(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

मारिया गाएटाना ॲग्नेसी (Maria Gaetana Agnesi)

मारिया गाएटाना ॲग्नेसी

ॲग्नेसी, मारिया गाएटाना   (१६ मे १७१८ – ९ जानेवारी १७९९). इटालियन महिला गणिती व तत्त्ववेत्ती. घनवक्रतेच्या कार्यासाठी प्रसिध्द. हा ...
मारुती चितमपल्ली ( Maruti Chitampalli)

मारुती चितमपल्ली

चितमपल्ली, मारुती  (१२ नोव्हेंबर १९३२). भारतीय पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक. मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ...
मार्कुस, आर्थर रुडॉल्फ (Marcus, Arthur Rudolph)

मार्कुस, आर्थर रुडॉल्फ

मार्कुस, आर्थर रुडॉल्फ : ( २१ जुलै १९२३ ) रुडॉल्फ मार्कुस यांना लहानपणापासून गणिताची आवड होती, परंतु मॅकगिल विद्यापीठात गेल्यावर ...
मार्ग्युलिस, लिन (Margulis, Lynn )

मार्ग्युलिस, लिन

मार्ग्युलिस, लिन : ( ५ मार्च, १९३८ – २२ नोव्हेंबर २०११ ) लिन मार्ग्युलिस यांचा जन्म शिकागो येथे मॉरिस आणि लिओना ...
मार्टिन जे.  टेलर (Martin J. Taylor)

मार्टिन जे.  टेलर

टेलर, मार्टिन जे. : (१८ फेब्रुवारी १९५२ – ) ब्रिटीश गणिती मार्टिन जे. टेलर यांचा जन्म ब्रिटनमधील लीसेस्टर (Leicester) इथला असून ...
मार्टिन विल्यम बायेरिंक (Martinus Willem Beijerinck)

मार्टिन विल्यम बायेरिंक

बायेरिंक, मार्टिन विल्यम : (१६ मार्च १८५१ – १ जानेवारी १९३१). डच वनस्पतिशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी विषाणूच्या शोधाबरोबरच विषाणूशास्त्र (Virology) ...
मार्टीन लुईस पर्ल (Martin Lewis Perl)

मार्टीन लुईस पर्ल

पर्ल, मार्टीन लुईस : (२४ जून १९२७ — ३० सप्टेंबर २०१४). अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. त्यांनी टाऊ (Tau) या लेप्टॉन (Lepton) ऋण ...
मार्मुर, ज्युलियस (Marmur, Julius)

मार्मुर, ज्युलियस

मार्मुर, ज्युलियस : (२२ मार्च, १९२६ – २० मे, १९९६) जैविक शास्त्रज्ञ जुलियस मार्मुर यांचा जन्म बीअल्स्टोक (पोलंड ) इथे झाला. कॅनडा ...
माल्पिघी, मार्सेलो (Malpighi, Marcello)

माल्पिघी, मार्सेलो

माल्पिघी, मार्सेलो : (१० मार्च १६२८ – ३० नोव्हेंबर १६९४) बोलोन्याजवळील क्रेवाल्कोरमध्ये मार्सेलो यांचा जन्म झाला. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी बोलोन्या ...
माहेश्वरी, पंचानन (Maheshwari, Panchanan)

माहेश्वरी, पंचानन

माहेश्वरी, पंचानन : ( ९नोव्हेंबर,१९०४– १८मे,१९६६ ) पंचानन माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण जयपूरमधील एविंग ...
मित्रगोत्री, समीर  (Mitragotri, Samir)

मित्रगोत्री, समीर 

मित्रगोत्री, समीर : ( २८ मे १९७१ ) सध्या औषधे शरीरामध्ये योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवण्याच्या संशोधनामधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम ...
मिन्कोवस्की, हर्मन (Minkowski, Hermann)

मिन्कोवस्की, हर्मन

मिन्कोवस्की, हर्मन : (२२ जून १८६४–१२ जानेवारी १९०९) मिन्कोवस्की यांनी कोनिग्जबर्ग (Königsberg) येथील विद्यापीठातून पदवी घेतली. १८८५ मध्ये त्यांनी लिंडेमन (Lindemann) ...
मिलान झेलेनी (Milan Zeleny)

मिलान झेलेनी

झेलेनी, मिलान : (२२ जानेवारी १९४२ -) मिलान झेलेनी यांचा जन्म क्लक शालोव्हाइस (Klucké Chvalovice) या खेड्यात त्यावेळच्या पूर्व बोहेमिया म्हणजे ...
मिलिकन, रॉबर्ट अँड्र्यूज (Millikan, Robert Andrews)

मिलिकन, रॉबर्ट अँड्र्यूज

मिलिकन, रॉबर्ट अँड्र्यूज : ( २२ मार्च १८६८ – १९ डिसेंबर १९५३ ) मिलिकन ओहियो येथून पदवीधर झाल्यावर त्यांनी दोन ...
मिलीस्लाव डेमेरेक (Milislav Demerec)

मिलीस्लाव डेमेरेक

डेमेरेक, मिलीस्लाव : (११ जानेवारी १८९५ – १२ एप्रिल १९६६) मिलीस्लाव डेमेरेक यांचा जन्म युगोस्लावियामधील कोस्तानिका या ठिकाणी झाला. युगोस्लावियातील क्रिझेवी ...
मिश्रा, रामदेव (Mishra, Ramdeo)

मिश्रा, रामदेव

मिश्रा, रामदेव : (२६ ऑगस्ट, १९०८ – २५ जून, १९९८) भारतातील परिस्थितीकी विज्ञानाचे जनक मानले जाणारे रामदेव मिश्रा यांचे शालेय ...
मॅकार्थी, जॉन (McCarthy, John)

मॅकार्थी, जॉन

मॅकार्थी, जॉन : (४ सप्टेंबर १९२७ – २४ ऑक्टोबर २०११)  जॉन मॅकार्थी यांचा जन्म अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील बोस्टन या शहरात झाला ...
मॅक्झिम कोन्त्सेविच (Maxim Kontsevich)

मॅक्झिम कोन्त्सेविच

कोन्त्सेविच, मॅक्झिम :  (२५ ऑगस्ट १९६४ – ) मॅक्झिम कोन्त्सेविच यांचा जन्म रशियातील खिमकी शहरात झाला. माध्यमिक शाळेपासूनच त्यांना गणित ...
मॅक्लीन मॅक्कार्टी (Maclyn McCarty)

मॅक्लीन मॅक्कार्टी

मॅक्कार्टी, मॅक्लीन : (९ जून १९११ – २ जानेवारी २००५) मॅक्लीन मॅक्कार्टी यांचा जन्म अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील साउथ बेंड येथे झाला ...
मॅक्स थेलर (Max Theiler)

मॅक्स थेलर

थेलर, मॅक्स : ( ३० जानेवारी १८९९ – ११ ऑगस्ट १९७२ ) थेलर यांचा जन्म साउथ अमेरीकन प्रिटोरीयामध्ये झाला. त्यांचे वडील ...