(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
शिक्षणशास्त्र या विषयाचा संबंध अनेक विषयांशी प्रत्यक्षात अथवा अप्रत्यक्षात आहे. त्यामुळे अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकाला तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या दोन्ही विषयांची ओळख असणे आवश्यक असते. त्या आधारावरच शिक्षणातील प्रमुख घटक अध्ययन-अध्यापन आणि अभ्यासक्रम यांचा मागोवा घेता येतो आणि त्या दृष्टिकोनातून विविध अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा लागतो. भारतातील शिक्षण पद्धतींचा विचार करताना गुरुकुल पद्धतीपासून आधुनिक शिक्षण पद्धतींपर्यंतच्या स्थित्यंतरांचा मागोवा अपरिहार्य ठरतो.

आधुनिक शिक्षणात मानव्यविद्या शाखेतील विशेषत: सामाजिक विज्ञानांबरोबरच तंत्रविद्या व विज्ञान शाखेतील विषयांच्या अभ्यासाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षणशास्त्रात संगणकासारखा विषय यापुढे अग्रक्रमाने अभ्यासाचा विषय असेल ! त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शिक्षणाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. साहजिकच आज शिक्षणाकडे पाहावयाच्या मूलगामी दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामध्ये शिक्षणाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम, सार्वत्रिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, सामाजिक शिक्षण, दुर्बल घटकांचे शिक्षण, प्रज्ञावान व गतिमंद शिक्षण, निरंतर शिक्षण, तंत्रशिक्षण व विज्ञान इत्यादी क्षेत्रांत नवीन शैक्षणिक विचारांची कालमानानुसार भर पडली आहे. तसेच भारतीय शिक्षणपद्धतीवर भारतीय विचारवंतांच्या प्रभावाबरोबरच पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव असल्यामुळे भारतीय शिक्षणपद्धतीत प्रयोगशीलता प्रविष्ट झाली आहे. विज्ञाननिष्ठ व संशोधनात्मक शिक्षणपद्धतीला आपातत: महत्त्व प्राप्त झाले आहे. तत्त्वज्ञानाचे विविध प्रणाली/विचारधारा आहेत. या विविध पंथात शिक्षणतज्ज्ञांनी वैचारिक भर टाकलेली आहे. प्रत्येक विचारवंतांच्या विचारावर तत्कालीन व आधुनिक कालखंडातील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा प्रभाव असतो. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञांच्या विचारांना विशिष्ट प्रणालीत समाविष्ट करतांना फार सावधगिरी बाळगावी लागते. अन्यथा त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाज परिवर्तनात शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षणशास्त्रात संरक्षण, संक्रमण आणि संवर्धन यांचा साकल्याने विचार केला जातो. एवढेच नव्हे, तर शिक्षणशास्त्र विषयामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन ते देशाचे सुजाण नगरिक बनतात. त्यासाठी शिक्षण देणाऱ्या विविध संशोधनात्मक व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे स्थापन झाली आहेत. त्यांतून विविध विषयांचे मार्गदर्शन, अध्यापन व संशोधन करण्यात येते.

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आणि महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून विषयात संदर्भांकित माहितीचे संकलन करून योग्य अशी माहिती समाजापर्यंत पोहचविणे, हे शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे.

चट्टोपाध्याय समिती (Chattopadhyay Committee)

चट्टोपाध्याय समिती

चट्टोपाध्याय समितीला राष्ट्रीय शिक्षक आयोग किंवा नॅशनल कमिशन फॉर टीचर्स असेही संबोधले जाते. शिक्षकांचे महत्त्व आणि राष्ट्राच्या मानवी व भौतिक ...
चार्ल्स विल्यम एलियट (Charles William Eliot)

चार्ल्स विल्यम एलियट

चार्ल्स विल्यम एलियट : (२० मार्च १८३४–२२ ऑगस्ट १९२६). अमेरिकेतील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व थोर विचारवंत. त्यांचा जन्म बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे ...
चिकित्सक विचार प्रक्रिया (Critical Thinking)

चिकित्सक विचार प्रक्रिया

मानसिक स्तरावर चालणारी एक विचार प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे व्यक्ती आपल्या अनुभवांच्या व माहितीच्या साह्याने वस्तुनिष्ठपणे विश्लेषण व परीक्षण करू शकतो ...
जगन्नाथ शंकरशेट (Jaggannath Shankarseth)

जगन्नाथ शंकरशेट

शंकरशेट, जगन्नाथ : (१० फेब्रुवारी १८०३–३१ जुलै १८६५). महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण ...
जम्मू विद्यापीठ (Jammu University)

जम्मू विद्यापीठ

जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये श्रीनगर येथे जम्मू व काश्मीर या नावाचे एक विद्यापीठ स्थापन करण्यात आले ...
जी. राम रेड्डी (G. Ram Reddy)

जी. राम रेड्डी

रेड्डी, जी. राम (Reddy, G. Ram) : (४ डिसेंबर १९२९ – २ जुलै १९९५). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, दुरस्त शिक्षणाचे विशारद आणि ...
जीवन कौशल्ये (Life Skills)

जीवन कौशल्ये

आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. ह्या बदलांमुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या ...
जे. पी. नाईक (J. P. Naik)

जे. पी. नाईक

नाईक, जे. पी. (Naik, J. P.) : (५ सप्टेंबर १९०७ – ३० ऑगस्ट १९८१). प्रसिद्ध भारतीय शिक्षणतज्ज्ञ व पद्मभूषण पुरस्काराचे ...
जेरोम ब्रुनर (Jerome Bruner)

जेरोम ब्रुनर

ब्रुनर, जेरोम  (Bruner, Jerome) : (१ ऑक्टोबर १९१५ ते ५ जून २०१६). प्रसिद्ध अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ. जेरोम यांचा जन्म ...
जॉन एमस कोमीनिअस (John Amos Comenius)

जॉन एमस कोमीनिअस

कोमीनिअस,जॉन एमस : (२८ मार्च १५९२–४ नोव्हेंबर १६७०). चेकोस्लोव्हाकियातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, परिवर्तनवादी व बिशप. त्यांचा जन्म निव्हनिक (चेकोस्लोव्हाकिया) येथे झाला ...
ज्ञानरचनावाद (Constructivism)

ज्ञानरचनावाद

पूर्वज्ञान व पूर्वानुभव यांच्या आधारे नवीन ज्ञानाची किंवा संकल्पनेची रचना-निर्मिती करणे, म्हणजे ज्ञानरचनावाद होय. ज्ञानरचनावाद ही शिक्षणशास्त्रातील नव-संकल्पना असून ती ...
झाकिर हुसेन (Zakir Hussain)

झाकिर हुसेन

हुसेन, झाकिर : (८ फेब्रुवारी १८९७–३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ...
डिस्कुलिंग सोसायटी (Deschooling Society)

डिस्कुलिंग सोसायटी

शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाणारे एक पुस्तक. प्रसिद्ध ऑस्ट्रियन शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि सामाजिक समीक्षक इव्हान इलिच यांचे १९७१ ...
डॉल्टन योजना (Dalton Plan)

डॉल्टन योजना

वैयक्तिक शिक्षणावर आधारित एक माध्यमिक शिक्षण तंत्र व आधुनिक अध्यापनपद्धत. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ हेलेन पार्कहर्स्ट ( Helen Parkhurst) यांनी १९२० मध्ये हा ...
ताराबाई मोडक (Tarabai Modak)

ताराबाई मोडक

मोडक, ताराबाई (Modak, Tarabai) : (१९ एप्रिल १८९२ – ३१ ऑगस्ट १९७३). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक. ताराबाई या ...
थॉमस कँडी (Thomas Candy)

थॉमस कँडी

मेजर थॉमस कँडी : (१३ डिसेंबर १८०४–२६ फेब्रुवारी १८७७). एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ईस्ट नॉयले ...
निकषात्मक संदर्भ कसोटी (Criterian Reference Test)

निकषात्मक संदर्भ कसोटी

विद्यार्थ्यांच्या विविध ज्ञानपातळीचे शैक्षणिक प्रगतीचे किंवा अनेकविध क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी निकषांचे संदर्भ पुढे ठेवून विकसित केलेली एक शैक्षणिक कसोटी. तसेच ...
निरंतर शिक्षण (Continuing Education)

निरंतर शिक्षण

सातत्यपूर्ण चालणारी शिक्षण प्रक्रिया. निरंतर शिक्षणामध्ये माणूस जन्मपासून मरेपर्यंत शिकत असतो. विसाव्या शतकाच्या आरंभापासून पाश्चात्त्य देशांत निरंतर शिक्षण योजना वेगवेगळ्या ...
पंडिता रमाबाई (Pandita Ramabai)

पंडिता रमाबाई

रमाबाई, पंडिता (Pandita, Ramabai) : (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत ...
परिणामकारक संप्रेषण (Effective Communication)

परिणामकारक संप्रेषण

आपले विचार, भावना अथवा इतर माहिती अन्य व्यक्तींपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे एक कौशल्य किंवा प्रक्रिया. जागतिक आरोग्य संघटनेने मानवी जीवन सुकर ...