(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

विवाहसंस्कार, ख्रिस्ती (Christian Marriage Rites)

विवाहसंस्कार, ख्रिस्ती

विवाहसंस्कार हा ख्रिश्चन धर्मातील सात संस्कारांपैकी एक. विवाहसंस्कार हा महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाहाविषयी ख्रिस्तसभेने कायदे केले; तसेच शासनानेही केलेले ...
वीरकोचा (Viracocha)

वीरकोचा

वीरकोचा हा पेरू देशातील अ‍ॅंडीज पर्वतप्रदेशातील संस्कृतीतील श्रेष्ठ देव आहे. तसेच इंका संस्कृतीच्या देवतासमूहातीलही हा अत्यंत  महत्त्वाचा श्रेष्ठ देव. त्याच्या नावाचा अर्थ ...
व्हॅटिकन (Vatican)

व्हॅटिकन

पोप ह्यांचे अधिकृत निवासस्थान, ‘व्हॅटिकन पॅलेस’, व्हॅटिकन सिटी. रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मप्रमुख पोप ह्यांचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय. येशू ...
व्हॅटिकन परिषद, द्वितीय (Second Vatican Council)

व्हॅटिकन परिषद, द्वितीय

व्हॅटिकन विश्वपरिषद म्हणजे व्हॅटिकन सिटीत भरलेली कॅथलिक धर्मपरिषद. पहिली व्हॅटिकन परिषद १८६९-७० साली संपन्न झाली. आजपर्यंत व्हॅटिकन सिटीत दोनच धर्मपरिषदा ...
शू (Shu)

शू

प्राचीन ईजिप्शियन देव. बाष्परहित हवा व वातावरण यांचा अधिष्ठाता. शू या नावाचा मूलार्थ पोकळी किंवा रितेपण असा होय. शूला नाईल ...
संत ऑगस्टीन (St. Augustine)

संत ऑगस्टीन

ऑगस्टीन, संत : (१३ नोव्हेंबर ३५४—२८ ऑगस्ट ४३०). एक ख्रिस्ती संत. ‘हिप्पोचा ऑगस्टीन’ ह्याचा जन्म उत्तर आफ्रिकेमध्ये सध्याच्या अल्जेरिया प्रांतातील ...
संत गोन्सालो गार्सिया (St. Gonsalo Garcia)

संत गोन्सालो गार्सिया

गार्सिया, संत गोन्सालो : ( १५५७ – ५ फेब्रुवारी १५९७ ). भारतातील पहिले रोमन कॅथलिक संत. ते १८६२ या वर्षी ...
संत गोन्सालो गार्सिया तीर्थक्षेत्र, वसई किल्ला (St. Gonsalo Garcia Church, Vasai Fort)

संत गोन्सालो गार्सिया तीर्थक्षेत्र, वसई किल्ला

संत गोन्सालो गार्सिया चर्च, वसई किल्ला. फादर फ्रान्सिस झेव्हिअर नावाचा एक येशू संघीय (जेज्वीट) धर्मप्रचारक सोळाव्या शतकाच्या मध्यावर भारतात आला ...
संत जॉन दि बॅप्टिस्ट (St. John the Baptist)

संत जॉन दि बॅप्टिस्ट

जॉन दि बॅप्टिस्ट, संत : (इ. स. पू. सु. ४ थे शतक — इ. स. सु. २८–३६). ज्यू (यहुदी) प्रेषित, ...
संत जॉन पॉल, दुसरे (St. John Paul II)

संत जॉन पॉल, दुसरे

पॉल, संत जॉन दुसरे : (१८ मे १९२० — २ एप्रिल २००५). रोमचे बिशप आणि रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख (१९७८–२००५) ...
संत जॉन, तेविसावे (St. John XXIII)

संत जॉन, तेविसावे

जॉन पोप, तेविसावे : (२५ नोव्हेंबर १८८१ — ३ जून १९६३). सर्वांत लोकप्रिय पोपपैकी एक. त्यांचा जन्म इटलीतील सोतो एल ...
संत थॉमस (St. Thomas)

संत थॉमस

थॉमस, संत : (?— इ. स. सु. ५३). येशू ख्रिस्ताच्या १२ अनुयायांपैकी एक. थॉमस यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही ...
संत थॉमस बेकेट (St. Thomas Becket)

संत थॉमस बेकेट

बेकेट, संत थॉमस : ( २१ डिसेंबर १११८ — २९ डिसेंबर ११७० ). एक ख्रिस्ती संत, राज्याचा प्रमुख अधिकारी, कँटरबरीचा ...
संत पॉल (St. Paul)

संत पॉल

पॉल, संत : (सु. ५—सु. ६७). ख्रिस्ती प्रेषित, विशेषत: बिगर यहुदी समाजाचे प्रेषित (Apostle of the Gentiles) म्हणून संत पॉल ...
संत फ्रान्सिस झेव्हिअर (St. Francis Xavier)

संत फ्रान्सिस झेव्हिअर

झेव्हिअर, संत फ्रान्सिस : (७ एप्रिल १५०६—३ डिसेंबर १५५२). भारतात व जपानमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य करणारे प्रख्यात स्पॅनिश जेज्वीट (जेझुइट) ...
संत फ्रान्सिस झेव्हिअरचे शव, गोवा (Body of St. Francis Xavier)

संत फ्रान्सिस झेव्हिअरचे शव, गोवा

संत फ्रान्सिस झेव्हिअर यांचे शव एक ख्रिस्ती धार्मिक स्थळ. कॅथलिक व्रतस्थ संघांमध्ये जो ‘जेज्वीट संघ’ उदयाला आला त्याचा संस्थापक संत ...
संत बर्नार्ड (St. Bernard of Clairvaux)

संत बर्नार्ड

संत बर्नार्ड : (? १०९० — २० ऑगस्ट ११५३). क्लेअरव्हो या ख्रिस्ती मठाचे संस्थापक आणि पाश्चात्त्य मठवासीय पद्धतींत चैतन्य आणणाऱ्यांपैकी ...
संत योहान यांचा सण (St. John's Fest)

संत योहान यांचा सण

संत योहान यांच्या सणाच्या पूर्वसंध्येला केला जाणारा एक प्राचीन विधी नाताळ (ख्रिस्मस) व ईस्टर या सणांप्रमाणेच जगभर कॅथलिक समाजात संत ...
संदेष्टे, जुन्या करारातील (The Prophets of The Old Testament)

संदेष्टे, जुन्या करारातील

यहुदी (ज्यू) धर्मग्रंथ तनक ह्या नावाने ओळखला जातो. त्यामध्ये ‘तोरा’ (नियमशास्त्र), ‘नबीईम’ (संदेष्ट्यांचे ग्रंथ) आणि ‘केतुबीम’ (इतर साहित्य) ह्यांचा समावेश ...
सद्‌गुण (Goodness)

सद्‌गुण

‘गुण’ या शब्दाला ‘सत्’ हा उपसर्ग लावून ‘सद्गुण’ हा शब्द बनतो. ‘सत्’ शब्द अस्तित्व, साधुत्व किंवा चांगलेपणा आणि प्रशस्त या ...