(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

काचेचे छत (Glass Ceiling)

काचेचे छत

पात्रता असूनही स्त्रिया आणि अल्पसंख्यांक यांच्या प्रगतीत येणारे अदृश्य अडथळे काचेचे छत या संज्ञेने नमूद केले जातात. वास्तूशास्त्रात ग्लास सिलिंगचा ...
कार्बन पतगुणांक (Carbon Credit)

कार्बन पतगुणांक

एखाद्या उद्योजकाला उत्पादन घेताना ठराविक प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साईड व इतर हरितगृह वायू उत्सर्जित करण्यास देण्यात येणारी परवानगी. कार्बन पतगुणांक या ...
काळा पैसा (Black Money)

काळा पैसा

अवैधरित्या गोळा केलेला असा पैसा की, ज्याची शासनदरबारी कोणतीही नोंद नसते. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने २०१२ मध्ये काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काळ्या ...
कॅपिटल इन ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरी (Capital in Twenty First Century)

कॅपिटल इन ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरी

एक प्रसिद्ध अर्थशास्त्रीय ग्रंथ. कॅपिटल इन ट्वेन्टी-फर्स्ट सेंचुरी या ग्रंथाचे लेखक फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी असून त्यांनी हा ग्रंथ २०१३ ...
केंद्रपुरस्कृत योजना (Centrally Sponsored Scheme)

केंद्रपुरस्कृत योजना

केंद्रशासन व राज्यशासन यांमधील वित्तीय असंतुलन हे केंद्रीय वित्त आयोगाद्वारे सोडविले जाते. केंद्रशासनाद्वारे केंद्रीय कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जाऊन ...
केनेथ जोसेफ ॲरो (Kenneth Joseph Arrow)

केनेथ जोसेफ ॲरो

ॲरो, केनेथ जोसेफ (Arrow Kenneth Joseph) : (२३ ऑगस्ट १९२१ – २१ फेब्रुवारी २०१७). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा ...
केन्स, जॉन नेव्हिल (John Neville Keynes)

केन्स, जॉन नेव्हिल

केन्स, जॉन नेव्हिल (John Neville Keynes) : ( ३१ ऑगस्ट १८५२ – १५ नोव्हेंबर १९४९ ). प्रसिद्ध ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ, अर्थतशास्त्रज्ञ ...
केळकर समिती (Kelkar Committee)

केळकर समिती

समतोल प्रादेशिक विकासाच्या समस्यांचा आढावा घेऊन राज्यातील मागास प्रदेशांना विकासाचा मार्ग दाखविण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेली एक उच्चस्तरीय समिती. एकूण ...
कॉबवेब प्रमेय (Cobweb Theorem)

कॉबवेब प्रमेय

प्रामुख्याने कृषी वस्तूंचे उत्पादन व त्यांच्या किमतींसंबधित व्यापारचक्रांचे स्पष्टीकरण करणारे एक प्रमेय. प्रसिद्ध अर्थसास्त्रज्ञ निकोलस कॅल्डॉर यांनी प्रमेयाच्या वैशिष्ट्यपूर्ण आकृत्या ...
कॉमेकॉन (Comecon)

कॉमेकॉन

पश्चिम यूरोपात, यूरोपियन आर्थिक सहकार समिती निर्मित सोव्हिएट युनियनच्या अंतर्गत जानेवारी १९४९ मध्ये कॉमेकॉनची स्थापना करण्यात आली. कॉमेकॉन समुहात तत्कालीन ...
कोअर बँकिंग (Core Banking)

कोअर बँकिंग

भारतीय बँकिंग प्रणालीत वापरण्यात आलेले सर्वांत पहिले तंत्रज्ञान म्हणजे कोअर बँकिंग यंत्रणा होय. कोअर बँकिंगमुळे ग्राहकाला कोणत्याही बँकेच्या शाखेमधून व्यवहार ...
कोझ प्रमेय (Coase Theorem)

कोझ प्रमेय

अर्थशास्त्र आणि विधी या दोन अभ्यासशाखांच्या संयोगातून मांडलेला एक सैद्धांतिक प्रमेय. नोबेल विजेते रोनाल्ड हॅरी कोझ या ब्रिटिश अर्थतज्ज्ञांनी १९९१ ...
कोन्द्रातेफ चक्रे (Kondratieff Cycle)

कोन्द्रातेफ चक्रे

निकोलाय दिमित्रीयीच कोन्द्रातेफ या रशियन अर्थशास्त्रज्ञांनी इ. स. १९१७ मधील रशियन राज्यक्रांतीनंतर भांडवलशाहीतील व्यापारचक्रांचे विश्लेषण करून व्यापारचक्राविषयक सिद्धांत मांडला. इ ...
क्योटो प्रोटोकॉल (Kyoto Protocol)

क्योटो प्रोटोकॉल

जागतिक तापमान वाढ रोखण्यासंदर्भातील एक आंतरराष्ट्रीय करार. ब्राझीलच्या रीओ दे जानेरो येथे ३ ते १४ जून १९९२ या दरम्यान युनोच्या ...
क्रिसील (CRISIL)

क्रिसील

भारतातील एक अग्रगण्य पत मानांकन संस्था. ही संस्था पत मानांकनाबरोबरच आर्थिक क्षेत्रातील माहितीचे संशोधन करणे, व्यवसायातील संभाव्य धोक्यांबाबत मार्गदर्शन करणे, ...
क्रेडिट कार्ड (Credit Card)

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारचे कर्ज असून ते रोख स्वरूपात न मिळता ते कार्डच्या स्वरूपात मिळते. क्रेडिट कार्डचा वापर पैशाप्रमाणे ...
क्लाइव्ह डब्ल्यू. जॉन ग्रेंजर (Clive William John Granger)

क्लाइव्ह डब्ल्यू. जॉन ग्रेंजर

ग्रेंजर, क्लाइव्ह डब्ल्यू. जे. (Granger, Clive William John) : (४ सप्टेंबर १९३४ – २७ मे २००९). ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, गणिती व ...
क्षेत्रीय ग्रामीण बँक (Regional Gramin Bank)

क्षेत्रीय ग्रामीण बँक

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्व लक्षात घेता कृषी, उद्योग, व्यवसाय, छोटे व सीमांत शेतकरी इत्यादींना कर्ज देणे आणि कार्यक्षम उत्पादन ...
खेळते भांडवल (Working Capital)

खेळते भांडवल

एखाद्या उद्योग-व्यवसायाचे नेहमीच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम किंवा निधी म्हणजे खेळते भांडवल होय. यास चालू किंवा कार्यकारी ...
ख्रिस्तोफर ए. पिसाराइडेज, (Christopher A. Pissarides)

ख्रिस्तोफर ए. पिसाराइडेज,

पिसाराइडेज, सर ख्रिस्तोफर ए. (Pissarides, Sir Christopher A.) : (२० फेब्रुवारी १९४८). सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. लंडन ...