(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
पृथ्वीच्या सर्व भागांची माहिती मिळविणे हा भूविज्ञानाचा हेतू असला,तरी शास्त्रज्ञांना पृथ्वीचा घन झालेला काही दश किलोमीटर जाडीच्या खडकांच्या उथळ पृष्ठीय कवचीय भूभागाचे परीक्षण करणे फक्त शक्य झाले आहे. तथापि पृथ्वीच्या खोल भागात होणाऱ्या काही प्रक्रियांचे दृश्य परिणाम या कवचाच्या खडकांवर व भूपृष्ठ स्वरूपांवर झालेले आढळतात व त्यावरून संपूर्ण पृथ्वीच्या अंतरंगाचा आणि होऊ शकणाऱ्या परिणामांचा अनुमानांच्या आधारे अप्रत्यक्ष अभ्यासही यात केला जातो.

वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पृथ्वीच्या कवचातील खडक, तसेच अंतरंगातील विविध घटक यांमधील परस्परसंबंधात होणारे सर्वंकष बदल या पृथ्वीच्या भौतिक अभ्यासाबरोबरच पृथ्वीच्या कवचाचे परीक्षण व अन्वेषण (संशोधन) करून अतिप्राचीन काळापासून तो मानवी इतिहासकालाच्या सुरूवातीपर्यंतच्या कवचाचा इतिहास जुळविणे, हे भूविज्ञानाचे मुख्य कार्य आहे. भूविज्ञान विषयाचे स्वरूप अतिशय जटिल आणि व्यापक असून, वास्तवशास्त्र (Reality), भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (Biology) व गणित (Mathematics) या मूलभूत विज्ञानांच्या ज्ञानाच्या आधारावरच, भूविज्ञानाची उभारणी झाली आहे.

भूविज्ञान हे आधुनिक विज्ञान असून वातावरणातील शेवटच्या मर्यादेपासून ते पृथ्वीग्रहाच्या केंद्रस्थानापर्यंत, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, विविध प्रयोग, निरीक्षणे, ऐतिहासिक तसेच तार्किक दाखले, पृथ्वी संलग्नित संशोधन इत्यादींद्वारे मिळणारे पुरावे आणि अनुमान यांवरून ते अभ्यासले जातात. यांमध्ये मुख्यत्वेकरून आपल्या भोवती असलेल्या निसर्गाला आणि निसर्गचक्राला समजून घेणे,मानवी विकासामध्ये महत्त्वाचे घटक असलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती ( चक्रीवादळ, भूकंप व ज्वालामुखी) आणि विविध नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, खनिजे, ऊर्जा इ.) शोध यांचा समावेश होतो.

आकाश आणि अवकाश विज्ञानाच्या अतिशय वेगाने झालेल्या, आधुनिक तांत्रिक प्रगतीमुळे, नवीन माहिती, तसेच महत्त्वाच्या नवीन प्रणालींच्या, विविध उपग्रहांद्वारे, दळणवळण आणि संपर्कयंत्रणांच्या अत्याधुनिकतेमुळे संपर्कात नसलेल्या आणि मानवास अगम्य असलेल्या भागांच्याही मिळणाऱ्या माहितीमुळे, पृथ्वीविज्ञानातील काही न सुटलेली कोडी सुटण्यास मदत होत आहे.

या शास्त्राच्या अभ्यासात पृथ्वीचा अवाढव्यपणा, अतिविशाल कालखंड (अब्जावधी वर्षे) आणि त्यात झालेले आणि होत असलेले कालातीत बदल (प्राकृतिक, आंतरिक-विनाशकारी, जीवसृष्टीतील उलथापालथ इ.) आणि बहुतांशी अतिसंथ रित्या चालणाऱ्या भूपृष्ठाजवळच्या आणि भू-आंतरिक नैसर्गिक प्रक्रिया इ. चा सलग, परस्पर कालसंबंधासह एकत्रित आणि सखोल अभ्यास करता न येणे, हे महत्त्वाचे अडथडे आहेत.

जीवाश्म उद्याने : समुद्री गोंडवाना जीवाश्म उद्यान (Fossil Parks : Marine Gondwana Fossil Park)

जीवाश्म उद्याने : समुद्री गोंडवाना जीवाश्म उद्यान

जीवाश्मच्या अभ्यासाला पुराजीवविज्ञान (Paleontology) म्हणतात. स्तरविज्ञानाशी (Stratigraphy) याचा निकटचा संबंध येतो. स्तरविज्ञानात जीवाश्मांचा फार मोठा उपयोग होतो. जीवाश्मांच्या अभ्यासामुळे पृथ्वी ...
जीवाश्म उद्याने : सिवालिक जीवाश्म उद्यान (Fossil Parks : Siwalik Fossil Park)

जीवाश्म उद्याने : सिवालिक जीवाश्म उद्यान

हिमाचल प्रदेशातील साकेती (सिरमूर जिल्हा) येथील सिवालिक जीवाश्म उद्यानामध्ये शिवालिक भागातील भूशास्त्रीय कालखंडातील २.५ द.ल. वर्षांपूर्वीच्या प्राचीन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या (Vertebrate ...
टुर्मलीन / तोरमल्ली (Tourmaline)

टुर्मलीन / तोरमल्ली

टुर्मलीन म्हणजेच तोरमल्ली हे नाव सिंहली (तमिळ) शब्दकोशानुसार ‘ थोरामल्ली ’ (तारा-मोली) या शब्दावरून आले आहे. टुर्मलीनचे स्फटिक सामान्यतः ३, ...
ट्रॅव्हर्टाइन (Travertine)

ट्रॅव्हर्टाइन

गरम झऱ्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या (Hot springs) वाफमिश्रित पाण्याद्वारे निक्षेपित झालेल्या (साचलेल्या) चुनखडकाच्या प्रकारास ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. हा खडक प्राचीन काळापासून सुशोभित ...
डोलेराइट (Dolerite)

डोलेराइट

डोलेराइट हा अल्पसिलिका व मध्यम कणी असलेला सामान्य अग्निज खडक आहे. अमेरिकेत याला डायाबेस म्हणतात. फेलस्पार खनिज गटाच्या प्लॅजिओक्लेज श्रेणीतील ...
निळ्या रंगाचे हिरे (Blue Diamond)

निळ्या रंगाचे हिरे

जगातील सर्वांत मूल्यवान हिरा – होप. तो निळ्या रंगामुळे प्रसिद्ध आहे. फ्रेंच व्यापारी झां बातीस्त ताव्हेर्न्ये (Jean Baptiste Tavernier) यांच्या ...
नेफेलीन (Nepheline)

नेफेलीन

नेफेलीन हे फेल्स्पॅथॉइड गटातील महत्त्वाचे परंतु विरळच आढळणारे खनिज. पाटण : (1010) स्पष्ट; कठिणता ५.५ – ६.०; वि. गु. २.५५ ...
पारद (Mercury)

पारद

प्राचीन काळापासून इटली व स्पेन पारा उत्पादनात अग्रेसर आहेत. इ. स. पू. १५०० मधील ईजिप्तमधील थडग्यांमध्ये पारा आढळून आला. भारतीय आणि ...
भू-पर्यटन (Geo-tourism)

भू-पर्यटन

भू-पर्यटन हा अलीकडील काळात जगभर दृढ झालेला शब्द आहे. शाश्वत पर्यावरणाच्या प्रक्रियेला जोडण्यासाठी तसेच निसर्ग आणि भूवैज्ञानिकीय घडामोडींचे आंतरसंबंध समजून ...
भूवैज्ञानिकीय आश्चर्य : खडकांमधील नैसर्गिक कमान (Geological Marvels : Natural Arch)

भूवैज्ञानिकीय आश्चर्य : खडकांमधील नैसर्गिक कमान

खडकांमधील नैसर्गिक कमान (नैसर्गिक पूल) ही प्रामुख्याने समुद्रकिनारी आणि नदी प्रवाहांमध्ये तसेच लाटांच्या विशिष्ट भागात बसणाऱ्या जोराच्या तडाख्याने वा खडक ...
भूवैज्ञानिकीय आश्चर्य : खडकांवरील चक्राकार खुणा (Geological Marvels : Eddy Current Markings)

भूवैज्ञानिकीय आश्चर्य : खडकांवरील चक्राकार खुणा

पंचमहाल (गुजरात) जिल्ह्यातील कडाना धरणाच्या खालील बाजूस मही नदीच्या डाव्या तीरावर असलेल्या आग्नेय दिशेला सु. ६०० मीटर अंतरावरील खडकांवर काही ...
भूवैज्ञानिकीय आश्चर्य : लोणार सरोवर (Geological Marvels : Lonar Lake)

भूवैज्ञानिकीय आश्चर्य : लोणार सरोवर

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार गावाजवळ असलेले जगप्रसिद्ध असे खाऱ्या पाण्याचे सरोवर. शास्त्रज्ञांच्या मते भूशास्त्रीय क्रिटेसिअस काळात (सु. ५.५ ते ६.५ कोटी ...
भूवैज्ञानिकीय आश्चर्य : सेंद्रा ग्रॅनाइट (Geological Marvels : Sendra Granite)

भूवैज्ञानिकीय आश्चर्य : सेंद्रा ग्रॅनाइट

पाली ( राजस्थान ) जिल्ह्यातील सेन्द्रा ग्रॅनाइट हे निसर्गाच्या शिल्पकारीचे उत्तम, पण दुर्मिळ असे उदाहरण आहे. भूपृष्ठावर उघड्या असलेल्या पातालीय ...
भौगोलिक माहिती प्रणाली आणि भूमाहिती विज्ञान (Geographic Information System & Geoinformatics)

भौगोलिक माहिती प्रणाली आणि भूमाहिती विज्ञान

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अथवा पृष्ठभागासंबंधित कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्लेषण, विशेष आज्ञावलीच्या साहाय्याने करणाऱ्या संगणकीय प्रणालीला भौगोलिक माहिती ...
मेघालयन काळ (Meghalayan Age)

मेघालयन काळ

पृथ्वीवरील सु. ४.६ अब्ज वर्षांच्या भूवैज्ञानिक घडामोडींच्या इतिहासाची विभागणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी भूवैज्ञानिक कालमापी (Geological Timescale) तयार केली. त्याप्रमाणे  सध्या आपण ...
शिला स्मारके : अग्निदलिक खडक (Rock Monuments : Pyroclastic Rocks)

शिला स्मारके : अग्निदलिक खडक

अग्निदलिक खडक, पेद्दापल्ली पेद्दापल्ली (कोलार; कर्नाटक) गावामध्ये अग्निदलिक खडक (अग्नीमुळे तुकडे झालेला; Pyroclastic) असलेले हे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक. समानार्थी अर्थाने ...
शिला स्मारके : उशी लाव्हा (Rock Monuments : Pillow Lava)

शिला स्मारके : उशी लाव्हा

उशी लाव्हा, मरडीहळ्ळी ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी जमिनीवर येणारा तप्त लाव्हारस ज्या वेळी पाण्याच्या संपर्कात येतो, त्या वेळी त्यांचा पृष्ठभाग अतिशय जलद ...
शिला स्मारके : उशी लाव्हा, लोह धातूचा पट्टा (Rock Monuments : Pillow Lava, Iron ore belt)

शिला स्मारके : उशी लाव्हा, लोह धातूचा पट्टा

उशी लाव्हा, लोह धातूचा पट्टा, नोमिरा. नोमिरा (केओंझार; ओडिशा) भागात लोह धातुक खनिज पट्ट्यात (Iron ore formation belt) असणारे उशी ...
शिला स्मारके : चार्नोकाइट (Rock Monuments : Charonockite)

शिला स्मारके : चार्नोकाइट

चेन्नई शहराच्या दक्षिण भागात असलेल्या पल्लवरम् उपनगरातील सेंट टॉमस मौंट (St. Thomas Mount) या ६० मी. उंचीच्या टेकडीवर चार्नोकाइट खडकांचे ...
शिला स्मारके : द्वीपकल्पीय पट्टिताश्म (Rock Monuments : Peninsular Gneiss)

शिला स्मारके : द्वीपकल्पीय पट्टिताश्म

भूशास्त्रीय इतिहासाच्या सुरुवातीच्या अतिप्राचीन जीवविरहित अशा मोठ्या कालविभागाला आर्कीयन आद्य महाकल्प व त्या आद्य महाकल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला आर्कीयन ...