विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयेत सदोदित भर टाकत आहे. परंतु प्रचंड वेगाने पुढे जाणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे, तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी कधी धोक्याचे ठरत आहे. हवामान बदल, पर्यावरणातील जागतिक तापन, जैविक संरक्षण व संवर्धन, कचरा व्यवस्थापन इत्यादींच्या अनुषंगाने शाश्वत विकास व ‘अजेंडा-२१’ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्त्वाच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ या खंडाचा १९५ नोंदींचा चौथा भाग (लिंबू ते ज्ञानेंद्रिये) आता मराठी विश्वकोश कुमारांसाठी घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मित करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना घडणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह विश्वसनीय आणि रोचक स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
(क्लायमेट चेंज). पृथ्वीच्या वातावरणात होत असलेले बदल, तसेच वातावरण आणि पृथ्वीच्या भूशास्त्रीय, रासायनिक, जैवभौगोलिक घटक यांच्यातील आंतरक्रियांमुळे होत असलेले बदल, ...
(बोन्स). हाडे म्हणजेच अस्थी. पृष्ठवंशी प्राण्यांच्या सांगाड्यातील हा अविभाज्य घटक असतो. हाडांमुळे शरीराला आधार आणि विशिष्ट आकार मिळतो, शरीरातील इंद्रियांचे ...
(ॲसाफेटिडा/डेव्हिल्स डंग). दैनंदिन मसाल्यातील एक आवश्यक घटक. हिंग हा पदार्थ जगाच्या वेगवेगळ्या भागांत मसाल्यासाठी वापरला जातो. एपिएसी (अंबेलिफेरी) कुलातील फेरूला ...
(मलेरिया). सूक्ष्मजीवांमुळे होणारा आणि डासांद्वारे प्रसार होणारा एक संक्रामक रोग. प्लास्मोडियम प्रजातीच्या एकपेशीय, परजीवी सूक्ष्मजीवांमुळे हिवताप होतो. हिवताप मनुष्याला तसेच ...
(हार्ट). शरीरातील अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय. बहुसंख्य प्राण्यांमध्ये हृदय हे स्नायूंनी बनलेले इंद्रिय आहे. या इंद्रियाचे सतत स्पंदन म्हणजेच आकुंचन आणि ...
समुद्रातील मोठ्या माशांचे अन्न म्हणून परिचित असलेला मासा. हेरिंग माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिडी कुलात होतो. त्यांच्या क्लुपिया ...
निसर्गनियमांवर आधारलेली एक वैद्यकीय उपचारपद्धती किंवा वैद्यकीय शाखा. होमिओपॅथी पद्धतीला ‘समचिकित्सा पद्धती’ असेही म्हणतात. या उपचारपद्धतीचे सूत्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ ...