(प्रस्तावना) पालकसंस्था : दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर | समन्वयक : श्रीनिवास वडगबाळकर | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
पृथ्वीच्या सर्व भागांची माहिती मिळविणे हा भूविज्ञानाचा हेतू असला,तरी शास्त्रज्ञांना पृथ्वीचा घन झालेला काही दश किलोमीटर जाडीच्या खडकांच्या उथळ पृष्ठीय कवचीय भूभागाचे परीक्षण करणे फक्त शक्य झाले आहे. तथापि पृथ्वीच्या खोल भागात होणाऱ्या काही प्रक्रियांचे दृश्य परिणाम या कवचाच्या खडकांवर व भूपृष्ठ स्वरूपांवर झालेले आढळतात व त्यावरून संपूर्ण पृथ्वीच्या अंतरंगाचा आणि होऊ शकणाऱ्या परिणामांचा अनुमानांच्या आधारे अप्रत्यक्ष अभ्यासही यात केला जातो.
वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पृथ्वीच्या कवचातील खडक, तसेच अंतरंगातील विविध घटक यांमधील परस्परसंबंधात होणारे सर्वंकष बदल या पृथ्वीच्या भौतिक अभ्यासाबरोबरच पृथ्वीच्या कवचाचे परीक्षण व अन्वेषण (संशोधन) करून अतिप्राचीन काळापासून तो मानवी इतिहासकालाच्या सुरूवातीपर्यंतच्या कवचाचा इतिहास जुळविणे, हे भूविज्ञानाचे मुख्य कार्य आहे. भूविज्ञान विषयाचे स्वरूप अतिशय जटिल आणि व्यापक असून, वास्तवशास्त्र (Reality), भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (Biology) व गणित (Mathematics) या मूलभूत विज्ञानांच्या ज्ञानाच्या आधारावरच, भूविज्ञानाची उभारणी झाली आहे.
भूविज्ञान हे आधुनिक विज्ञान असून वातावरणातील शेवटच्या मर्यादेपासून ते पृथ्वीग्रहाच्या केंद्रस्थानापर्यंत, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, विविध प्रयोग, निरीक्षणे, ऐतिहासिक तसेच तार्किक दाखले, पृथ्वी संलग्नित संशोधन इत्यादींद्वारे मिळणारे पुरावे आणि अनुमान यांवरून ते अभ्यासले जातात. यांमध्ये मुख्यत्वेकरून आपल्या भोवती असलेल्या निसर्गाला आणि निसर्गचक्राला समजून घेणे,मानवी विकासामध्ये महत्त्वाचे घटक असलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती ( चक्रीवादळ, भूकंप व ज्वालामुखी) आणि विविध नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, खनिजे, ऊर्जा इ.) शोध यांचा समावेश होतो.
आकाश आणि अवकाश विज्ञानाच्या अतिशय वेगाने झालेल्या, आधुनिक तांत्रिक प्रगतीमुळे, नवीन माहिती, तसेच महत्त्वाच्या नवीन प्रणालींच्या, विविध उपग्रहांद्वारे, दळणवळण आणि संपर्कयंत्रणांच्या अत्याधुनिकतेमुळे संपर्कात नसलेल्या आणि मानवास अगम्य असलेल्या भागांच्याही मिळणाऱ्या माहितीमुळे, पृथ्वीविज्ञानातील काही न सुटलेली कोडी सुटण्यास मदत होत आहे.
या शास्त्राच्या अभ्यासात पृथ्वीचा अवाढव्यपणा, अतिविशाल कालखंड (अब्जावधी वर्षे) आणि त्यात झालेले आणि होत असलेले कालातीत बदल (प्राकृतिक, आंतरिक-विनाशकारी, जीवसृष्टीतील उलथापालथ इ.) आणि बहुतांशी अतिसंथ रित्या चालणाऱ्या भूपृष्ठाजवळच्या आणि भू-आंतरिक नैसर्गिक प्रक्रिया इ. चा सलग, परस्पर कालसंबंधासह एकत्रित आणि सखोल अभ्यास करता न येणे, हे महत्त्वाचे अडथडे आहेत.
ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकातून (Volcanic explosive eruption) बाहेर पडलेले घन पदार्थ एकत्रित साचून तयार झालेल्या राशींस अग्निदलिक किंवा स्फोटशकली खडक म्हणतात ...
ज्वालामुखी खडक प्रकारातील लाव्हा थरांनी बनलेला बेसाल्ट खालोखाल विपुल आढळणारा खडक. प्लॅजिओक्लेज खनिज याचा मुख्य घटक असून हॉर्नब्लेंड व कृष्णाभ्रकसुद्धा ...
भूशास्त्रीय कालखंडातील क्रिटेसिअस काळामध्ये (Cretaceous Period) समुद्राचे भूमीवर विशेष प्रमाणात अतिक्रमण घडून येऊन, संबंध पृथ्वीवर विविध पर्वतरांगा निर्मिती, ज्वालामुखीचे उद्रेक ...
अंबर हे स्फटिक (Crystal) किंवा खनिज (Mineral) नसून जैविक घटकांपासून तयार झालेले जीवाश्म (Fossil) आहे. ते जीवाश्माच्या रूपाने आढळणाऱ्या शंकुमंत ...
गोसान (राजपुरा – दारिबा, राजस्थान) गोसान म्हणजेच लोहाची टोपी (Iron Hat). भूपृष्ठापाशी उघड्या पडलेल्या, गंधकयुक्त रासायनिक घटक असलेल्या खडकांतील खनिज ...
जांभा खडक, अंगडिपुरम् (मल्लापुरम्; केरळ) अंगडिपुरम् (केरळ) येथील जांभा खडक हे अम्लधर्मी चार्नोकाइट खडकांपासून आणि अनुकूल वातावरणात विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक ...
संस्तरित बॅराइट्स (मंगमपेटा, कडप्पा, आंध्र प्रदेश) जगातील सर्वात मोठ्या बॅराइट्स साठ्यांपैकी एक आणि भूपृष्ठावर असलेली मंगमपेटा संस्तरित बॅराइट्स खाणीची महत्वाची ...
आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व औषधी गुणधर्म असलेल्या खनिजांना औषधीय खनिजे संबोधले जाते. प्रामुख्याने आयुर्वेदीय औषधनिर्मितीमध्ये खनिजांचा वापर मोठया प्रमाणात आढळून ...
जमिनीतून खणून काढलेल्या सर्वच नैसर्गिक पदार्थांना सामान्य व्यवहारात खनिज म्हणतात. आपल्या रोजच्या व्यवहारात दगडी कोळसा, शाडू, माती तसेच काचनिर्मितीसाठी वापरली ...
टुर्मलीन म्हणजेच तोरमल्ली हे नाव सिंहली (तमिळ) शब्दकोशानुसार ‘ थोरामल्ली ’ (तारा-मोली) या शब्दावरून आले आहे. टुर्मलीनचे स्फटिक सामान्यतः ३, ...
गरम झऱ्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या (Hot springs) वाफमिश्रित पाण्याद्वारे निक्षेपित झालेल्या (साचलेल्या) चुनखडकाच्या प्रकारास ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. हा खडक प्राचीन काळापासून सुशोभित ...
डोलेराइट हा अल्पसिलिका व मध्यम कणी असलेला सामान्य अग्निज खडक आहे. अमेरिकेत याला डायाबेस म्हणतात. फेलस्पार खनिज गटाच्या प्लॅजिओक्लेज श्रेणीतील ...
नेफेलीन हे फेल्स्पॅथॉइड गटातील महत्त्वाचे परंतु विरळच आढळणारे खनिज. पाटण : (1010) स्पष्ट; कठिणता ५.५ – ६.०; वि. गु. २.५५ ...
भू-पर्यटन हा अलीकडील काळात जगभर दृढ झालेला शब्द आहे. शाश्वत पर्यावरणाच्या प्रक्रियेला जोडण्यासाठी तसेच निसर्ग आणि भूवैज्ञानिकीय घडामोडींचे आंतरसंबंध समजून ...
खडकांमधील नैसर्गिक कमान (नैसर्गिक पूल) ही प्रामुख्याने समुद्रकिनारी आणि नदी प्रवाहांमध्ये तसेच लाटांच्या विशिष्ट भागात बसणाऱ्या जोराच्या तडाख्याने वा खडक ...
पंचमहाल (गुजरात) जिल्ह्यातील कडाना धरणाच्या खालील बाजूस मही नदीच्या डाव्या तीरावर असलेल्या आग्नेय दिशेला सु. ६०० मीटर अंतरावरील खडकांवर काही ...
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार गावाजवळ असलेले जगप्रसिद्ध असे खाऱ्या पाण्याचे सरोवर. शास्त्रज्ञांच्या मते भूशास्त्रीय क्रिटेसिअस काळात (सु. ५.५ ते ६.५ कोटी ...
पाली ( राजस्थान ) जिल्ह्यातील सेन्द्रा ग्रॅनाइट हे निसर्गाच्या शिल्पकारीचे उत्तम, पण दुर्मिळ असे उदाहरण आहे. भूपृष्ठावर उघड्या असलेल्या पातालीय ...
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अथवा पृष्ठभागासंबंधित कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्लेषण, विशेष आज्ञावलीच्या साहाय्याने करणाऱ्या संगणकीय प्रणालीला भौगोलिक माहिती ...
पृथ्वीवरील सु. ४.६ अब्ज वर्षांच्या भूवैज्ञानिक घडामोडींच्या इतिहासाची विभागणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी भूवैज्ञानिक कालमापी (Geological Timescale) तयार केली. त्याप्रमाणे सध्या आपण ...