(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने प्रकाशित झालेल्या मराठी विश्वकोशातील प्राचीन ऐतिहासिक काळ (इ. स. पू. ६०० – इ. स. ५५०) या कालखंडातील प्रमुख व महत्त्वपूर्ण इतिहासाचे टप्पे तसेच घटनांचा समावेश या ज्ञानमंडळाच्या कक्षेत केला आहे. यात प्राचीन इतिहासाची साधने, गणराज्ये-नगरराज्ये, विविध आक्रमणे/स्वाऱ्या, विविध राजघराणी, विविध राजधान्या व प्रशासकीय केंद्रे, आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे, थोर व्यक्तिमत्त्वे, प्रवासवर्णने, दृश्यकला, उत्खनित स्थळे इत्यादी बाबींना प्राधान्य दिले आहे. विश्वकोशाच्या सर्वसाधारण धोरणानुसार प्रादेशिक इतिहासात महाराष्ट्र, तद्नंतर भारतातील तसेच आशिया खंडातील उर्वरित भूभाग; आफ्रिका, यूरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांशी निगडित भूभाग, अशा प्राधान्यक्रमाने नोंदी विचारात घेतल्या आहेत. भौगोलिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या या भूप्रदेशांतील प्राचीन ऐतिहासिक काळ; संबोधनाचे निकष व पर्यायाने या काळाचा प्रारंभ आणि अखेरचे टप्पे भारताहून वेगळे असतील यात शंका नाही.

भारतातील प्राचीन ऐतिहासिक काळाचा प्रारंभ निश्चित करण्याचा निकष हा लिहिण्याची कला अवगत असल्याच्या पुराव्यांवर आधारित आहे, तर या काळाची मर्यादा गुप्त-वाकाटक काळाची अखेर ते इसवी सन ५५०, अशी मानली जाते. हा कालमर्यादानिश्चिततेचा निकष विस्ताराने मोठ्या असलेल्या साम्राज्यांचा शेवटचा टप्पा असा संबोधिला गेला आहे. ब्राह्मी व खरोष्ठी या भारतातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणाऱ्या लिप्यांचा काळ सम्राट अशोक या मौर्य घराण्याच्या राज्यकर्त्याच्या जगप्रसिद्ध अभिलेखाच्या समकालीन असल्याचे इसवी सन १९९० पर्यंत ग्राह्य धरले जात होते. गेल्या काही दशकांत दक्षिण भारतात कोडुमनाल, पोरुन्थल इ. ठिकाणी तसेच श्रीलंकेत अनुराधपुर येथे झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून ब्राह्मी लिपीची प्राचीनता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच या नव्याने उजेडात आलेल्या माहितीच्या आधारावर प्राचीन ऐतिहासिक काळाचा आरंभ महाजनपदाच्या काळापासून, इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून, असल्याचे सांगितले जाते. प्राचीन ऐतिहासिक काळात, तीर्थंकर वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांसारखे युगपुरुष भारतात होऊन गेले. भारतात आणि जागतिक स्तरावर या काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध स्थित्यंतरे झाली. ही स्थित्यंतरे प्रामुख्याने भाषा व लिपी यांच्या माध्यमातून प्रभावीपणे घडून आली. भारत व सभोवती असलेल्या शेजारील राष्ट्रांशी वेगवेगळ्या स्तरांवर माहितीची देवाणघेवाण होत राहिली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे जनपदे, छोटी तसेच मोठी राज्ये या काळात अस्तित्वात आली. शास्त्रशुद्ध शासनप्रणालीवर आधारित ‘परराष्ट्र धोरणʼ हे एक महत्त्वाचे अंग असलेली शासनव्यवस्था व त्या अनुषंगाने साम्राज्य प्रथमच उदयास आले. भारतभूमीवरचे पहिले एकसंध राष्ट्र याच कालखंडातील. याच काळात विविध परकीय आक्रमणेही झाली. कालांतराने हे परकीय भारताच्या भूमीत एकरूप झाले. विश्वातील पहिले विद्यापीठ भारतात या कालखंडात स्थापन झाले. ब्राह्मण व पौराणिक, बौद्ध व जैन इत्यादी धर्मांशी निगडित मंदिर तसेच मूर्तिसंकल्पनेला मूर्त स्वरूप या कालखंडात मिळाले. सुरुवातीला उत्तराभिमुख असलेला भारताचा प्राचीन इतिहास दक्षिणाभिमुख झाल्याचे याच कालखंडात दिसून येते. या अनुषंगाने येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव या भागात केला आहे. या भागातील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन पूर्व ६०० ते इसवी सन ५५० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी प्राचीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत, आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व प्राचीन ऐतिहासिक काळ ज्ञानमंडळ यांच्या धोरणानुसार हे टिपण कालपरत्वे तसेच विषयपरत्वे अद्ययावत केले जाईल.

मनसर (Mansar)

मनसर

विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले ...
मल्हार (Malhar)

मल्हार

छत्तीसगढच्या बिलासपूर जिल्ह्यातील एक प्राचीन स्थळ. ते बिलासपूर शहरापासून ३२ किमी. आग्नेय दिशेस वसले आहे. भौगोलिक दृष्ट्या मल्हार मोक्याच्या ठिकाणी ...
मस्की येथील लघुलेख (Maski : Minor Rock Edict)

मस्की येथील लघुलेख

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ. १८७० मध्ये रॉबर्ट ब्रूस फूट या भूवैज्ञानिकाने या भागाचे सर्वेक्षण केले. येथे चालुक्य राजा ...
मांढळ (Mandhal)

मांढळ

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील ...
मानमोडी टेकडीवरील लेणी-समूह, जुन्नर (Rock-cut Caves on Manmodi Hill, Junnar)

मानमोडी टेकडीवरील लेणी-समूह, जुन्नर

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरातील ‘मानमोडी’ टेकडीवरील प्रसिद्ध बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. जुन्नरच्या आग्नेयेस सु. २ किमी. अंतरावर मानमोडी डोंगराची सु. ३ ...
मूर्तिपूजा : उद्गम आणि विकास

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मानवशास्त्रज्ञांनी धर्मसंस्थेच्या उगमासंबंधीच्या मानवी विचारांच्या कक्षांचा आढावा घेऊन काही सिद्धांत मांडले. त्यांच्या मते, आदिम मानव जेव्हा आसपासच्या ...
मौर्य कला (Mauryan Art)

मौर्य कला

भारतीय कलेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड. इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस भारतातील प्राचीन मगध देशात मौर्य वंश उदयास आला ...
मौर्यकालीन मृण्मय कला (Maurya Dynasty : Terracotta Art)

मौर्यकालीन मृण्मय कला

प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध राजवंश. चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. इ. स. पू. ३२१ ...
रोमिला थापर (Romila Thapar)

रोमिला थापर

थापर, रोमिला : (३० नोव्हेंबर १९३१). आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इतिहास संशोधिका व विदुषी. विशेषतः प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती यांवरील लेखन-संशोधनासाठी ...
लहुरादेवा (Lahuradewa)

लहुरादेवा

उत्तर प्रदेशच्या मध्य गंगा खोऱ्यातील एक महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय स्थळ. हे संत कबीर नगर जिल्ह्यात लहुरादेवा गावाच्या पश्चिमेकडे स्थित असून त्याचा ...
वा. वि. मिराशी (Vasudev Vishnu Mirashi)

वा. वि. मिराशी

मिराशी, वासुदेव विष्णु : (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. त्यांचा जन्म रत्नागिरी ...
वाकाटक कला (Vakatak Art)

वाकाटक कला

मध्य भारत आणि दख्खनमधील प्रसिद्ध प्राचीन राजवंश. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापर्यंत वाकाटक राजवटीच्या घडामोडींचे अवलोकन गुप्त साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यातच केले जात ...
वाटेगाव नाणेसंचय (Vategaon Coin Hoard)

वाटेगाव नाणेसंचय

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन नाणेसंचय. येथील एका जमिनीमध्ये रोपे लावताना काही मुलांना हा नाणेसंचय ...
वाशिम (Washim)

वाशिम

महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, ...
वासुदेवशरण अग्रवाल (Vasudev Sharan Agarwal)

वासुदेवशरण अग्रवाल

अग्रवाल, वासुदेवशरण : ( ७ ऑगस्ट १९०४ – २६ जुलै १९६७). विख्यात पुरातत्त्वज्ञ, प्राचीन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि साहित्यिक. त्यांचा ...
विदर्भातील वाकाटककालीन विटांची मंदिरे

वाकाटक हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध राजवंश. या राजवंशाच्या काळातील मंदिरांचे अवशेष मागील काही दशकांपासून विदर्भातील वेगवेगळ्या भागांत उत्खननाद्वारे ...
वृषवाहन (Vrushvahan)

वृषवाहन

वृषवाहन आणि वृषभारूढ अर्थात आपले वाहन नंदीसह असलेला शिव हा शिवप्रतिमांपैकी एक लोकप्रिय प्रकार. याच स्वरूपात तो आपल्या भक्तांना दर्शन ...
शंख लिपी (Shell Script)

शंख लिपी

प्राचीन भारतात प्रचलित असलेली शंखाकृतीसदृश अक्षरलिपी. अत्यंत वळणदार आणि लपेटी असलेल्या या लिपीची निर्मिती ब्राह्मी लिपीतून झाली असावी, असे अभ्यासकांचे ...
शां. भा. देव  (Shantaram Bhalchandra Dev)

शां. भा. देव

देव, शांताराम भालचंद्र : (९ जून १९२३–१ ऑक्टोबर १९९६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरातत्त्वज्ञ, भारतीय महापाषाणीय संस्कृतीचे संशोधक आणि पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन ...
शिव (Shiv)

शिव

भारतात ज्या दैवतांची पूजाअर्चा मोठ्या प्रमाणात चालते, त्यांत शिव किंवा शंकराचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. आजचा शिव म्हणजे ऋग्वेदातील रुद्र ...