(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

गवाक्ष प्रसाधन (Window Dressing)

गवाक्ष प्रसाधन

प्रदर्शन खिडकी किंवा दुकान खिडकी ही दुकानातील अशी एक खिडकी की, जी ग्राहकांना दुकानामध्ये आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी आकृतिबंध किंवा ...
गिफेन वस्तू (Giffen Goods)

गिफेन वस्तू

हलक्या, निकृष्ट आणि कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू. गिफेन वस्तूंबाबतची संकल्पना ब्रिटिश संख्याशास्त्रज्ञ सर रॉबर्ट गिफेन यांनी प्रथम मांडली ...
गुण वस्तू (Merit Goods)

गुण वस्तू

समाजाला अनिवार्य असणाऱ्या वस्तू व सेवा म्हणजे गुण वस्तू. गुण वस्तूंच्या विशिष्ट स्वरूपामुळे आणि त्यांच्या जास्तीच्या किमतींमुळे लोकांकडून त्या वस्तू ...
गॅरी बेकर (Gary Becker)

गॅरी बेकर

बेकर, गॅरी : (२ डिसेंबर १९३० – ३  मे २०१४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. देशाच्या बाजारपेठांतील व्यक्तींचे ...
गोखले अर्थशास्त्र संस्था (Gokhale Institute of Politics and Economics)

गोखले अर्थशास्त्र संस्था

अर्थशास्त्रविषयक संशोधन व प्रशिक्षण देणारी भारतातील सर्वांत जुनी व विख्यात संस्था. कै. रावबहाद्दुर रा. रा. काळे यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया ...
ग्राहक मक्तेदारी (Monopsony)

ग्राहक मक्तेदारी

बाजारात असंख्य विक्रेते मात्र वस्तूंची खरेदी करणारा एकच ग्राहक असतो, त्यास ग्राहक मक्तेदारी म्हणतात. ग्राहक मक्तेदारीमुळे ग्राहकास सौदाशक्ती प्राप्त होऊन ...
घसारा (Depreciation)

घसारा

संयंत्र, यंत्रसामुग्री इत्यादी स्थिर भांडवली साधनसंपत्ती (फिक्स्ड कॅपिटल असेट) उत्पादन व सेवा देण्यासाठी उपयोगात आणल्यामुळे त्या भांडवली साधनसंपत्तीच्या मूल्यात जी ...
चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee)

चक्रवर्ती समिती

भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती. १९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण ...
चंदुलाल नगीनदास वकील (Chandulal Nagindas Vakil)

चंदुलाल नगीनदास वकील

चंदुलाल नगीनदास वकील : (२२ ऑगस्ट १८९५ – २६ ऑक्टोबर १९७९). नामवंत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेचे पहिले भारतीय ...
चलन संप्रदाय (Currency School)

चलन संप्रदाय

ब्रिटिश चलन संप्रदाय हा एक ब्रिटिश अर्थतज्ज्ञांचा गट होता. हा गट मुख्यत्वे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डेव्हिड रिकार्डो यांच्या बँकिंग संप्रदायाच्या विरोधातील ...
चेता अर्थशास्त्र (Neuro Economics)

चेता अर्थशास्त्र

एखादी व्यक्ती एखादा निर्णय (विशेषत꞉ आर्थिक स्वरूपाचा निर्णय) कसा घेतो आणि त्यामुळे मानवी मेंदूत कोणत्या क्रिया-प्रक्रिया घडत असतात, हे जाणून ...
छाया किंमत (Shadow Pricing)

छाया किंमत

एखाद्या आर्थिक व्यवहाराचा समाजाला उचलावा लागणारा वैकल्पिक खर्च म्हणजे छाया किंमत होय. जेव्हा वस्तू व सेवांची बाजार किंमत लागू करता ...
जकात संघ (Custom Union)

जकात संघ

जकात संघ हा दोन किंवा अधिक देशांच्या व्यापारांतील अडथळे दूर करणे, सीमा शुल्क कमी करणे अथवा रद्द करणे आणि अभ्यांश ...
जगदीश भगवती (Jagdish Bhagwati)

जगदीश भगवती

भगवती, जगदीश (Bhagwati, Jagdish) : (२६ जुलै १९३४). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या शाखेतील प्रमुख विचारवंतांमध्ये भगवती यांचे नाव ...
जनरल थिअरी (General Theory)

जनरल थिअरी

अर्थशास्त्रीय विचारप्रणाली विकसित करण्याबद्दल जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) यांचे नाव एक आघाडीचे अर्थशास्त्रज्ज्ञ म्हणून घेतले ...
जागतिक ठेव पावती (Global Depository Receipt–GDR)

जागतिक ठेव पावती

परकीय कंपन्यांचे भांडवल-शेअर्स (समभाग) खरेदी करून खरेदीदाराच्या खात्यावर ते जमा केल्याबद्दलची ठेवीदार बँकेने दिलेली पावती, म्हणजे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय ठेव ...
जानोस कोरनई (Janos Kornai)

जानोस कोरनई

कोरनई, जानोस (Kornai, Janos) : (२१ जानेवारी १९२८ – १८ ऑक्टोबर २०२१). विख्यात हंगेरियन अर्थतज्ज्ञ. कोरनई यांचा जन्म बुडापेस्ट येथे ...
जी २० (G 20)

जी २०

जी २० गट हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा एक अग्रगण्य मंच आहे. या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, ...
जी ७ (G 7 - Group of Seven)

जी ७

जगातील सर्वांत जास्त औद्योगिकीकरण असलेल्या सात अर्थव्यवस्थेचा एक गट. जी ७ ची स्थापना १९७६ मध्ये जी ६ या गटामधून झाली ...
जीन चार्ल्स लिओनार्ड द सिसमाँडी (Jean Charles Léonard de Sismondi)

जीन चार्ल्स लिओनार्ड द सिसमाँडी

सिसमाँडी, जीन चार्ल्स लिओनार्ड द (Sismondi, Jean Charles Léonard de) : (९ मे १७७३ – २५ जून १८४२). प्रसिद्ध फ्रेंच ...