(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

मॅक्स प्लांक सोसायटी, जर्मनी (Max Planck Society, Germany)

मॅक्स प्लांक सोसायटी, जर्मनी 

मॅक्स प्लांक सोसायटी, जर्मन : मुख्य इमारत मॅक्स प्लांक सोसायटी, जर्मनी मॅक्स प्लांक  ह्या सुप्रसिद्ध, प्रथितयश सैद्धांतिक भौतिक वैज्ञानिकाचे ...
मॅक्स लुडविग हेनिंग डेल्ब्रुक (Max Ludwig Henning Delbrück) 

मॅक्स लुडविग हेनिंग डेल्ब्रुक

डेल्ब्रुक, मॅक्स लुडविग हेनिंग : (४ सप्टेंबर १९०६ – ९ मार्च १९८१) मॅक्स लुडविग हेनिंग डेल्ब्रुक यांचा जन्म जर्मनीच्या बर्लिनमध्ये झाला. डेल्ब्रुक ...
मॅक्स व्हॉन ग्रूबर (Max Von Gruber)

मॅक्स व्हॉन ग्रूबर

ग्रूबर, मॅक्स व्हॉन : (६ जुलै १८५३ – १६ सप्टेंबर १९२७) मॅक्स व्हॉन ग्रूबर यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. ग्रूबर यांनी औषधशास्त्रात ...
मेचानिकॉफ, इल्या इलिच (Élie Metchnikoff)

मेचानिकॉफ, इल्या इलिच

मेचानिकॉफ, इल्या लिच  ( १५ मे, १८४५ – १५ जुलै, १९१६ ) मेचनिकॉफ यांनी खार्किव्ह लायची (Kharkiv Lycée), खार्किव्ह विद्यापीठात ...
मेरी लुईस स्टीफन्सन (Mary Louise Stephenson)

मेरी लुईस स्टीफन्सन

स्टीफन्सन, मेरी लुईस  ( १९२१ २६सप्टेंबर, २००९). अमेरीकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. स्टीफन्सन यांनी पॉल  झॅमकनीक आणि मलोन बुश होग्लंड यांच्या सहकार्यांनी ...
मेल्व्हिन एल्लिस काल्व्हिन (Melvin Ellis Calvin)

मेल्व्हिन एल्लिस काल्व्हिन

काल्व्हिन, मेल्व्हिन एल्लिस :  ( ८ एप्रिल, १९११ ते  ८ जानेवारी, १९९७ ) मेल्व्हिन काल्व्हिन यांचा जन्म अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील सेंट ...
मेहेर-होमजी, विस्पी एम. (Meher – Homji, Vispi M.)

मेहेर-होमजी, विस्पी एम.

मेहेर-होमजी, विस्पी एम. : (१८ जानेवारी १९३२ – ) विस्पी मेहेर – होमजी यांचा जन्म मुंबईत झाला आणि लहानपण दक्षिण ...
मॉरिस, डेस्मंड (जॉन)  (Morris, Desmond)

मॉरिस, डेस्मंड

मॉरिस, डेस्मंड (जॉन) (२४ जानेवारी १९२८ –   ) डेस्मंड मॉरिस यांचा जन्म पुर्टॉन, विल्टशायर येथे डेस्मंड जॉन मॉरिस मार्जोरी आणि ...
मोडक, बाळाजी प्रभाकर (Modak, Balaji Prabhakar)

मोडक, बाळाजी प्रभाकर

मोडक, बाळाजी प्रभाकर : ( २२ मार्च, १८४७ – २ डिसेंबर, १९०६ ) बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म दक्षिण कोकणातील ...
मोलिना मारिओ (Molina Mario)

मोलिना मारिओ

मारिओ मोलिना : (१९ मार्च, १९४३ ते ७ ऑक्टोबर, २०२०) मारिओ मोलिना यांचा जन्म मेक्सिको शहरात झाला. मेक्सिकोतील उनाम विद्यापिठातून त्यांनी रसायन ...
मोह, ह्युगो फॉन ( Mohl, Hugo Van)

मोह, ह्युगो फॉन

मोह, ह्युगो फॉन : ( ८ एप्रिल, १८०५ – १ एप्रिल, १८७२ ) ह्युगो फॉन मोह यांचा जन्म जर्मनीमधील स्टुटगार्ट या ...
यशवंत लक्ष्मण नेने (Yashwant Laxman Nene)

यशवंत लक्ष्मण नेने

नेने, यशवंत लक्ष्मण:  (२४ नोव्हेंबर १९३६ – १५ जानेवारी २०१८) यशवंत लक्ष्मण नेने या भारतीय कृषी शास्त्रज्ञांचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर ...
याकोव सिनाई (Yakov Sinai)

याकोव सिनाई

सिनाई, याकोव : (२१ सप्टेंबर १९३५ – ) रशियन–अमेरिकन गणिती सिनाई यांचा जन्म व शिक्षण, रशियातील मॉस्को (Moscow) येथे झाले. मॉस्को ...
युआन लोंगपिंग (Yuan Longping)

युआन लोंगपिंग

लोंगपिंग, युआन : (७ सप्टेंबर १९३० – २२ मे २०२१) युआन लोंगपिंग या चीनमधील कृषिशास्त्रज्ञाचा जन्म चीनची राजधानी बीजिंग येथे ...
युगुआंग शि (Yuguang Shi)

युगुआंग शि

शि, युगुआंग(१९६९ – ) चिनी गणिती युगुयांग शि यांचा जन्म १९६९ मध्ये चीनमधील झेजियांग (Zejiyang) या शहरात झाला. १९९६ ...
युजीन, फ्रेसिने  (Eugene, Freyssinet)

युजीन, फ्रेसिने  

युजीन, फ्रेसिने : ( १३ जुलै १८७९ ते ८ जून १९६२ )                               युजीन फ्रेसिने या फ़्रेंच अभियंत्याचा जन्म फ्रांसमधील ...
युलिस्स गायोन (Ulysse Gayon)

युलिस्स गायोन

गायोन, युलिस्स : (८ मे १८४५ – ११ एप्रिल १९२९) युलिस्स गायोन यांचा जन्म फ्रांसमधील बोर्दाऊ येथे झाला. युलिस्स गायोन यांना, एकोल ...
युस्टीनस केअरना (Justinus Kerner)

युस्टीनस केअरना

केअरना, युस्टीनस : (१८ सप्टेंबर १७८६ – २१ फेब्रुवारी १८६२) जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहराजवळ असलेल्या लुडवीजबर्ग या गावी युस्टीनस केअरना यांचा ...
युस्टीस फॉन लीबेग (Justus Van Liebig)

युस्टीस फॉन लीबेग

लीबेग, युस्टीस फॉन : ( १२ मे १८०३ – १८ एप्रिल १८७३ ) जर्मनीमधील डॅमस्टॅट या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात युस्टीस ...
युस्टॅशियो बार्थोलोमिओ (Eustachio Bartolommeo)

युस्टॅशियो बार्थोलोमिओ

बार्थोलोमिओ, युस्टॅशियो : (अंदाजे १५०३ – अंदाजे १५६८) बार्थोलोमिओ युस्टॅशियो यांचा जन्म इटलीतील सान सेव्हेरीनो नगरीत झाला. सुमारे इ.स. १३० ते ...