(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

मुहासिबी संप्रदाय (Muhasibi School)

मुहासिबी संप्रदाय

एक इस्लामी संप्रदाय. इस्लामच्या तत्त्वज्ञानानुसार ‘मुहासिबी’ हा संप्रदाय नसून इस्लामचे शुद्ध अंतःकरणाने आचरण करण्याचा उपाय आहे. ‘हिसाब’ म्हणजे हिशोब. मोजदाद ...
मृतात्म्याचे पुस्तक (Book of the Dead)

मृतात्म्याचे पुस्तक

ईजिप्शियन पपायरसांवरील थडग्यांतील सुशोभित हस्तलिखिते. ईजिप्शियन बुक ऑफ द डेड किंवा मृतात्म्याचे पुस्तक म्हणजे काही विशिष्ट मंत्रांचा संग्रह असून तो ...
मृत्युदंड : चर्चची भूमिका (Capital Punishment : The Role of The Church)

मृत्युदंड : चर्चची भूमिका

फाशीची शिक्षा किंवा देहान्त शिक्षा म्हणजे कायद्यातर्फे एखाद्या गुन्हेगार व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावणे होय. गळफास देऊन किंवा विद्युत खुर्चीत बसवून ...
मेन्सियस (Mencius)

मेन्सियस

मेन्सियस : (इ.स.पू.सु. ३७१—सु. २८९). प्रख्यात चिनी तत्त्वज्ञ, कन्फ्यूशसचा अनुयायी व ताओ मताचा पुरस्कर्ता. मेन्सियस हे मंग-ज (आचार्य मंग) या ...
यझत (Yazata)

यझत

पारशी धर्मग्रंथ अवेस्तामध्ये येणारी महत्त्वपूर्ण संकल्पना. यझत हा शब्द अवेस्तन यझ् (संस्कृत यज्) या धातूपासून तयार झाला आहे. त्यामुळे यझत ...
येशू आणि स्त्रीमुक्ती (Jesus and Feminism)

येशू आणि स्त्रीमुक्ती

येशू ख्रिस्त यांच्या काळी पॅलेस्टाईनमधील समाज हा पुरुषप्रधान होता. त्या काळी चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र मानले जात होते ...
येशू ख्रिस्त (Jesus Christ)

येशू ख्रिस्त

येशू ख्रिस्त : (इ. स. पू. सु. ६ – इ. स. सु. ३०). ख्रिस्ती धर्मसंस्थापक. सहाव्या शतकात डायोनिशिअस एक्झीगस (इ ...
येशूची शिकवण व त्याचे दाखले (The Parables of Jesus)

येशूची शिकवण व त्याचे दाखले

प्रभू येशू ख्रिस्त बारा वर्षांचा असताना ‘बार मित्सवा’ म्हणजे ‘आज्ञांचा पुत्र’ या नावाच्या धार्मिक विधीसाठी वल्हांडण सणाच्या दिवशी जेरूसलेमच्या मंदिरात ...
येशूचे चमत्कार (The Miracles of Jesus Christ)

येशूचे चमत्कार

चमत्कार म्हणजे अद्‌भुत घटना. निसर्गाचे नियम किंवा कार्यकारणभाव ज्या घटनांना लागू पडत नाहीत, अशा घटनांना ‘अद्‌भुत’ म्हणजे आश्चर्यकारक म्हणतात. म्हणजे ...
रमजान (Ramjan)

रमजान

मुस्लिम अथवा हिजरी कालगणनेनुसार रमजान हा २९-३० दिवसांचा नववा चांद्रमास. त्याचा रमजान हा शब्द कडक अथवा भाजून होरपळून टाकणारी उष्णता ...
रमजान ईद (Ramjan Eid)

रमजान ईद

ईद उल्-फित्र : हा मुस्लिम धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला ईद उल्-सगीर असेही म्हटले जाते. हिजरी कालगणनेनुसार नवव्या ...
रा (Ra/Re)

रा

प्राचीन ईजिप्शियन सूर्यदेवता. ईजिप्शियन पुराणकथांमध्ये तिचा उल्लेख ‘विश्वनिर्माता’ असा आढळतो. ‘रा’ तसेच ‘री’ असे या देवतेचे उल्लेख आढळतात. ‘रा’ ही ...
राब्बी (Rabbi)

राब्बी

राब्बी या हिब्रू भाषेतील शब्दाचा अर्थ ‘माझा गुरू’ असा आहे. रब्बी, रॅबाई असाही उच्चार याचा केला जातो. सामान्यतः ज्यू (यहुदी) ...
रेन्यो (Rennyo)

रेन्यो

रेन्यो : (४ एप्रिल १४१५—५ मे १४९९). एक जपानी बौद्ध धर्मगुरू. ते जपानच्या क्योटोमधील जोडो शिन्शू या बौद्ध धर्माच्या शाखेचे ...
रॉबर्ट डी नोबिली (Robert de Nobili)

रॉबर्ट डी नोबिली

डी नोबिली, फादर रॉबर्ट : ( १५७७—१६ जानेवारी १६५६ ). ख्रिस्ती धर्मप्रसारक. फादर डी नोबिली हे मूळचे इटलीचे रहिवासी. रोममधील ...
लाओ-त्झू (Lao-tzu)

लाओ-त्झू

लाओ-त्झू : (इ. स. पू. सु. ६०४ — इ. स. पू. सु. ५३१). चिनी तत्त्वज्ञानातील महान आचार्य. लाव् ज या ...
वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस (World Council of Churches - WCC)

वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस

प्रॉटेस्टंट, अँग्लिकन, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स इत्यादी २५० हून अधिक ख्रिस्तमंडळे (चर्चेस) अंतर्भूत असलेली आंतरराष्ट्रीय संघटना. जगातील विविध ख्रिस्तमंडळांमध्ये परस्परसामंजस्य, सहकार्य आणि ...
वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस ऑफ इंडिया : प्रॉटेस्टंट (WCC Of India : Protestant)

वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस ऑफ इंडिया : प्रॉटेस्टंट

प्रत्येक धर्म हा काही मुख्य तत्त्वांवर आधारित असतो. त्याला आध्यात्मिक अधिष्ठान असते. प्रत्येक धर्मात दोन किंवा त्याहून जास्त पंथ असू ...
वाय. एम. सी. ए. (YMCA)

वाय. एम. सी. ए.

वाय.एम.सी.ए. हे ‘यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन’ ह्या संघटनेचे लघुरूप होय. इंग्लंडमध्ये जॉर्ज विल्यम्स नावाच्या एका तरुणाने १८४४ साली तिची स्थापना ...
वाय. डब्ल्यू. सी. ए. (YWCA)

वाय. डब्ल्यू. सी. ए.

एक ख्रिस्ती संघटना. ‘यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन’ हे ह्या संघटनेचे संपूर्ण नाव. ख्रिस्ती धर्मातील कोणत्याही विशिष्ट पंथाची ती नाही. पंथ, ...