(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

हिप्पोक्रेटिस (Hippocrates)

हिप्पोक्रेटिस

हिप्पोक्रेटिस : (अंदाजे – इ.स.पूर्व ४६० ते ३७०) हिप्पोक्रेटिस यांचा कार्यकाल हा इ.स. पूर्व ४६० ते ३७० वर्षे असा मानला जातो ...
हिम्मतराव सालुबा बावस्कर ( Himmatarao Saluba Bawaskar)

हिम्मतराव सालुबा बावस्कर

बावस्कर, हिम्मतराव सालुबा (३ मार्च, १९५१). भारतीय वैद्य (physician). बावस्कर यांनी विंचूदंश व सर्पदंश यांवर गुणकारी औषधाचा शोध लावला.त्यांचा जन्म ...
हिलमन, मॉरीस राल्फ (Hilleman, Maurice Ralph)

हिलमन, मॉरीस राल्फ

हिलमन, मॉरीस राल्फ : ( ३० ऑगस्ट, १९१९ – ११ एप्रिल, २००५ ) मॉरिस राल्फ हिलमन यांचा जन्म माइल्स सिटी ...
हुमायून अब्दुलाली (Humayun Abdulali)

हुमायून अब्दुलाली

अब्दुलाली, हुमायून : (१९ मे १९१४ – ३ जून २००१) भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ हुमायून अब्दुलाली यांचा जन्म जपानमधील कोबे ...
हूबर, रॉबर्ट (Huber, Robert )

हूबर, रॉबर्ट

हूबर, रॉबर्ट : ( २० फेब्रुवारी, १९३७ ) रॉबर्टं हूबर यांचा जन्म  म्यूनिक येथे झाला. म्यूनिकमधील भाषेचे ज्ञान देणार्‍या शाळेत (Humanistische ...
हॅन्सन, गेरहार्ड हेन्रीक आरमौर ( Hansen, Gerhard Henrik Armauer)

हॅन्सन, गेरहार्ड हेन्रीक आरमौर

हॅन्सन, गेरहार्ड हेन्रीक आरमौर : ( २९ जुलै १८४१ १२ फेब्रुवारी १९१२ )        हान्सेन यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने  ...
हॅमिल्टन मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ॲट ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन (The Hamilton Mathematics Institute at Trinity College, Dublin)

हॅमिल्टन मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ॲट ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन

हॅमिल्टन मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ॲट ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन : (स्थापना २००५) विलियम रोवन हॅमिल्टन (William Rowan Hamilton, ४ ऑगस्ट, १८०५ ते २ ...
हॅरल्ड क्लेटन यूरी (Harold Clayton Urey)

हॅरल्ड क्लेटन यूरी

यूरी, हॅरल्ड क्लेटन : (२९ एप्रिल १८९३ — ५ जानेवारी १९८१). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी हायड्रोजनाचा जड अणू म्हणजेच ड्यूटेरीयम (Deuterium) ...
हॅरी स्मिथ  (Harry Smith)

हॅरी स्मिथ 

स्मिथ, हॅरी : ( ७ ऑगस्ट, १९२१ – १० डिसेंबर, २०११ ) हॅरी स्मिथ यांचा जन्म नॉर्थहॅम्पटन येथे झाला. एक ...
हॅरॉल्ड इलियट वार्मस (Harold Eliot Varmus)

हॅरॉल्ड इलियट वार्मस

वार्मस, हॅरॉल्ड इलियट: (डिसेंबर १८ १९३९ -) हॅरॉल्ड इलियट वार्मस यांचा जन्म अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात झाला. हॅरॉल्डचे शालेय शिक्षण फ्रीपोर्ट ...
हॅल्डन केफ्फर हार्टलिन (Halden Keffer Hartlin)

हॅल्डन केफ्फर हार्टलिन

हॅल्डन केफ्फर हार्टलिन : ( २२ डिसेंबर १९०३ – १७ मार्च १९८३ ) हॅल्डन केफ्फर हार्टलिन यांचा जन्म ब्लूम्सबर्ग, पेन्सिलव्हानिया ...
हेनरिच रोहरर (Heinrich Rohrer)

हेनरिच रोहरर

रोहरर, हेनरिच : ( ६ जून १९३३ – १६ मे २०१३ ) हेनरिच रोहरर यांचा जन्म स्वीडनच्या बुक्स (Buchs) मधील ...
हेन्रिक इवानिएच (Henryk Iwaniec)

हेन्रिक इवानिएच

इवानिएच, हेन्रिक : (९ ऑक्टोबर १९४७). पोलिश-अमेरिकन गणितज्ञ. त्यांचे अंकशास्त्रातील संशोधन मुख्यतः अविभाज्य संख्यांसाठीची चाळणी पद्धती आणि संमिश्र विश्लेषणातील मूलभूत ...
हेस, विलियम ( Hayes, William)

हेस, विलियम

हेस, विलियम : (१९१३ ते १९९४) विलियम हेसउर्फ बिल यांचा जन्म एडमंडसटाउन पार्क, रथफार्न्हेम, डब्लीन (Edmondstown Park, Rathfarnham, Dublin) येथे ...
हेसे, फॅनी (Hesse, Fanny)

हेसे, फॅनी

हेसे, फॅनी : ( २२ जून, १८५० ) आजच्या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातील अविभाज्य घटक असणाऱ्या आगार या पदार्थाचा वापर सर्वप्रथम केला ...
हेस्टिंग्ज, जॉन वूडलँड वूडी (Hastings, John Woodland ‘Woody’ )

हेस्टिंग्ज, जॉन वूडलँड वूडी

हेस्टिंग्ज, जॉन वूडलँड ‘वूडी’ : ( २४ मार्च, १९२७ ते ६ ऑगस्ट, २०१४) जॉन वूडलँड वूडी हेस्टिंग्ज यांचा जन्म मेरिलँडमधील ...
हॉएल, फ्रेड ( Hoyle, Fred)

हॉएल, फ्रेड

हॉएल, फ्रेड : ( २४ जून १९१५ – २० ऑगस्ट २००१ ) फ्रेड हॉएल यांचा जन्म इंग्लंडमधील गिल्स्टेड या गावी ...
हॉजकिन, थॉमस  (Hodgkin, Thomas)

हॉजकिन, थॉमस 

हॉजकिन, थॉमस ( १७ ऑगस्ट, १७९८ – ५ एप्रिल, १८६६ ) थॉमस हॉजकिन यांचा जन्म इंग्लंडमधील पेंटोव्हिल गावात झाला. सुरुवातीचे ...
हॉपकिन्स, फ्रेडरिक गॉलंड (Hopkins, Frederick Gowland)

हॉपकिन्स, फ्रेडरिक गॉलंड

हॉपकिन्स, फ्रेडरिक गॉलंड (२० जून, १८६१- १६ मे, १९४७) हॉपकिन्स यांचा जन्म इंग्लंडमधील ससेक्स (Sussex) प्रांताच्या इस्टबर्न (Eastbourne) या शहरात झाला ...
हॉवर्ड मार्टिन टेमिन (Howard Martin Temin)

हॉवर्ड मार्टिन टेमिन

टेमिन, हॉवर्ड मार्टिन : (१० डिसेंबर, १९३४  ते ०९ फेब्रुवारी, १९९४) अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया राज्यातील फिलाडेल्फियामध्ये हॉवर्ड मार्टिन टेमिन यांचा जन्म झाला ...