भाग १ : अंकुरण ते ग्लुकोज
डॉ. जयंत नारळीकर
प्रस्तावना

अंकुरण ते ग्लुकोज

विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग पहिला अंकुरण ते ग्लुकोज (सु. २८३ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.

जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.

अ‍ॅलोपॅथी (Allopathy)

अ‍ॅलोपॅथी

आरोग्य राखणे, रोगांना व रोगप्रसाराला प्रतिबंध करणे व रोगांवर उपचार करणे या माणसाच्या आदिम काळापासून गरजा आहेत. त्यासाठी निरनिराळ्या समाजांत ...
आकारविज्ञान (Morphology)

आकारविज्ञान

जीवशास्त्राची एक शाखा. सजीवांचा तपशीलवार अभ्यास करण्याकरिता असलेल्या सैद्धांतिक शाखांपैकी एक. पूर्वी या शाखेत सजीवांचा आकार, स्वरूप व संरचना यांचा ...
आघाडा (Prickly chafflower)

आघाडा

पाने व फुलो-यासह आघाडा ही वर्षायू ओषधी अ‍ॅमॅरॅंटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅचिरँथस अ‍ॅस्पेरा आहे. ही वनस्पती सर्वत्र (समुद्रसपाटीपासून सु ...
आतडे (Intestine)

आतडे

आतडे : पाहा आंत्र ...
आंतरदेहगुही संघ (Coelenterata)

आंतरदेहगुही संघ

आंतरदेहगुही संघ अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सु. ९,००० जाती आहेत. हे प्राणी बहुपेशीय आणि द्विस्तरी असतात. त्यांचे शरीर ...
आत्मप्रतिरक्षा रोग (Autoimmune disease)

आत्मप्रतिरक्षा रोग

शरीराच्या प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक) प्रणालीमध्ये प्रामुख्याने रक्तातील पांढर्‍या पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. लसिका पेशी (एक प्रकारच्या पांढर्‍या पेशी) व ...
आंत्र (Intestine)

आंत्र

मानवी पचनसंस्था जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या भागाला आंत्र (आतडे) असे म्हणतात. अन्नपचनमार्गातील हा सर्वात लांब भाग आहे. आतड्याचे लहान आतडे (लघ्वांत्र) ...
आंत्रज्वर (Typhoid)

आंत्रज्वर

आंत्रज्वर : पहा विषमज्वर ...
आदिजीव संघ (Protozoa)

आदिजीव संघ

आदिजीव संघातील काही प्राणी सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्वप्रथम हे प्राणी निर्माण झाले. हे प्राणी अत्यंत सूक्ष्म व एकपेशीय ...
आनुवंशिक विकृती (Genetic disorder)

आनुवंशिक विकृती

गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकांमधील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे आनुवंशिक विकृती. गुणसूत्रांच्या संख्येत किंवा संरचनेत बदल झाल्याने या विकृती उद्भवतात ...
आनुवंशिकता (Heredity)

आनुवंशिकता

एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही ...
आनुवंशिकताविज्ञान (Genetics)

आनुवंशिकताविज्ञान

सजीवांमधील  गुणधर्म एका पिढीमधून दुसर्‍या पिढीत कसे उतरतात, याचा सामान्यपणे आणि जनुकांचा विशेषकरून अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा. या शाखेला ...
आपटा (Bauhinia racemosa)

आपटा

आपट्याची फांदी आपटा फॅबेसी कुलामधील बौहीनिया  प्रजातीतील शेंगा देणारे, भरपूर व लोंबत्या फांद्यांचे, वेडेवाकडे वाढणारे लहान झाड आहे. याचे शास्त्रीय नाव बौहीनिया रॅसिमोजा आहे ...
आंबा (Mango)

आंबा

आंब्याचा मोहोर आंबा हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मॅँजिफेरा इंडिका आहे. भारतात आंब्याची लागवड सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून होत ...
आम्लवर्षण (Acid precipitation)

आम्लवर्षण

आम्लवर्षण आधुनिक काळातील एक पर्यावरणीय समस्या. कोरड्या किंवा शुष्क स्वरूपातील आम्लकणांचे वातावरणातून भूपृष्ठावर होणारे निक्षेपण. सर्वसामान्यपणे आम्लपर्जन्य (अ‍ॅसिड रेन) म्हणून ओळखले ...
आयुःकाल (Life-span)

आयुःकाल

सजीवाचा जन्म आणि मृत्यू यांदरम्यानचा कालावधी म्हणजे सजीवाचा आयुःकाल. जीवविज्ञानाच्या व्याख्येनुसार सजीवाचा आयुःकाल हा गर्भधारणा ते मृत्यू यांदरम्यानचा कालावधी असे ...
आयुर्वेद (Ayurved)

आयुर्वेद

भारतात प्राचीन काळी विकसित झालेले आयुष्याबद्दलचे ज्ञान व त्याच्या उपयोगाने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. प्राथमिक स्वरूपाचा ...
आरारूट (Arrowroot)

आरारूट

आरारुट वनस्पती व्यापारी क्षेत्रात आरारूट हे नाव एका प्रकारच्या खाद्य पिठाला दिले आहे. हे विविध वनस्पतींपासून तयार करतात. त्यांपैकी भारतात ...
आरोग्यविज्ञान (Hygiene)

आरोग्यविज्ञान

आरोग्यपूर्ण जगण्याचे विज्ञान म्हणजे आरोग्यविज्ञान. आरोग्य ही प्रतिबंधात्मक व रक्षणात्मक संकल्पना आहे. त्यासाठी नेहमी आचरणात आणण्याच्या सर्व बाबी व पद्धतींचा ...
आरोही वनस्पती (Climbers)

आरोही वनस्पती

आरोही वेल काही लांब, पातळ आणि लवचिक खोडे असलेल्या वनस्पती वाढीसाठी इतर वनस्पतींच्या, खडकाच्या किंवा इतर आधाराच्या मदतीने वर चढतात ...