(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations)

संयुक्त राष्ट्रसंघ

पार्श्वभूमी : संयुक्त राष्ट्रसंघ ही विविध देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने तिची स्थापना ...
सर क्लॉड ऑकिन्‌लेक (Sir Claude Auchinleck)

सर क्लॉड ऑकिन्‌लेक

ऑकिन्‌लेक, फील्ड मार्शल सर क्लॉड : (२१ जून १८८४ ‒ २३ मार्च १९८१). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी व स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय सैन्याचा सरसेनापती ...
संरक्षण अर्थशास्त्र (Defence Economics)

संरक्षण अर्थशास्त्र

व्याख्या व स्वरूप : ‘संरक्षण अर्थशास्त्र’ ही तुलनेने अर्थशास्त्राची एक नव विकसित विद्याशाखा आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांत, तत्त्वे व साधने यांच्या ...
संरक्षण आणि विकास, भारतातील (Defence and Development in India)

संरक्षण आणि विकास, भारतातील

पार्श्वभूमी : कोणत्याही अर्थव्यवस्थेत संसाधने मर्यादित आणि गरजा अमर्यादित असतात. त्यामुळेच संसाधनांचे योग्य व संतुलित वाटप कसे करायचे, हा आर्थिक ...
सागर (Security and Growth for All in the Region)

सागर

हिंदी महासागर संलग्न प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास. हिंदी महासागराच्या किनारी भागातील जवळपास ४० राष्ट्रांमध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या ४०% लोकसंख्या ...
सागरी कायदा करार (The International Law of the Sea)

सागरी कायदा करार

संयुक्त राष्ट्र सागरी कायदा करार किंवा सागरी कायदा करार एक आंतरराष्ट्रीय करार आहे. ज्या अंतर्गत देशांच्या सागरी व महासागरी क्षेत्राच्या ...
सागरी सीमा कायदा (The Law of The Sea)

सागरी सीमा कायदा

पार्श्वभूमी : जमिनीवरील सीमा आखता येतात आणि दिसतातही; पण सागरी सीमा अधोरेखित करणे हे कठीण काम असते आणि त्यातून आंतरराष्ट्रीय ...
सामरिकशास्त्र (Military Science)

सामरिकशास्त्र

स्वरूप आणि गृहीते : प्रस्तावना : सामरिकशास्त्राच्या अभ्यासाचा रोख हा प्रामुख्याने लष्करी शक्तीच्या वापरावर असतो. मात्र सामरिकशास्त्राची व्याप्ती ही लष्करी ...
सार्क (Saarc)

सार्क

सार्क (SAARC –  दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य परिषद). पार्श्वभूमी : दक्षिण आशियाई देशांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली संघटना. या देशांनी ...
सुभेदार जोगिंदर सिंग (Subhedar Joginder Singh)

सुभेदार जोगिंदर सिंग

सिंग, सुभेदार जोगिंदर : (२८ सप्टेंबर १९२१‒२३ ऑक्टोबर १९६२). भारतीय लष्करातील एक शूर व पराक्रमी सुभेदार आणि परमवीरचक्र या सर्वोच्च शौर्य पदकाचे मरणोत्तर मानकरी. त्यांचा जन्म ...
सॅम माणेकशा (Sam Manekshaw)

सॅम माणेकशा

माणेकशा, सॅम होरमसजी फ्रामजी जमशेदजी : (३ एप्रिल १९१४—२७ जून २००८). स्वतंत्र भारताच्या संरक्षणदलाचे पहिले फील्डमार्शल. जन्म अमृतसर येथे. शेरवूड ...
सॅम माणेकशा (Sam Manekshaw)

सॅम माणेकशा

माणेकशा, सॅम होरमसजी फ्रामजी जमशेदजी : (३ एप्रिल १९१४—२७ जून २००८). स्वतंत्र भारताच्या संरक्षणदलाचे पहिले फील्डमार्शल. जन्म अमृतसर येथे. शेरवूड ...
सेला-बोमदिलाची लढाई (Battle of Sela-Bomdila)

सेला-बोमदिलाची लढाई

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : २० ऑक्टोबर १९६२ रोजी तवांग विभागातील नामकाचू नदी ओलांडून चिनी सैन्याचे आक्रमण लोहित आणि ...
हर्षवर्धन (Harshavardhan)

हर्षवर्धन

हर्षवर्धन, सम्राट : (इ.स. कार. ६०६ ‒ ६४७). इ.स. ४६७ साली गुप्त घराण्यातील एक कर्तृत्ववान राजा स्कंदगुप्त मरण पावला. त्यानंतर ...
हवाई परिवहन कारवाया (Air Transportation Operations)

हवाई परिवहन कारवाया

विषयप्रवेश : राष्ट्राची हवाई परिवहन क्षमता देशाच्या एकूण हवाई शक्तीचे अभिन्न अंग असून देशाच्या सुरक्षिततेसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. देशाची ...
हवाई सामर्थ्य (Air Power)

हवाई सामर्थ्य

प्रस्तावना : वायू आणि अवकाश यांतील अतिसूक्ष्म सीमारेषा पाहता हवाई सामर्थ्यांतर्गत अवकाशाचाही समावेश केला जातो. देशाची विमानचालनातील (Aerial Navigation) आणि ...
हवाई सुरक्षा (Air Defence)

हवाई सुरक्षा

आकाशातून विमाने वा तत्सम आकाशस्थ यंत्रणेद्वारे होणाऱ्या शत्रूच्या हवाई हल्ल्याचा बचाव करणारी यंत्रणा वा व्यवस्था म्हणजे हवाई सुरक्षा होय. संरक्षणाची ...
हवाई सुरक्षा तोफखाना (Air Defence Artillery)

हवाई सुरक्षा तोफखाना

पार्श्वभूमी : पहिल्या महायुद्धानंतर लष्करी विमाने मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. ही विमाने टेहळणीसाठी, शत्रूच्या शहरांवर, सैन्यावर आणि सैन्याच्या शस्त्र आणि ...
हवाई हस्तक्षेप (Interdiction)

हवाई हस्तक्षेप

विषय प्रवेश :  हवाई शक्तीचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिचे सर्वगामित्व. त्यामुळे तिचा वापर केवळ प्रत्यक्ष युद्धभूमीवरच नव्हे, तर शत्रूचे ...
हवाई-अवकाश सामरिक कारवाया (Aerospace Operations)

हवाई-अवकाश सामरिक कारवाया

राष्ट्रीय सुरक्षतेच्या दृष्टीने सैन्यदलांना देशावर होणाऱ्या शत्रूच्या कोणत्याही हल्ल्यांवर प्रतिबंध घालता आला पाहिजे. त्याचबरोबर आक्रमक कारवायांद्वारे शत्रूचे सामरिक बळ खच्ची ...