(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने प्रकाशित झालेल्या मराठी विश्वकोशातील प्राचीन ऐतिहासिक काळ (इ. स. पू. ६०० – इ. स. ५५०) या कालखंडातील प्रमुख व महत्त्वपूर्ण इतिहासाचे टप्पे तसेच घटनांचा समावेश या ज्ञानमंडळाच्या कक्षेत केला आहे. यात प्राचीन इतिहासाची साधने, गणराज्ये-नगरराज्ये, विविध आक्रमणे/स्वाऱ्या, विविध राजघराणी, विविध राजधान्या व प्रशासकीय केंद्रे, आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे, थोर व्यक्तिमत्त्वे, प्रवासवर्णने, दृश्यकला, उत्खनित स्थळे इत्यादी बाबींना प्राधान्य दिले आहे. विश्वकोशाच्या सर्वसाधारण धोरणानुसार प्रादेशिक इतिहासात महाराष्ट्र, तद्नंतर भारतातील तसेच आशिया खंडातील उर्वरित भूभाग; आफ्रिका, यूरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांशी निगडित भूभाग, अशा प्राधान्यक्रमाने नोंदी विचारात घेतल्या आहेत. भौगोलिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या या भूप्रदेशांतील प्राचीन ऐतिहासिक काळ; संबोधनाचे निकष व पर्यायाने या काळाचा प्रारंभ आणि अखेरचे टप्पे भारताहून वेगळे असतील यात शंका नाही.

भारतातील प्राचीन ऐतिहासिक काळाचा प्रारंभ निश्चित करण्याचा निकष हा लिहिण्याची कला अवगत असल्याच्या पुराव्यांवर आधारित आहे, तर या काळाची मर्यादा गुप्त-वाकाटक काळाची अखेर ते इसवी सन ५५०, अशी मानली जाते. हा कालमर्यादानिश्चिततेचा निकष विस्ताराने मोठ्या असलेल्या साम्राज्यांचा शेवटचा टप्पा असा संबोधिला गेला आहे. ब्राह्मी व खरोष्ठी या भारतातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणाऱ्या लिप्यांचा काळ सम्राट अशोक या मौर्य घराण्याच्या राज्यकर्त्याच्या जगप्रसिद्ध अभिलेखाच्या समकालीन असल्याचे इसवी सन १९९० पर्यंत ग्राह्य धरले जात होते. गेल्या काही दशकांत दक्षिण भारतात कोडुमनाल, पोरुन्थल इ. ठिकाणी तसेच श्रीलंकेत अनुराधपुर येथे झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून ब्राह्मी लिपीची प्राचीनता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच या नव्याने उजेडात आलेल्या माहितीच्या आधारावर प्राचीन ऐतिहासिक काळाचा आरंभ महाजनपदाच्या काळापासून, इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून, असल्याचे सांगितले जाते. प्राचीन ऐतिहासिक काळात, तीर्थंकर वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांसारखे युगपुरुष भारतात होऊन गेले. भारतात आणि जागतिक स्तरावर या काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध स्थित्यंतरे झाली. ही स्थित्यंतरे प्रामुख्याने भाषा व लिपी यांच्या माध्यमातून प्रभावीपणे घडून आली. भारत व सभोवती असलेल्या शेजारील राष्ट्रांशी वेगवेगळ्या स्तरांवर माहितीची देवाणघेवाण होत राहिली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे जनपदे, छोटी तसेच मोठी राज्ये या काळात अस्तित्वात आली. शास्त्रशुद्ध शासनप्रणालीवर आधारित ‘परराष्ट्र धोरणʼ हे एक महत्त्वाचे अंग असलेली शासनव्यवस्था व त्या अनुषंगाने साम्राज्य प्रथमच उदयास आले. भारतभूमीवरचे पहिले एकसंध राष्ट्र याच कालखंडातील. याच काळात विविध परकीय आक्रमणेही झाली. कालांतराने हे परकीय भारताच्या भूमीत एकरूप झाले. विश्वातील पहिले विद्यापीठ भारतात या कालखंडात स्थापन झाले. ब्राह्मण व पौराणिक, बौद्ध व जैन इत्यादी धर्मांशी निगडित मंदिर तसेच मूर्तिसंकल्पनेला मूर्त स्वरूप या कालखंडात मिळाले. सुरुवातीला उत्तराभिमुख असलेला भारताचा प्राचीन इतिहास दक्षिणाभिमुख झाल्याचे याच कालखंडात दिसून येते. या अनुषंगाने येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव या भागात केला आहे. या भागातील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन पूर्व ६०० ते इसवी सन ५५० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी प्राचीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत, आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व प्राचीन ऐतिहासिक काळ ज्ञानमंडळ यांच्या धोरणानुसार हे टिपण कालपरत्वे तसेच विषयपरत्वे अद्ययावत केले जाईल.

शिव-अनुग्रहमूर्ती (Shiva-Anugrahamurti)  

शिव-अनुग्रहमूर्ती

एक शिवरूप. शिव ही संहारदेवता असली तरीही वेळप्रसंगी तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्यावरील संकटांचे निवारण करणारा म्हणून अनुग्रह अर्थात ...
शिव-दक्षिणामूर्ती (Shiva-Dakshinamurti)

शिव-दक्षिणामूर्ती

एक शिवरूप. संहारमूर्ती जसे शिवाचे उग्र रूप दर्शवितात, तसेच दक्षिणामूर्ती हे त्याचे शांत रूप म्हणून ओळखले जाते. दक्षिणा म्हणजे बुद्धी ...
शिव-नृत्यमूर्ती (Shiva-Nrityamurti)

शिव-नृत्यमूर्ती

एक प्रसिद्ध शिवरूप. शिव हा योग, ज्ञान, विविध शास्त्रे, कला या सर्वांचा सर्वोच्च अधिकारी असून या रूपात त्याने नृत्य-नाट्यकला प्रवर्तित ...
शिव-संहारमूर्ती (Shiva-Samharamurti)

शिव-संहारमूर्ती

एक शिवरूप. शिवशंकराचे रूप एकीकडे  शांत, वरदायी, त्याचवेळी दुसरीकडे उग्र, विध्वंसक असे दिसून येते. शंकराने आपल्या भक्तांच्या साहाय्यार्थ आणि अन्याय ...
शिवनेरी लेणी-समूह, जुन्नर (Rock-cut Caves on Shivneri Hill, Junnar)

शिवनेरी लेणी-समूह, जुन्नर 

पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेला खोदलेले महत्त्वाचे बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. जुन्नरपासून जुन्नर-कुसूर या रस्त्याने या लेणींकडे जाता ...
शिशुपालगड (Sisupalgarh)

शिशुपालगड

भारताच्या ओडिशा राज्यातील एक प्राचीन स्थळ. ते भुवनेश्वर या राजधानीपासून ९ किमी. अंतरावर आहे. गंगावती नदीने वेढलेल्या या तटबंदीयुक्त नगराचा ...
शुंगकालीन मृण्मय कला (Shunga Dynasty : Terracotta Art)

शुंगकालीन मृण्मय कला

भारतातील एका प्राचीन राजवंशातील कला. मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर गंगा यमुनेच्या दोआबात शुंग घराण्याची सत्ता उदयास आली, असे पुराणांच्या आधारे समजते ...
शोभना गोखले (Shobhana Gokhale)

शोभना गोखले

गोखले, शोभना लक्ष्मण : (२६ फेब्रुवारी १९२८–२२ जून २०१३). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव कुमुद वामन ...
श्रीनिवास रित्ती (Shrinivas Ritti)

श्रीनिवास रित्ती

रित्ती, श्रीनिवास हनुमंतराव : (८ जून १९२९ – १५ ऑगस्ट २०१८). दक्षिण भारतातील पुराभिलेख तसेच प्राच्यविद्यांचे अभ्यासक व संस्कृत पंडित ...
सन्नती-कनगनहल्ली (Sannati - Kanaganhalli)

सन्नती-कनगनहल्ली

कर्नाटकातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. सन्नती हे ठिकाण कलबुर्गी जिल्ह्यात कलबुर्गीपासून दक्षिणेस ६० किमी. अंतरावर, चित्तापूर तालुक्यात भीमा ...
समुद्रगुप्त (Samudragupta)

समुद्रगुप्त

समुद्रगुप्त : ( इ. स.  ३२०–३८०). गुप्त राजघराण्यातील एक थोर व पराक्रमी राजा (कार. ३३५–३७६). पहिला चंद्रगुप्त आणि त्याची राणी ...
सातवाहनांची नाणी (Satavahana Coins)     

सातवाहनांची नाणी

प्राचीन भारतातील एक बलाढ्य राजवंश असलेल्या सातवाहनांचा इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक  विश्वसनीय ठरतो. सातवाहन नाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नाणी ...
सुदर्शन तलाव (Sudarshan Lake)

सुदर्शन तलाव

गुजरातमधील जुनागढ येथील गिरनारजवळील प्रसिद्ध प्राचीन तलाव. इ. स. पू. चौथ्या शतकापासून ते इ. स. पाचव्या शतकापर्यंत या जलाशयाची सातत्याने ...
सोपारा (Sopara)

सोपारा

प्राचीन भारतातील एक समृद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र, बंदर व बौद्ध स्थळ. सोपारा म्हणजेच आजच्या मुंबई उपनगरातील ‘नाला सोपारा’. हे ठिकाण ...
हरिहर शाहुदेव ठोसर (Harihar Thosar)

हरिहर शाहुदेव ठोसर

ठोसर, हरिहर शाहुदेव : (२३ जुलै १९३८ – २२ मे २००५). विख्यात भारतीय पुराभिलेखविद व इतिहासकार. त्यांचा जन्म मराठवाड्यातील केसापुरी ...
हाथीगुंफा शिलालेख (Hathigumpha Inscription)

हाथीगुंफा शिलालेख

ओडिशा (ओरिसा) राज्यातील प्रसिद्ध प्राचीन शिलालेख. पुरी जिल्ह्यातील उदयगिरी टेकडी परिसरात असलेला हा हाथीगुंफा शिलालेख म्हणजे प्राचीन कलिंग देशाचा चेदी ...
हेलिओडोरसचा शिलालेख (Heliodorus Pillar Inscription at Besanagar)

हेलिओडोरसचा शिलालेख

मध्य प्रदेशातील एक प्राचीन शिलालेख. सांचीपासून सु. १२ किमी. अंतरावर आणि विदिशा रेल्वे स्टेशनपासून सु. ५ किमी. अंतरावर बेसनगर येथे ...
ॲरेमियन (Aremiyan)

ॲरेमियन 

ॲरेमियन : इ. स. पू. ११–१० व्या शतकांत सिरियाच्या उत्तरेकडील अरॅम भागात राहणारे सेमिटिक लोक. त्यांची माहिती ॲरेमाइक कोरीव लेख, ...
ॲलरिक, पहिला (Alaric I)

ॲलरिक, पहिला

ॲलरिक, पहिला : (३७० — ४१०). व्हिसिगॉथ टोळीचा राजा. रोमन सम्राट पहिला थीओडोशियस याच्या पदरी असणाऱ्या व्हिसिगॉथ पलटणीचा हा प्रथम ...