Abaji)

भिसे, शंकर आबाजी

भिसे, शंकर आबाजी (२९ एप्रिल, १८६७ – ७ एप्रिल, १९३५) भारतीय शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबई येथे झाला ...
मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट अ‍ॅन्ड सेंटर फॉर हर्पेटोलॉजी (The Madras Crocodile Bank Trust and Centre for Herpetology - MCBT )

मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट अ‍ॅन्ड सेंटर फॉर हर्पेटोलॉजी

मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट अ‍ॅन्ड सेंटर फॉर हर्पेटोलॉजी : (स्थापना – १९७३) ‘Herpeton’ या ग्रीक शब्दावरून हर्पेटोलॉजी हा शब्द तयार झाला ...
मधुसूदन कानुंगो (Madhusudan Kanungo)

मधुसूदन कानुंगो

कानुंगो, मधुसूदन : (१ एप्रिल १९२७ – २६ जुलै २०११) मधुसूदन कानुंगो यांचा जन्म ओडिशातील बेहरामपुर येथे झाला. उत्कल विद्यापीठातून त्यांनी ...
मनीषा इनामदार (Maneesha Inamdar)

मनीषा इनामदार

इनामदार, मनीषा : (२५ फेब्रुवारी १९६७ ). भारतीय मूल-पेशी (स्कंद, बुध्न, आद्य पेशी; स्टेम सेल) विकसनशील जीवशास्त्रज्ञ. सध्या त्या भारताच्या ...
मरे गेलमान (Murray Gell-Mann)

मरे गेलमान

गेलमान मरे : (१५ सप्टेंबर १९२९ – २४ मे २०१९) मरे गेलमान यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. पदवी शिक्षणासाठी त्यांनी ...
मलोन बुश होग्लंड (Mahlon Bush Hoagland)

मलोन बुश होग्लंड

होग्लंड, मलोन बुश  (५ ऑक्टोबर १९२़१ – १८ सप्टेंबर २००९). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होग्लंड यांनी टी-आरएनएचा (t-RNA) शोध लावला. ते अनुवांशिक ...
महादेवन लक्ष्मीनारायणन (Mahadevan Lakshminarayanan)

महादेवन लक्ष्मीनारायणन

लक्ष्मीनारायणन, महादेवन : ( १९६५ -) लक्ष्मीनारायणन महादेवन हे भारतीय वंशाचे वैज्ञानिक सध्या हार्वर्ड विद्यापीठात लोला इंग्लंड द वल्पीन प्रोफेसर ...
महाराजपुरम सीतारामन कृष्णन (Maharajapuram Sitaraman Krishnan)

महाराजपुरम सीतारामन कृष्णन

कृष्णन, महाराजपुरम सीतारामन : (२४ ऑगस्ट १८९८ – २४ एप्रिल १९७०) महाराजपुराम सीतारामन कृष्णन यांचा जन्म तामिळनाडूमधील तंजावरला झाला. त्यांचे शालेय ...
महावीराचार्य (Mahaviracharya)

महावीराचार्य

महावीराचार्य : (अंदाजे इ.स. ८१४ – इ.स. ८७८) महावीराचार्य या नावाने ओळखले जाणारे जैनधर्मीय गणिती महावीर यांचा जन्म केव्हा व कोठे ...
मांगिना वेंकटेश्वर राव (Mangina Venkateswara Rao)

मांगिना वेंकटेश्वर राव

राव, मांगिना वेंकटेश्वर : (२१ जून १९२८ – ८ मार्च २०१६) मांगिना व्यंकटेश्वरा राव यांचा जन्म पेरूपलम या ठिकाणी जुन्या आंध्र ...
माधव गणेश शेण्ड्ये (Madhav Ganesh Shendye)

माधव गणेश शेण्ड्ये

शेण्ड्ये, माधव गणेश  (२० फेब्रुवारी १९२८-९ नोव्हेंबर २००२). माधव गणेश शेंड्ये यांचे आयुर्वेदाचे शिक्षण पुण्याच्या लोकमान्य टिळक आयुर्वेद महाविद्यालयात झाले ...

माधव रघुनाथ रानडे

रानडे, माधव रघुनाथ : (३१ मार्च १९२६ – २४ डिसेंबर १९८० ) माधव रघुनाथ रानडे  यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला .त्यांचे ...
माधव वासुदेव कोल्हटकर (Madhav Vasudev Kolhatakar)

माधव वासुदेव कोल्हटकर

कोल्हटकर, माधव वासुदेव (२५ ऑगस्ट १९३९- ६ नोव्हेंबर १९९२) माधव वासुदेव कोल्हटकर यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यापुढील आयुर्वेद प्रवीण ही पदवी त्यांनी अष्टांग आयुर्वेद ...
मायकेल अँथनी एप्स्टाइन (Michael Anthony Epstein)

मायकेल अँथनी एप्स्टाइन

एप्स्टाइन, मायकेल अँथनी : (१८ मे १९२१ ) मायकेल अँथनी एप्स्टाइन, यांचा जन्म आग्नेय इंग्लंडमधील, मिडलसेक्स या लंडनच्या उपनगरात झाला ...
मायकेल रॉसमन (Michael G. Rossmann)

मायकेल रॉसमन

रॉसमन, मायकेल  : ( ३० जुलै, १९३० – १४ मे, २०१९ ) मायकेल रॉसमन यांचा जन्म फ्रँकफूर्ट येथे झाला. दुसर्‍या ...
मायर, अर्नस्ट वाल्टर (Mayr, Ernst Walter)

मायर, अर्नस्ट वाल्टर 

मायर, अर्नस्ट वाल्टर : ( ५ जुलै, १९०४  –  ३ फेब्रुवारी, २००५ ) अर्नस्ट वाल्टर मायर यांचा जन्म जर्मनी येथील ...
मायर, जॉर्ज व्हॉन (Mayr, Georg von)

मायर, जॉर्ज व्हॉन

मायर, जॉर्ज व्हॉन  (१२ फेब्रुवारी १८४१ – ६ सप्टेंबर १९२५) जॉर्ज मायर यांचा जन्म जर्मनीतील फ्रँकोनियामधील वुर्झबर्ग (Wurzburg) येथे झाला ...
मारिओ राम्बेर्ग कपेकी (Capecchi, Mario Ramberg)

मारिओ राम्बेर्ग कपेकी

कपेकी, मारिओ राम्बेर्ग : ( ६ ऑक्टोबर, १९३७ –  ) मारिओ कपेकी यांचा जन्म इटलीतील वेरोना  येथे झाला. त्यांची आई ...
मारिओ रॅमबर्ग कॅपेची (Mario Ramberg Capecchi)

मारिओ रॅमबर्ग कॅपेची

मारिओ कॅपेची कॅपेची, मारिओ रॅमबर्ग : (६ ऑक्टोबर, १९३७). इटालियन शास्त्रज्ञ. लक्ष्यवेधी जनुक परिवर्तन (Targeted gene modification) या संशोधनासाठी मारिओ ...