(प्रस्तावना) पालकसंस्था : डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे | समन्वयक : प्रकाश जोशी | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने प्रकाशित झालेल्या मराठी विश्वकोशातील प्राचीन ऐतिहासिक काळ (इ. स. पू. ६०० – इ. स. ५५०) या कालखंडातील प्रमुख व महत्त्वपूर्ण इतिहासाचे टप्पे तसेच घटनांचा समावेश या ज्ञानमंडळाच्या कक्षेत केला आहे. यात प्राचीन इतिहासाची साधने, गणराज्ये-नगरराज्ये, विविध आक्रमणे/स्वाऱ्या, विविध राजघराणी, विविध राजधान्या व प्रशासकीय केंद्रे, आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे, थोर व्यक्तिमत्त्वे, प्रवासवर्णने, दृश्यकला, उत्खनित स्थळे इत्यादी बाबींना प्राधान्य दिले आहे. विश्वकोशाच्या सर्वसाधारण धोरणानुसार प्रादेशिक इतिहासात महाराष्ट्र, तद्नंतर भारतातील तसेच आशिया खंडातील उर्वरित भूभाग; आफ्रिका, यूरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांशी निगडित भूभाग, अशा प्राधान्यक्रमाने नोंदी विचारात घेतल्या आहेत. भौगोलिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या या भूप्रदेशांतील प्राचीन ऐतिहासिक काळ; संबोधनाचे निकष व पर्यायाने या काळाचा प्रारंभ आणि अखेरचे टप्पे भारताहून वेगळे असतील यात शंका नाही.

भारतातील प्राचीन ऐतिहासिक काळाचा प्रारंभ निश्चित करण्याचा निकष हा लिहिण्याची कला अवगत असल्याच्या पुराव्यांवर आधारित आहे, तर या काळाची मर्यादा गुप्त-वाकाटक काळाची अखेर ते इसवी सन ५५०, अशी मानली जाते. हा कालमर्यादानिश्चिततेचा निकष विस्ताराने मोठ्या असलेल्या साम्राज्यांचा शेवटचा टप्पा असा संबोधिला गेला आहे. ब्राह्मी व खरोष्ठी या भारतातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणाऱ्या लिप्यांचा काळ सम्राट अशोक या मौर्य घराण्याच्या राज्यकर्त्याच्या जगप्रसिद्ध अभिलेखाच्या समकालीन असल्याचे इसवी सन १९९० पर्यंत ग्राह्य धरले जात होते. गेल्या काही दशकांत दक्षिण भारतात कोडुमनाल, पोरुन्थल इ. ठिकाणी तसेच श्रीलंकेत अनुराधपुर येथे झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून ब्राह्मी लिपीची प्राचीनता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच या नव्याने उजेडात आलेल्या माहितीच्या आधारावर प्राचीन ऐतिहासिक काळाचा आरंभ महाजनपदाच्या काळापासून, इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून, असल्याचे सांगितले जाते. प्राचीन ऐतिहासिक काळात, तीर्थंकर वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांसारखे युगपुरुष भारतात होऊन गेले. भारतात आणि जागतिक स्तरावर या काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध स्थित्यंतरे झाली. ही स्थित्यंतरे प्रामुख्याने भाषा व लिपी यांच्या माध्यमातून प्रभावीपणे घडून आली. भारत व सभोवती असलेल्या शेजारील राष्ट्रांशी वेगवेगळ्या स्तरांवर माहितीची देवाणघेवाण होत राहिली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे जनपदे, छोटी तसेच मोठी राज्ये या काळात अस्तित्वात आली. शास्त्रशुद्ध शासनप्रणालीवर आधारित ‘परराष्ट्र धोरणʼ हे एक महत्त्वाचे अंग असलेली शासनव्यवस्था व त्या अनुषंगाने साम्राज्य प्रथमच उदयास आले. भारतभूमीवरचे पहिले एकसंध राष्ट्र याच कालखंडातील. याच काळात विविध परकीय आक्रमणेही झाली. कालांतराने हे परकीय भारताच्या भूमीत एकरूप झाले. विश्वातील पहिले विद्यापीठ भारतात या कालखंडात स्थापन झाले. ब्राह्मण व पौराणिक, बौद्ध व जैन इत्यादी धर्मांशी निगडित मंदिर तसेच मूर्तिसंकल्पनेला मूर्त स्वरूप या कालखंडात मिळाले. सुरुवातीला उत्तराभिमुख असलेला भारताचा प्राचीन इतिहास दक्षिणाभिमुख झाल्याचे याच कालखंडात दिसून येते. या अनुषंगाने येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव या भागात केला आहे. या भागातील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन पूर्व ६०० ते इसवी सन ५५० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी प्राचीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत, आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व प्राचीन ऐतिहासिक काळ ज्ञानमंडळ यांच्या धोरणानुसार हे टिपण कालपरत्वे तसेच विषयपरत्वे अद्ययावत केले जाईल.

जुनागढ येथील रुद्रदामनचा शिलालेख  (Junagadh rock inscription of Rudradaman)

जुनागढ येथील रुद्रदामनचा शिलालेख (Junagadh rock inscription of Rudradaman)

गुजरातमधील जुनागढ येथील प्राचीन शिलालेख. ‘गिरनार प्रस्तर लेखʼ म्हणूनही प्रसिद्ध. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोक याचा लेख असलेल्या शिळेच्या शिरोभागी ...
जुन्नर (Junnar)

जुन्नर (Junnar)

पुणे जिल्ह्यातील एक पुरातात्त्विक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ. महाराष्ट्रातील प्राचीन राजवंश सातवाहन यांच्या काळातील एक मुख्य ठिकाण, तसेच छ ...
जुन्नर लेणी (Rock-cut Caves at Junnar)

जुन्नर लेणी (Rock-cut Caves at Junnar)

सातवाहनकालीन बौद्ध धर्मातील थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी. संख्येच्या दृष्टीने हा भारतातील सर्वांत मोठा लेणी–समूह आहे. जुन्नर हे ठिकाण पुण्यापासून ९० ...
जोगळटेंभी  नाणेसंचय  (Jogaltembhi Coin Hoard)

जोगळटेंभी  नाणेसंचय  (Jogaltembhi Coin Hoard)

जोगळटेंभी  नाणेसंचय :  जोगळटेंभी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील प्रसिद्ध नाणी. १९०८ मध्ये पश्चिमी क्षत्रप राजवंशातील क्षहरात घराण्यातील नहपान राजाच्या चांदीच्या ...
जोगेश्वरी लेणे (Jogeshwari Rock-Cut Cave)

जोगेश्वरी लेणे (Jogeshwari Rock-Cut Cave)

महाराष्ट्रातील पाशुपत शैवमताचा एक प्राचीन मठ. मुंबई उपनगरातील मुळच्या मजासगावाच्या पश्चिमेस आणि आंबोली गावाच्या पूर्वेस एका टेकाडामध्ये हे लेणे खोदले ...
झूसी (Jhusi)

झूसी (Jhusi)

उत्तर प्रदेशातील एक प्राचीन स्थळ. हे प्रयागराज (जुने अलाहाबाद) शहरापासून पूर्वेस ७ किमी. अंतरावर, गंगा नदीच्या तीरावर गंगा – यमुना ...
ठाणाळे लेणी (Thanale Rock cut Caves)

ठाणाळे लेणी (Thanale Rock cut Caves)

रायगड जिल्ह्यातील बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. या लेणी ‘नाडसूर लेणी’ या नावानेही ओळखल्या जातात. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावाच्या हद्दीत ...
तऱ्हाळे नाणेसंचय  (Tarhala Coin Hoard)

तऱ्हाळे नाणेसंचय  (Tarhala Coin Hoard)

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात)  स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले ...
तुळजा लेणी, जुन्नर (Tulja Leni at Junnar)

तुळजा लेणी, जुन्नर (Tulja Leni at Junnar)

जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत ...
तेर (Ter)

तेर (Ter)

महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक शहर. हे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादच्या ईशान्येस ३२ किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसले ...
देवनीमोरी (Devnimori)

देवनीमोरी (Devnimori)

गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील मेशवो नदीच्या तीरावरील एक प्राचीन स्थळ (यापूर्वी साबरकांठा जिल्ह्यात हा भाग होता). पांढरीच्या या टेकाडाला स्थानिक लोक ...
धाराशिव लेणी (Dharashiv Rock Cut Caves)

धाराशिव लेणी (Dharashiv Rock Cut Caves)

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन जैन लेणी समूह. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहराच्या पश्चिमेस सु. ६ किमी. अंतरावर बालाघाट डोंगररांगेतील ...
नगरधन (Nagardhan)

नगरधन (Nagardhan)

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नागपूर शहराच्या ईशान्येस ४० किमी. आणि रामटेकच्या दक्षिणेस ६ किमी ...
नहपानाचा कोरीव लेख (Nashik Inscription of Nahapan)

नहपानाचा कोरीव लेख (Nashik Inscription of Nahapan)

क्षहरात वंशाचा राजा नहपान याचा प्रसिद्ध प्राचीन कोरीव लेख. महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून सु. ९ किमी. अंतरावर नैर्ऋत्य दिशेला त्रिरश्मी टेकडीवरील ...
नागरा (Nagara)

नागरा (Nagara)

वाकाटककालीन मंदिर-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन स्थळ. ते गोंदिया जिल्ह्यात, गोंदिया-बालाघाट मार्गावर गोंदियापासून ६ किमी. अंतरावर आहे. नागरा येथील ...
नाणेघाट (Naneghat)

नाणेघाट (Naneghat)

महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. ते पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यात जुन्नरच्या वायव्येस सुमारे २८ किमी.वर वसलेले ...
नाशिक (नासिक) (Nashik)

नाशिक (नासिक) (Nashik)

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातन स्थळ. ते गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून ते नाशिक जिल्ह्याचे ठाणे आहे. नाशिक शहराला सु ...
नी. पु. जोशी (Neelkanth Purushottan Joshi)

नी. पु. जोशी (Neelkanth Purushottan Joshi)

जोशी, नीळकंठ पुरुषोत्तम : (१६ एप्रिल १९२२—१५ मार्च २०१६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक. त्यांचा जन्म मुंबई ...
नेवासा (नेवासे) (Nevasa)

नेवासा (नेवासे) (Nevasa)

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन स्थळ. ते अहमदनगर शहराच्या ईशान्येस सु. ६० किमी. अंतरावर प्रवरा नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे ...
पन्हाळे-काजी लेणी-समूह (Rock-cut caves at Panhale-Kaji)

पन्हाळे-काजी लेणी-समूह (Rock-cut caves at Panhale-Kaji)

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. दापोलीपासून सु. ३० किमी., तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे ...
Loading...