भाग १ : अंकुरण ते ग्लुकोज
डॉ. जयंत नारळीकर
प्रस्तावना

अंकुरण ते ग्लुकोज

विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग पहिला अंकुरण ते ग्लुकोज (सु. २८३ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.

जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.

आर्द्रभूमी परिसंस्था (Wetland ecosystem)

आर्द्रभूमी परिसंस्था

आर्द्रभूमी परिसंस्था भूमी आणि जलाशय यांच्या संक्रमण पट्ट्यातील परिसंस्था. भौमिक आणि जलीय प्रणालींच्या संक्रमण भागातील साधारणपणे जलपृष्ठाजवळ किंवा जलपृष्ठाइतकी जलपातळी ...
आलर्क रोग (Rabies)

आलर्क रोग

आलर्क रोगाचे प्रसारक आलर्क हा मानवाला आणि सस्तन प्राण्यांना विषाणूमुळे (व्हायरसमुळे) होणारा एक संसर्गजन्य, जीवघेणा रोग आहे. काही प्राण्यांच्या (उदा., ...
आले (Ginger)

आले

आले (मुळक्षोड) आले हे त्याच नावाच्या लहान बहुवर्षायू ओषधीचे मूलक्षोड (जमिनीलगत आडवे वाढणारे मांसल खोड) आहे. हे मूलक्षोड (आल्याचे गड्डे) ...
आल्पीय वनस्पती (Alpine plants)

आल्पीय वनस्पती

आल्पीय वनस्पती पर्वतावरील वृक्षरेषेहून अधिक उंचीच्या प्रदेशात वाढणार्‍या वनस्पती. उंच पर्वताच्या शिखराकडे वर जाताना आणि ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना वृक्षरेषेपुढील क्षेत्रात ...
आवळी (Indian gooseberry)

आवळी

फायलँथॅसी कुलातील आवळी हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधात, वनामध्ये किंवा लागवडीखाली वाढतो. त्याचे शास्त्रीय नाव एंब्लिका ऑफिसिनॅलिस आहे ...
आहार (Diet)

आहार

आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्नपदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयस्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक ...
इन्फ्ल्यूएंझा (Influenza)

इन्फ्ल्यूएंझा

इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ...
इन्शुलीन (Insulin)

इन्शुलीन

शरीरातील शर्करेच्या आणि इतर पोषकद्रव्यांच्या वापरावर नियमन राखणारे एक संप्रेरक. हे संप्रेरक कमी पडल्यास मधुमेह हा विकार होतो. स्वादुपिंड ही ...
उंट (Camel)

उंट

उंट उंट हा आर्टिओडॅक्टिला गणामधील (समखुरी प्राणीगणातील) कॅमेलिडी कुलातील सस्तन प्राणी आहे. त्याच्या दोन जाती आहेत: (१) एक मदारीचा कॅमेलस ड्रोमेडेरियस नावाचा ...
उंडी (Alexandrian laurel)

उंडी

एक शोभिवंत व सदापर्णी वृक्ष. ही वनस्पती क्लुसिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅलोफायलम इनोफायलम आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील पूर्व व ...
उडीद (Black gram)

उडीद

उडीद एक कडधान्य. उडीद ही वर्षायू व शिंबावंत (शेंगा येणारी) वेल फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना मुंगो आहे. ही वनस्पती ...
उत्क्रांती (Evolution)

उत्क्रांती

उत्क्रांती म्हणजे क्रमविकास. जीवसृष्टीत अविरत घडत राहणारी बदल-प्रक्रिया. या प्रक्रियेतून लाखो वर्षांच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती ...
उत्परिवर्तन (Mutation)

उत्परिवर्तन

सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल म्हणजेच उत्परिवर्तन. उत्परिवर्तनामुळे जनुकांमध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्यांच्या विशिष्ट ...
उत्सर्जन (Excretion)

उत्सर्जन

शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घातक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया. सर्व सजीवांमध्ये उत्सर्जन घडून येत असते. एकपेशीय सजीवांमध्ये ...
उंदीर (Mouse, Rat)

उंदीर

उंदीर उंदीर हा स्तनी वर्गामधील कृंतक गणातील मोठ्या संख्येने आढळणारा प्राणी आहे. जगभर उंदराच्या १३७ प्रजाती आहेत. खार, बीव्हर, गिनीपिग,  ...
उन्हाळे लागणे (Strangury)

उन्हाळे लागणे

वारंवार, थेंबथेंब आणि वेदनायुक्त मूत्रोत्सर्ग होणे आणि मूत्रमार्गाची जळजळ होणे या लक्षणांच्या समुच्चयाला ‘उन्हाळे लागणे’ म्हणतात. मूत्राशय आणि मूत्रनलिकेचे स्नायू ...
उंबर (Country fig)

उंबर

उंबर वड, पिंपळ, अंजीर इ. वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा सदापर्णी वृक्ष आहे. याला संस्कृतमध्ये ‘औदुंबर’ हे नाव आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, ...
उभयचर वनस्पती (Bryophyta)

उभयचर वनस्पती

उभयचर वनस्पती : पाहा शेवाळी वनस्पती ...
उभयचर वर्ग (Amphibia)

उभयचर वर्ग

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटातील एक वर्ग. हे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. तसेच यांच्या बाल्यावस्था जलचर असून प्रौढावस्था भूचर ...
उभयलिंगी (Hermaphrodite)

उभयलिंगी

ज्या सजीवांमध्ये प्रजननासाठी केवळ पुं-जननेंद्रिय असणारे (नर) आणि स्त्री-जननेंद्रिय असणारे (मादी) असे दोन गट असतात, त्या सजीवांना एकलिंगी म्हणतात. मात्र, ...