(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने प्रकाशित झालेल्या मराठी विश्वकोशातील प्राचीन ऐतिहासिक काळ (इ. स. पू. ६०० – इ. स. ५५०) या कालखंडातील प्रमुख व महत्त्वपूर्ण इतिहासाचे टप्पे तसेच घटनांचा समावेश या ज्ञानमंडळाच्या कक्षेत केला आहे. यात प्राचीन इतिहासाची साधने, गणराज्ये-नगरराज्ये, विविध आक्रमणे/स्वाऱ्या, विविध राजघराणी, विविध राजधान्या व प्रशासकीय केंद्रे, आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे, थोर व्यक्तिमत्त्वे, प्रवासवर्णने, दृश्यकला, उत्खनित स्थळे इत्यादी बाबींना प्राधान्य दिले आहे. विश्वकोशाच्या सर्वसाधारण धोरणानुसार प्रादेशिक इतिहासात महाराष्ट्र, तद्नंतर भारतातील तसेच आशिया खंडातील उर्वरित भूभाग; आफ्रिका, यूरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांशी निगडित भूभाग, अशा प्राधान्यक्रमाने नोंदी विचारात घेतल्या आहेत. भौगोलिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या या भूप्रदेशांतील प्राचीन ऐतिहासिक काळ; संबोधनाचे निकष व पर्यायाने या काळाचा प्रारंभ आणि अखेरचे टप्पे भारताहून वेगळे असतील यात शंका नाही.

भारतातील प्राचीन ऐतिहासिक काळाचा प्रारंभ निश्चित करण्याचा निकष हा लिहिण्याची कला अवगत असल्याच्या पुराव्यांवर आधारित आहे, तर या काळाची मर्यादा गुप्त-वाकाटक काळाची अखेर ते इसवी सन ५५०, अशी मानली जाते. हा कालमर्यादानिश्चिततेचा निकष विस्ताराने मोठ्या असलेल्या साम्राज्यांचा शेवटचा टप्पा असा संबोधिला गेला आहे. ब्राह्मी व खरोष्ठी या भारतातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणाऱ्या लिप्यांचा काळ सम्राट अशोक या मौर्य घराण्याच्या राज्यकर्त्याच्या जगप्रसिद्ध अभिलेखाच्या समकालीन असल्याचे इसवी सन १९९० पर्यंत ग्राह्य धरले जात होते. गेल्या काही दशकांत दक्षिण भारतात कोडुमनाल, पोरुन्थल इ. ठिकाणी तसेच श्रीलंकेत अनुराधपुर येथे झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून ब्राह्मी लिपीची प्राचीनता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच या नव्याने उजेडात आलेल्या माहितीच्या आधारावर प्राचीन ऐतिहासिक काळाचा आरंभ महाजनपदाच्या काळापासून, इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून, असल्याचे सांगितले जाते. प्राचीन ऐतिहासिक काळात, तीर्थंकर वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांसारखे युगपुरुष भारतात होऊन गेले. भारतात आणि जागतिक स्तरावर या काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध स्थित्यंतरे झाली. ही स्थित्यंतरे प्रामुख्याने भाषा व लिपी यांच्या माध्यमातून प्रभावीपणे घडून आली. भारत व सभोवती असलेल्या शेजारील राष्ट्रांशी वेगवेगळ्या स्तरांवर माहितीची देवाणघेवाण होत राहिली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे जनपदे, छोटी तसेच मोठी राज्ये या काळात अस्तित्वात आली. शास्त्रशुद्ध शासनप्रणालीवर आधारित ‘परराष्ट्र धोरणʼ हे एक महत्त्वाचे अंग असलेली शासनव्यवस्था व त्या अनुषंगाने साम्राज्य प्रथमच उदयास आले. भारतभूमीवरचे पहिले एकसंध राष्ट्र याच कालखंडातील. याच काळात विविध परकीय आक्रमणेही झाली. कालांतराने हे परकीय भारताच्या भूमीत एकरूप झाले. विश्वातील पहिले विद्यापीठ भारतात या कालखंडात स्थापन झाले. ब्राह्मण व पौराणिक, बौद्ध व जैन इत्यादी धर्मांशी निगडित मंदिर तसेच मूर्तिसंकल्पनेला मूर्त स्वरूप या कालखंडात मिळाले. सुरुवातीला उत्तराभिमुख असलेला भारताचा प्राचीन इतिहास दक्षिणाभिमुख झाल्याचे याच कालखंडात दिसून येते. या अनुषंगाने येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव या भागात केला आहे. या भागातील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन पूर्व ६०० ते इसवी सन ५५० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी प्राचीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत, आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व प्राचीन ऐतिहासिक काळ ज्ञानमंडळ यांच्या धोरणानुसार हे टिपण कालपरत्वे तसेच विषयपरत्वे अद्ययावत केले जाईल.

परमेश्वरीलाल गुप्त (P. L. Gupta)

परमेश्वरीलाल गुप्त

गुप्त, परमेश्वरीलाल : (२४ डिसेंबर १९१४ – २९ जुलै २००१). भारतीय नाणकशास्त्राचे विख्यात संशोधक, हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते ...
पवनार (Pawnar)

पवनार

राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ ...
पांडव (पांडू) लेणी, नाशिक (Pandav caves at Nashik)

पांडव

पश्चिम भारतातील एक महत्त्वाचा हीनयान (थेरवाद) व महायान लेणी-समूह. या लेणी नाशिक शहरापासून पश्चिमेला सुमारे ८ किमी. अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय ...
पिप्रहवा (Piprahwa)

पिप्रहवा

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन स्थळ. इ. स. १८९८ मध्ये विल्यम पेपे या इंग्रज जमीनदाराने येथील आपल्या जमिनीत ...
पैठण (Paithan)

पैठण

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध प्राचीन नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. ते गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर, औरंगाबाद शहराच्या  दक्षिणेस ५६ किमी ...
पौनी (Pauni)

पौनी

महाराष्ट्रातील एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. ते भंडारा जिल्ह्यात नागपूर-भंडारा मार्गावर नागपूरच्या आग्नेयेस सु. ८० किमी.वर वैनगंगा नदीच्या उजव्या ...
प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट (Pune Plates of the Prabhavatigupta)

प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट

वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्ताचा प्रसिद्ध ताम्रपट. पुण्यातील बळवंत भाऊ नगरकर यांच्याकडून हा ताम्रपट प्राप्त झाला. त्यांच्याकडे हा ताम्रपट वंशपरंपरेने आला होता ...
प्राचीन भारतातील महाजनपदे (Mahajanapadas in ancient India)

प्राचीन भारतातील महाजनपदे

भारतीय उपखंडाच्या प्राचीन इतिहासातील राज्ये. यांमध्ये सोळा महाजनपदांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक संहितात जनपद हा शब्द सापडत नाही. काही इतिहासकारांनी ...
फणीगिरी (Phanigiri)

फणीगिरी

तेलंगणा राज्यातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ सूर्यापेट जिल्ह्यातील नगरम तालुक्यात सूर्यापेटच्या ईशान्येस सुमारे ४० किमी. आणि हैदराबादच्या पूर्वेस ...
फाहियान (Fa-Hien) (Faxian)

फाहियान

फाहियान : (इ.स. ३३७ ? – ४२२ ?). एक चिनी प्रवासी. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्म गांधार ते मध्य आशियामार्गे ...
बी. एन. मुखर्जी (B. N. Mukherjee)

बी. एन. मुखर्जी

मुखर्जी, ब्रतिंद्रनाथ : (१ जानेवारी १९३४ — ४ एप्रिल २०१३). प्राचीन इतिहास, पुराभिलेखविद्या, नाणकशास्त्र या ज्ञानशाखांतील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ संशोधक ...
ब्रह्मपुरी (कोल्हापूर) Brahampuri (Kolhapur)

ब्रह्मपुरी

महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंचगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. केवळ पुराततत्त्वीय उत्खननामुळे ते प्रकाशात ...
भट्टीप्रोलू स्तूप (Bhattiprolu)

भट्टीप्रोलू स्तूप

आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध बौद्ध स्तूप स्थळ. ते कृष्णा नदीच्या तीरापासून जवळपास ६ किमी. अंतरावर गुंटूर जिल्ह्यात आहे. या स्तूपाच्या ...
भारतात आलेले परकीय प्रवासी  (Foreign Travellers in India)

भारतात आलेले परकीय प्रवासी  

भारतात आलेले परकीय प्रवासी  : (सहावे ते अठरावे शतक). प्राचीन काळापासून जगभरातल्या लोकांना भारतातील समृद्धता, सुबत्ता यांचे आकर्षण होते. याच ...
भोकरदन Bhokardan (Bhogvardhan)

भोकरदन Bhokardan

भोकरदन हे ठिकाण जालना जिल्ह्यातील केळना नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. प्राचीन ‘भोगवर्धनʼचे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजूंना पांढरीच्या टेकाडांच्या रूपाने ...
भोन (Bhon)

भोन

महाराष्ट्रातील एक पुरातत्त्वीय स्थळ. ते बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यापासून आग्नेयेला सु. २१ किमी. अंतरावर पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे ...
मधुसूदन ढाकी (Madhusudan Dhaky)

मधुसूदन ढाकी

ढाकी, मधुसुदन अमिलाल : (३१ जुलै १९२७ — २९ जुलै २०१६). मंदिरस्थापत्य व कलेतिहासाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान. त्यांचा जन्म गुजरातमधील ...
मधुसूदन नरहर देशपांडे (M. N. Deshapande)

मधुसूदन नरहर देशपांडे

देशपांडे, मधुसूदन नरहर : ( ११ नोव्हेंबर १९२० – ७ ऑगस्ट २००८). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक, कलेतिहासतज्ज्ञ आणि ...
मनसर (Mansar)

मनसर

विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले ...
मल्हार (Malhar)

मल्हार

छत्तीसगढच्या बिलासपूर जिल्ह्यातील एक प्राचीन स्थळ. ते बिलासपूर शहरापासून ३२ किमी. आग्नेय दिशेस वसले आहे. भौगोलिक दृष्ट्या मल्हार मोक्याच्या ठिकाणी ...
Loading...