विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयेत सदोदित भर टाकत आहे. परंतु प्रचंड वेगाने पुढे जाणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे, तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी कधी धोक्याचे ठरत आहे. हवामान बदल, पर्यावरणातील जागतिक तापन, जैविक संरक्षण व संवर्धन, कचरा व्यवस्थापन इत्यादींच्या अनुषंगाने शाश्वत विकास व ‘अजेंडा-२१’ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्त्वाच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ या खंडाचा १९५ नोंदींचा चौथा भाग (लिंबू ते ज्ञानेंद्रिये) आता मराठी विश्वकोश कुमारांसाठी घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मित करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना घडणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह विश्वसनीय आणि रोचक स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
(एक्स-रे : डायग्नोसिस अँड थेरपी). क्ष-किरण हे उच्च ऊर्जेचे, भेदनक्षम आणि अदृश्य विद्युतचुंबकीय तरंग आहेत. क्ष-किरणांचा शोध व्हिल्हेल्म कोनराट राँटगेन ...
(ट्युबरक्युलॉसिस). एक संसर्गजन्य रोग. प्राचीन काळापासून मनुष्याला क्षयरोग होत असल्याचे म्हटले जाते. क्षयरोग हा मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस या सूक्ष्म जीवाणूंमुळे होतो ...
(इंडियन कर्सर). क्षिप्रचला हा पक्षी कॅरॅड्रिफॉर्मिस पक्षिगणाच्या ग्लेरिओलिडी कुलातील असून याचा आढळ भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांत तसेच आफ्रिका खंडातील ...
(ॲनॉरेक्सिया). एक भावनात्मक विकार. या विकारामध्ये रुग्ण अन्न किंवा आहार यांना नकार देतो किंवा अन्नग्रहण करण्याचे टाळतो. प्रामुख्याने पौगडांवस्थेतील किंवा ...
(सेन्सेस). पर्यावरणीय बदलांचे ज्ञान व्हावे आणि त्यातून पोषण, प्रजनन व संरक्षण या कार्यांमध्ये मदत व्हावी, या उद्देशाने प्राण्यांमध्ये विकसित झालेल्या ...
(सकर फिश/शार्कसकर). समुद्राच्या पाण्यात आढळणारा अस्थिमत्स्य वर्गाच्या एकिनीफॉर्मिस गणाच्या एकिनिइडी कुलातील मासा. लुचुक मासे उष्ण प्रदेशातील सर्व समुद्रात आढळतात. त्यांच्या ...
स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या लेमुरिडी कुलात लेमूर प्राण्यांचा समावेश होतो. ते फक्त मादागास्कर आणि त्यालगतच्या कोमोरो बेटांवर आढळतात. मोठ्या संख्येने ...
(सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन). शरीरसंबंधातून पारेषित होणारे संक्रामण. याचा लैंगिक पारेषित रोग किंवा गुप्तरोग असाही उल्लेख केला जातो. लैंगिक पारेषित संक्रामण ...
(इन्फर्टिलिटी). प्रजनन करण्याची असमर्थता. सूक्ष्मजीवांपासून ते वनस्पती, प्राणी, मानवापर्यंत सर्व प्रकारांच्या सजीवांसाठी वंध्यत्व ही संज्ञा लागू होते. एखाद्या वनस्पतीला अविकसित ...
(फॉरेस्ट इकोसिस्टिम). पृथ्वीवरील एक व्यापक आणि प्रभावी परिसंस्था. कोणत्याही परिसंस्थेत सजीवांचा आणि अजैविक घटकांचा म्हणजेच हवा, पाणी, मृदा यांचा समुदाय ...
(फॉरेस्ट काँझर्व्हेशन). मानवाच्या भावी पिढ्यांच्या गरजांच्या शाश्वत पूर्ततेसाठी, त्यांच्या हितासाठी वनक्षेत्रांचे केले जाणारे नियोजन व व्यवस्थापन म्हणजे वन संधारण. वन ...
(व्हेजिटेशन). एखाद्या लहान किंवा मोठ्या क्षेत्रावर असलेल्या सर्व वनस्पतींच्या समूहाला ‘वनश्री’ म्हणतात. जसे, गोड्या पाण्यातील सर्व वनस्पतींच्या समूहाला क्षेत्राच्या प्रकारानुसार ...
(बॉटनी). जीवविज्ञानाची एक शाखा. या शाखेत वनस्पतींचा अभ्यास केला जातो. या अभ्यासात वनस्पतींची रचना, त्यांचे गुणधर्म व वर्गीकरण, त्यांच्या जैवरासायनिक ...
(हर्बेरियम). शास्त्रीय अभ्यासाकरिता जतन करून ठेवण्यात येणारा वनस्पतींचा संग्रह. वनस्पतिसंग्रह तयार करण्यासाठी निसर्गातून वनस्पतींचे नमुने जमा केले जातात. या नमुन्यांची ...
(प्लांट किंग्डम). सजीवांच्या पंचसृष्टीपैकी एक सृष्टी. सजीवांचे वर्गीकरण मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, वनस्पती आणि प्राणी या पंचसृष्टीत केले जाते. वनस्पतिसृष्टीत सर्व ...