(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए ( Center for Disease Control and Prevention, USA)

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए 

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए. : ( स्थापना १९४६ ) मलेरियाच्या परजीवी जीवाणूने यूरोपिअन लोकांच्या बरोबर अमेरिकेत प्रवेश केला ...
सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (Center For Microbiology and Biotechnology Research and Training Institute )

सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 

सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट :  सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही ...
सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी (Centre for cellular and Molecular Biology – CCMB)

सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी

सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी : (स्थापना – १९७७) वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) या केंद्र सरकारच्या  संस्थेच्या अंतर्गत ...
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सिर्कोट)(Central Institute for Research on   Cotton Technology – CIRCOT)

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सिर्कोट) (स्थापना – १९२४)  इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी या संस्थेने टेक्नॉलॉजीकल लॅबोरेटरी या छोट्या ...
सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटऑफ इंडिया, सीएलआरआय (Central Leather Research Institute of India, CLRI)

सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटऑफ इंडिया, सीएलआरआय

सीएलआरआय सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट ( CLRI ) ही  जगातील सर्वांत मोठी चर्म संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना २४ ...
सेंट्रल सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट (Central Soil Salinity Reserch Institute – CSSRI)

सेंट्रल सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट

सेंट्रल  सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट : ( स्थापना – मे, १९६९ )        सेंट्रल  सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूटची ...
सेमेरेद, ई. (Szemeredi, Endre)

सेमेरेद, ई.

सेमेरे, . : (२१ ऑगस्ट, १९४०) हंगेरियन–अमेरिकन गणिती सेमेरेद यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे झाला. तेथील इओट्वोस लॉंरंड विद्यापीठातून (Eötvös Lorand ...
सेल्मन आब्राहम वेस्कमन (Selman Abraham Waksman)

सेल्मन आब्राहम वेस्कमन

वेस्कमन, सेल्मन आब्राहम : (२२ जुलै १८८८ – १६ ऑगस्ट १९७३). युक्रेनमध्ये जन्मलेले अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी मातीतील सूक्ष्मजीवांचे ...
सॉलोमन, सुनीती (Sunita Soloman)

सॉलोमन, सुनीती

सॉलोमन, सुनीती : ( १४ ऑक्टोबर, १९३९ – २८ जुलै,२०१५ ) सुनीती सॉलोमन या पूर्वाश्रमीच्या सुनीती गायतोंडे होत. त्यांचा जन्म चेन्नई ...
सोफिया कव्हल्येव्हस्कइ (Sofya Kovalevskaya)

सोफिया कव्हल्येव्हस्कइ

कव्हल्येव्हस्कइ, सोफिया : (१५ जानेवारी १८५० – १० फेब्रुवारी १८९१) . सोफिया उर्फ सॉन्या कव्हल्येव्हस्कइ. रशियन गणितज्ञ आणि ललित लेखिका ...
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह एंजिनिअर्स, एस.ए.ई. (Society of Automotive Engineers, SAE)

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह एंजिनिअर्स, एस.ए.ई.

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह एंजिनिअर्स, एस... : (स्थापना – सन १९०५, अमेरिका) सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स या संस्थेचे एस. ए. ई. हे ...
स्क्रिप्स रिसर्च  (Scripps Research)

स्क्रिप्स रिसर्च 

स्क्रिप्स रिसर्च : (स्थापना – १९२४) स्क्रिप्स रिसर्च या अमेरिकन संस्थेचा प्रारंभ इलेन ब्राऊनिंग स्क्रिप्स (ऑक्टोबर १९३६- ३ ऑगस्ट १९३२) या ...
स्टार्कवेदर, गॅरी कीथ (Starkweather, Gary Keith)

स्टार्कवेदर, गॅरी कीथ

 स्टार्कवेदर, गॅरी कीथ : (९ जानेवारी, १९३८ ते २६ डिसेंबर, २०१९) स्टार्कवेदर यांचा जन्म अमेरिकेतील मिशिगन राज्यात लॅन्सिंग (Lansing, Michigan) ...
स्टीफन इ. फिन्बेर्ग ( Stephen E. Fienberg)

स्टीफन इ. फिन्बेर्ग

फिन्बेर्ग, स्टीफन इ. :  (२७ नोव्हेंबर १९४२ – १४ डिसेंबर २०१६) जगातील अग्रेसर सामाजिक संख्याशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून स्टीफन फिन्बेर्ग मान्यताप्राप्त ...
स्टीव्हन वाइनबर्ग (Steven Weinberg)

स्टीव्हन वाइनबर्ग

वाइनबर्ग, स्टीव्हन : (३ मे  १९३३  – २३ जुलै २०२१) स्टीव्हन वाइनबर्ग हे एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क ...
स्टुअर्ट ए. रॉबर्टसन (Stuart A. Robertson)

स्टुअर्ट ए. रॉबर्टसन

रॉबर्टसन, स्टुअर्ट ए. : (२८ फेब्रुवारी १९१८ – ४ नोव्हेंबर २००५) अमेरिकेतली सिएटलजवळच्या ग्रेज हार्बर कौंटीतील मॉन्टेसॅनो येथे स्टुअर्ट ए ...
स्टॅनफर्ड मुर (Stanford Moore)

स्टॅनफर्ड मुर

मुर, स्टॅनफर्ड : (४ सप्टेंबर १९१३ — २३ ऑगस्ट १९८२). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रथिनांच्या रेणवीय संरचनेविषयी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल १९७२ सालचे रसायनशास्त्राचे ...
स्टॅनले फाल्कोव (Stanley Falkow)

स्टॅनले फाल्कोव

फाल्कोव, स्टॅनले :  (२४ जानेवारी  १९३४) स्टॅनले फाल्कोव जेकब यांचे बालपण वेगवेगळ्या भाषा, वास आणि रीतीरिवाजांची सरमिसळ असलेल्या वातावरणात व्यतित ...
स्टॅन्ले बेंजामिन प्रूसनर (Stanley Benjamin Prusiner)

स्टॅन्ले बेंजामिन प्रूसनर

प्रूसनर, स्टॅन्ले बेंजामिन :  (२८ मे, १९४२) स्टॅन्ले बेंजामिन प्रूसनर हे अमेरिकन चेतातज्ज्ञ आणि जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतील आयोवा  ...
स्टॅफोर्ड बीअर (Stafford Beer)

स्टॅफोर्ड बीअर

बीअर, स्टॅफोर्ड : (२५ सप्टेंबर, १९२६ – २३ ऑगस्ट, २००२)बीअर स्टॅफोर्ड  यांचा जन्म लंडनमधील पुटनी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण दक्षिण ...