(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
शिक्षणशास्त्र या विषयाचा संबंध अनेक विषयांशी प्रत्यक्षात अथवा अप्रत्यक्षात आहे. त्यामुळे अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकाला तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या दोन्ही विषयांची ओळख असणे आवश्यक असते. त्या आधारावरच शिक्षणातील प्रमुख घटक अध्ययन-अध्यापन आणि अभ्यासक्रम यांचा मागोवा घेता येतो आणि त्या दृष्टिकोनातून विविध अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा लागतो. भारतातील शिक्षण पद्धतींचा विचार करताना गुरुकुल पद्धतीपासून आधुनिक शिक्षण पद्धतींपर्यंतच्या स्थित्यंतरांचा मागोवा अपरिहार्य ठरतो.

आधुनिक शिक्षणात मानव्यविद्या शाखेतील विशेषत: सामाजिक विज्ञानांबरोबरच तंत्रविद्या व विज्ञान शाखेतील विषयांच्या अभ्यासाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षणशास्त्रात संगणकासारखा विषय यापुढे अग्रक्रमाने अभ्यासाचा विषय असेल ! त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शिक्षणाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. साहजिकच आज शिक्षणाकडे पाहावयाच्या मूलगामी दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामध्ये शिक्षणाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम, सार्वत्रिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, सामाजिक शिक्षण, दुर्बल घटकांचे शिक्षण, प्रज्ञावान व गतिमंद शिक्षण, निरंतर शिक्षण, तंत्रशिक्षण व विज्ञान इत्यादी क्षेत्रांत नवीन शैक्षणिक विचारांची कालमानानुसार भर पडली आहे. तसेच भारतीय शिक्षणपद्धतीवर भारतीय विचारवंतांच्या प्रभावाबरोबरच पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव असल्यामुळे भारतीय शिक्षणपद्धतीत प्रयोगशीलता प्रविष्ट झाली आहे. विज्ञाननिष्ठ व संशोधनात्मक शिक्षणपद्धतीला आपातत: महत्त्व प्राप्त झाले आहे. तत्त्वज्ञानाचे विविध प्रणाली/विचारधारा आहेत. या विविध पंथात शिक्षणतज्ज्ञांनी वैचारिक भर टाकलेली आहे. प्रत्येक विचारवंतांच्या विचारावर तत्कालीन व आधुनिक कालखंडातील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा प्रभाव असतो. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञांच्या विचारांना विशिष्ट प्रणालीत समाविष्ट करतांना फार सावधगिरी बाळगावी लागते. अन्यथा त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाज परिवर्तनात शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षणशास्त्रात संरक्षण, संक्रमण आणि संवर्धन यांचा साकल्याने विचार केला जातो. एवढेच नव्हे, तर शिक्षणशास्त्र विषयामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन ते देशाचे सुजाण नगरिक बनतात. त्यासाठी शिक्षण देणाऱ्या विविध संशोधनात्मक व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे स्थापन झाली आहेत. त्यांतून विविध विषयांचे मार्गदर्शन, अध्यापन व संशोधन करण्यात येते.

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आणि महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून विषयात संदर्भांकित माहितीचे संकलन करून योग्य अशी माहिती समाजापर्यंत पोहचविणे, हे शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे.

तुलनात्मक शिक्षण (Comparative Education)

तुलनात्मक शिक्षण

स्वदेशी शिक्षणपद्धतीची तुलना इतर देशांतील शिक्षणपद्धतीशी अभ्यासपूर्ण करून आपल्या शिक्षणपद्धतीत असलेल्या उणीवा दूर करणे आणि विदेशी शिक्षणपद्धतीतील महत्त्वपूर्ण घटक अंगीकारणे ...
थॉमस कँडी (Thomas Candy)

थॉमस कँडी

मेजर थॉमस कँडी : (१३ डिसेंबर १८०४–२६ फेब्रुवारी १८७७). एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ईस्ट नॉयले ...
निकषात्मक संदर्भ कसोटी (Criterian Reference Test)

निकषात्मक संदर्भ कसोटी

विद्यार्थ्यांच्या विविध ज्ञानपातळीचे शैक्षणिक प्रगतीचे किंवा अनेकविध क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी निकषांचे संदर्भ पुढे ठेवून विकसित केलेली एक शैक्षणिक कसोटी. तसेच ...
निरंतर शिक्षण (Continuing Education)

निरंतर शिक्षण

सातत्यपूर्ण चालणारी शिक्षण प्रक्रिया. निरंतर शिक्षणामध्ये माणूस जन्मपासून मरेपर्यंत शिकत असतो. विसाव्या शतकाच्या आरंभापासून पाश्चात्त्य देशांत निरंतर शिक्षण योजना वेगवेगळ्या ...
निवृत्ती गोविंद जगदाळे (Nivrutti Govind Jagdale)

निवृत्ती गोविंद जगदाळे

जगदाळे, ‍निवृत्ती गोविंद (Jagdale, Nivrutti Govind) : (४ फेब्रुवारी १९०३ – ३० मे १९८१)‍. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षण प्रसारक व ...
पंडिता रमाबाई (Pandita Ramabai)

पंडिता रमाबाई

रमाबाई, पंडिता (Pandita, Ramabai) : (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत ...
परिणामकारक संप्रेषण (Effective Communication)

परिणामकारक संप्रेषण

आपले विचार, भावना अथवा इतर माहिती अन्य व्यक्तींपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे एक कौशल्य किंवा प्रक्रिया. जागतिक आरोग्य संघटनेने मानवी जीवन सुकर ...
परीक्षा (Examination)

परीक्षा

विद्यार्थ्याच्या ज्ञानात्मक, भावात्मक व क्रियात्मक गुणवत्तेचे आणि विकासाचे मूल्यमापन करणारे एक सर्वांत महत्त्वपूर्ण तंत्र. यालाच अध्ययन-अध्यापनाच्या परिणामाच्या मोजमापाचे साधन म्हणजे ...
पर्यावरण अभियांत्रिकी (Environmental Engineering)

पर्यावरण अभियांत्रिकी

नैसर्गिक पर्यावरणाचा विवेकपूर्ण उपयोग करून त्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या शाखांतील तत्त्वांचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजेच ...
पर्यावरण मूल्यमापन (Environment Evaluation)

पर्यावरण मूल्यमापन

मनुष्याच्या कृतीचे पर्यावरणावर काय परिणाम होतील, याचे सर्वंकष आकलन करण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरण मूल्यमापन होय. मूल्यमापनामध्ये एखाद्या बाबीचे संख्यात्मक आणि ...
पर्यावरण विज्ञान (Environmental Science)

पर्यावरण विज्ञान

विविध परिसंस्था प्रणालीच्या परस्पर संबंधांचे अध्ययन करणारी एक शाखा. यामध्ये मानवी स्वभाव, परस्पर संबंध आणि पर्यावरणीय समस्यांचे अन्वेषण करून त्यांना ...
पर्यावरण शिक्षण (Environment Education)

पर्यावरण शिक्षण

विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभोवती असलेल्या मानवनिर्मित व जैविक घटकांचे सरंक्षण आणि पालन-पोषण करण्याचे ज्ञान देवून त्यांच्यात पर्यावरणाबाबत सकारात्मक कौशल्य निर्माण करणारे ...
पाउलू फ्रिअरी (Paulo Freire)

पाउलू फ्रिअरी

फ्रिअरी, पाउलू (Freire, Paulo) : (१९ सप्टेंबर १९२१ – २ मे १९९७). प्रसिद्ध ब्राझीलीयन शिक्षणतज्ज्ञ व तत्त्वज्ञ. पाउलू यांचा जन्म ...
पाठनियोजन (Lesson Planning)

पाठनियोजन

अध्यापनासंदर्भात निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरलेला आराखडा म्हणजे पाठनियोजन. पाठनियोजन करताना पाठाची प्रस्तावना, हेतूकथन, विषयविवेचन, संकलन, उपयोजन व गृहपाठ ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ. केवळ एकाच जिल्हयासाठी निर्मिती झालेले विद्यापीठ, अशी या विद्यापीठाची ख्याती आहे. विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र राज्य शासकीय ...
पुनर्रचनावाद (Reconstructionism)

पुनर्रचनावाद

कार्यवादातील उणीवा दूर करून त्यास नवे रूप देण्याच्या, त्याची पुनर्बांधणी करण्याच्या प्रयत्नांतून अमेरिकेत उदयास आलेली एक नवीन विचारसरणी. विसाव्या शतकाच्या ...
पूर्व प्राथमिक शिक्षण (Pre-Primary Education)

पूर्व प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षणाला पूरक आणि पायाभूत असलेले शिक्षण. शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जन्मापासून किंबहुना जन्मास येण्यापूर्वीपासून या शिक्षणास ...
पोर्टफोलिओ (Portfolio)

पोर्टफोलिओ

अध्ययनाचे मूल्यमापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी एक प्रक्रिया. पोर्टफोलिओ हा मूल्यमापन आणि अध्यापनाचे हेतू या दोहोंत सुसंगती आणण्याचा प्रभावी ...
प्रकल्प पद्धती (Project Methodology)

प्रकल्प पद्धती

वर्गात एखाद्या विषयाच्या घटकावर मिळालेला प्रकल्प स्वातंत्र्य, स्वावलंबन, कृतिशीलता, सहकार्य या तत्त्वांच्या आधारे सामूहिक किंवा वैयक्तिकरित्या सोडविण्याची एक पद्धत. अठराव्या ...
प्रणाली उपागम (System Approach)

प्रणाली उपागम

अध्यापन कार्य यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिक्षणक्षेत्रात उदयास आलेली एक नवीन संकल्पना किंवा दृष्टिकोण. ही संकल्पना जटिल मानव-यंत्रणेच्या संदर्भातील संशोधन आणि ...